
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
UPI AutoPay : UPI AutoPay मध्ये मोठा बदल! ग्राहकांना मिळणार हा मोठा फायदा? जाणून घ्या सविस्तर
साखर कारख्यान्यांमधून बाहेर पडणाऱ्या साखरेच्या दरात घट झाली आहे. हा दर जवळजवळ सुमारे ३० टक्क्यांनी घटला आहे. हा दर आता प्रति किलो ४७ रुपयांवर आला आहे. त्यामुळे या दरांमधील फरकाचा परिणामसामान्य ग्राहकांवरही होईल का याबाबत उत्सुकता आहे.
साखरेच्या ‘एक्स-मिल’ दरातील ही घट अचानक किंवा आपोआप झालेली नाही. तर त्यामागे सरकराने घेतलेले निर्णय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. किमतीतील या घटीमागे कोणता निर्णय कारणीभूत ठरला. त्यामुळे कारखान्यांसह आता सामान्यांनाही फायदा होईल अशी आशा आहे.
हे लक्षात घेणं महत्त्वाचे आहे की, सामान्य ग्राहकांना किरकोळ दुकानांमध्ये याचा लाभ मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो. अहवालांनुसार, ग्राहकांना दुकानांमध्ये याचा परिणाम दिसण्यास किमान १० दिवस लागण्याची शक्यता आहे.
जर आगामी काळात किरकोळ विक्रीच्या ठिकाणी साखरेचे दर कमी झाले, तर ग्राहकांना त्याचा थेट फायदा होणार आहे. ज्या कुटुंबांमध्ये साखरेचा वापर जास्त आहे, त्यांच्या खर्चात कपात होईल. साखरेच्या दरातील घसरणीचा परिणाम मिठाई, बेकरी उत्पादने आणि इतर संबंधित वस्तूंच्या किमतींवरही होऊ शकतो. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मिठाईच्या दुकानांच्या परिचालन खर्चातही घट होऊ शकते. किरकोळ बाजारातील साखरेचे दर कमी होण्यास काही काळ लागू शकतो, त्यामुळे सध्या तरी साखरेचा वापर जपून करणंच सगळ्यांच्या हिताचं ठरेल.
GDP Growth : जागतिक मंदीतही भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! पहिल्या तिमाहीत GDP 7.8 % वाढला