Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swiggy : स्विगीने भारतातील रात्रपाळीतील कर्मचाऱ्यांसाठी ‘लेट नाईट ईट्स’ सेवा केली सुरू!

रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी स्विगीने 'लेट नाईट ईट्स' ही नवी सेवा सुरू केली असून, ती भारतातील 30 शहरांतील 4,000 हून अधिक कार्यालयीन ठिकाणी आणि 30,000 पेक्षा जास्त रेस्टॉरंट्समध्ये उपलब्ध असेल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 07, 2026 | 09:25 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

भारतातील आघाडीच्या ऑन-डिमांड सुविधा प्लॅटफॉर्म स्विगीने रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी ‘लेट नाईट ईट्स’ ही नवी सेवा सुरू केली आहे. भारतातील 30 प्रमुख शहरांतील 4,000 हून अधिक कार्यालयीन ठिकाणे आणि 30,000 पेक्षा अधिक रेस्टॉरंट्समध्ये उपलब्ध असलेली ही सेवा रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ग्राहकांना निवडक खाद्यपदार्थ, आकर्षक सवलती, जलद डिलिव्हरी आणि ‘2 एएम क्लब’ चा विशेष लाभ देणार आहे. जागतिक वेळेनुसार काम करणारे कर्मचारी, रात्रपाळीतील व्यावसायिक आणि वाढीव कामाचे तास असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

रायगडमध्ये अतिवृष्टीचा कहर ! ४ जणांचा मृत्यू, ९ जखमी, १,०३२ नागरिकांचे स्थलांतर

या सेवेत बर्गर किंग, डॉमिनोज पिझ्झा, मॅकडोनाल्ड्स, केएफसी आणि सबवे यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. तसेच ‘डेस्कईट्स’ या संकल्पनेअंतर्गत वर्कस्टेशनवर सहज खाता येतील असे रोल्स, रॅप्स, हेल्दी बाउल्स, सॅलड्स, कॉफी, चहा, शेक्स, फ्रेंच फ्राईज, स्नॅक्स, डेझर्ट्स आणि ग्रुप ऑर्डरसाठी पिझ्झा अशा विविध पर्यायांचा समावेश करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन या खाद्यपर्यायांची रचना करण्यात आली आहे.

स्विगीच्या आकडेवारीनुसार, कार्यालयीन परिसरातील सुमारे 25 टक्के कर्मचारी रात्री 10 नंतर कार्यालयातूनच अन्नाची ऑर्डर देतात. भुवनेश्वर, गोवा, कोची, लखनौ, विशाखापट्टणम आणि अहमदाबाद यांसारख्या टियर-2 शहरांमध्ये रात्री उशिरा खाद्यपदार्थांच्या ऑर्डर्समध्ये दुहेरी अंकांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तसेच कार्यालयीन परिसरांना सेवा देणाऱ्या एक तृतीयांशपेक्षा अधिक रेस्टॉरंट्स रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ऑर्डर्स स्वीकारत असल्याचेही कंपनीने सांगितले.

डोंबिवली स्टेशन परिसरातील धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा नागरिकांचा आरोप

स्विगीचे फूड स्ट्रॅटेजी, कस्टमर एक्सपीरियन्स आणि न्यू इनिशिएटिव्ह्स विभागाचे उपाध्यक्ष दीपक मालू यांनी सांगितले की, कार्यस्थळांचे स्वरूप झपाट्याने बदलत असून जागतिक वेळेनुसार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. रात्री 10 नंतर कार्यालयातून दिल्या जाणाऱ्या ऑर्डर्समध्ये सातत्याने वाढ होत असल्याने अशा ग्राहकांसाठी अधिक विश्वासार्ह, परवडणारी आणि जलद फूड डिलिव्हरी सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘लेट नाईट ईट्स’ सुरू करण्यात आली आहे. आगामी काळात अधिक रेस्टॉरंट्स आणि कार्यालयीन केंद्रांचा या सेवेत समावेश करून तिचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Swiggy has launched the late night eats service for night shift workers in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 09:25 PM

Topics:  

  • Swiggy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.