Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: ‘पेनगंगा’ च्या गाळप हंगाम पूर्वतयारीचा आरंभ; बुलढाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी – चांडक

Buldhana Urban Painganga Sugar Factory : पेनगंगा साखर कारखान्याच्या प्रगतीचा आलेख उंचावत असून, बुलढाणा अर्बनचे पाठबळ सार्थकी लागत असल्याचा आनंद असल्याचे संस्थापक राधेश्याम चांडक यांनी सांगितले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 31, 2026 | 05:52 PM
Buldhana Urban Painganga Sugar Factory

Buldhana Urban Painganga Sugar Factory

Follow Us
Follow Us:
  • ‘पेनगंगा’ च्या गाळप हंगाम पूर्वतयारीचा आरंभ
  • ३ लाख ११ हजार मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट
  • रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट समोर ठेवून पेनगंगाची निर्मिती
बुलढाणा: पेनगंगा साखर कारखान्याच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. बुलढाणा अर्बनने दिलेले पाठबळ सार्थकी लागत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे. बुलढाणा जिल्ह्याचा विकास आणि शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या या कारखान्याच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे आहोत, असे प्रतिपादन बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांनी केले. पेनगंगा साखर कारखाना प्रा. लि. येथे गाळप हंगाम २०२६-२७ च्या पूर्वतयारीचा शुभारंभ व मिल न रोलर पूजन सोहळा बुधवारी राधेश्याम चांडक यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते. यावेळी कडू काळे, कमलेश संचेती, आजिनाथ हजारे, शेषराव जायभाये, डॉ. शिवकुमार गोरे, अभिनाथ शिंदे, व्यंकटेश देशमुख, सीए प्रजापती, पूजा गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

धडक कारवाई; दुसरबीड, बीबी, सुलतानपूरमधील अतिक्रमिकांना प्राथमिक नोटीस, महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

यावेळी बोलताना संचालक अनिल गुंजाळ यांनी भाईजींनी जिल्ह्याच्या विकासासाठी पाहिलेले औद्योगिक विकासाचे स्वप्न, शेतकरी हित तसेच तरुण वर्गासाठी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पेनगंगा साखर कारखान्याच्या माध्यमातून अविरत प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास व्यक्त केला. आगामी गाळप हंगामासाठी यंत्रसामग्री, मिल, बॉयलर व उत्पादन विभागाची तयारी तसेच शेतकी विभागामार्फत ऊस तोडणी-वाहतूक व्यवस्थेचे नियोजन पूर्णत्वास आले असून सुरळीत व कार्यक्षम गाळप हंगामासाठी कारखाना सज्ज असल्याची माहितीही त्यांनी दिली. कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते जयवंत आवटे यांनी ‘जाऊ आनंदाच्या गावा’ या विषयावरील व्याख्यानातून त्यांनी कामावर प्रेम करावे आणि संस्थेप्रती निष्ठा ठेवावी, असा संदेश दिला.

३ लाख ११ हजार मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट

पेनगंगा साखर कारखान्याने आगामी गाळप हंगामात ३ लाख ११ हजार मे. टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले, त्यासाठी ऊस उपलब्धता, तोडणी वाहतूक व्यवस्था आणि कारखान्याची तांत्रिक क्षमतेचे नियोजन करण्यात आहे.

Washim News: कर्जमुक्तीचा दुसरा टप्पा; तब्बल १७ हजार शेतकऱ्यांना मिळाला १५० कोटींचा लाभ, ७, ४०४ आधार प्रमाणीकरण बाकी

Web Title: Buldhana news painganga sugar factory crushing season 2026 27 buldhana urban

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news
  • Sugar Factory

संबंधित बातम्या

Sugar Price Drop : साखरेचे भाव कोसळले! तब्बल 30 टक्क्यांनी झाली स्वस्त, ‘इतक्या’ दिवसांनी ग्राहकांना मिळणार फायदा
1

Sugar Price Drop : साखरेचे भाव कोसळले! तब्बल 30 टक्क्यांनी झाली स्वस्त, ‘इतक्या’ दिवसांनी ग्राहकांना मिळणार फायदा

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
2

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

धडक कारवाई; दुसरबीड, बीबी, सुलतानपूरमधील अतिक्रमिकांना प्राथमिक नोटीस, महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा
3

धडक कारवाई; दुसरबीड, बीबी, सुलतानपूरमधील अतिक्रमिकांना प्राथमिक नोटीस, महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

Buldhana News: भूखंड घशात घालण्याचा भूमाफियांचा प्रयत्न सुरू; तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन
4

Buldhana News: भूखंड घशात घालण्याचा भूमाफियांचा प्रयत्न सुरू; तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.