Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Taj Luxury Villas : सेकंड होम घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ताज ब्रँडचे लक्झरी व्हिला क्षेत्रात पदार्पण, लोणावळ्यात प्रोजेक्ट लॉन्च

Taj Luxury Villas : भारतामधील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनीने महाराष्ट्रातील लोणावळा येथे व्हिलाजचा मोठा प्रोजेक्ट करणार आहे. यासंदर्भात 'ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिलाज' ची घोषणा करत लक्झरी ब्रँडेड व्हिला क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 28, 2026 | 04:02 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ताज ब्रँडचे लक्झरी व्हिला क्षेत्रात पदार्पण!
  • ‘अमावी’च्या सोबतीने सुरु केला व्हिला
  • ‘ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिलाज’ ऑपशन
Taj Luxury Villas : भारतामधील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी, इंडियन हॉटेल्स कंपनीने महाराष्ट्रातील लोणावळा येथे ‘ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिलाज’ सुरू करण्याची घोषणा केली. देशातील एकमेव हॉस्पिटॅलिटीवर केंद्रित, रिअल इस्टेट ब्रँड ‘अमावी’ च्या सहयोगाने विकसित करण्यात आलेल्या या प्रोजेक्टसाठी ताजने लक्झरी ब्रँडेड व्हिला सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. मुंबई आणि पुणे दरम्यान असलेले लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात पसंतीच्या आणि प्रतिष्ठित पर्यटन स्थळांपैकी एक आहे. नयनरम्य दऱ्या, तलाव आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे हिल स्टेशन सातत्याने वेलनेस हव्या असणाऱ्यांना आकर्षित करत आहेत. ( Taj Luxury Villas ) 

E10 Vs E20 Petrol : शाप की वरदान? E 20 च्या वादात सरकारचा नवा निर्णय! पंपावर E 10 ची एन्ट्री, नेमका काय आहे प्लॅन?

भारतातील सर्वात मजबूत ब्रँड म्हणून ओळख

पुनीत छटवाल, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आयएचसीएल म्हणाले,“शंभर वर्षांहून अधिक काळापासून, ताजने आपले भव्य राजवाडे, ऐतिहासिक सिटी हॉटेल्स, सफारी आणि रेसिडेन्सेसच्या माध्यमातून लक्झरी हॉस्पिटॅलिटी नवनवीन व्याख्या रचली आहे. जगातील सर्वात मजबूत लक्झरी हॉटेल ब्रँड आणि भारतातील सर्वात मजबूत ब्रँड म्हणून ओळखला जाणारा ‘ताज’, लक्झरी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात आपले अग्रस्थान सातत्याने मजबूत करत आहे”.

ब्रँडेड व्हिला सेगमेंटमध्ये शानदार पदार्पण

पुढे ते म्हणाले, “‘ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिला’ची सुरुवात ही ब्रँडेड व्हिला सेगमेंटमध्ये आमचे शानदार पदार्पण आहे. ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन आम्ही आमच्या पोर्टफोलिओचा विस्तार करत आहोत, तसेच लक्झरी रिअल इस्टेटच्या एका नवीन श्रेणीमध्ये आमच्या ब्रँडचा विश्वास, उत्कृष्ट सेवा आणि वारसा प्रदान करत आहोत.”

३४ एकरांच्या निसर्गरम्य परिसरात विस्तार

पश्चिम घाटातील ३४ एकरांच्या निसर्गरम्य परिसरात पसरलेला ‘ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिलाज’ हा एक इंटिग्रेटेड लक्झरी प्रोजेक्ट आहे. यामध्ये ३२ ब्रँडेड व्हिला आणि १०० खोल्यांचे एक आलिशान ताज रिसॉर्ट आहे, जिथून आजूबाजूचे तलाव आणि दरीचे विहंगम दृश्य दिसते. आधुनिक ‘बार्न-स्टाईल’ वास्तुकलेपासून प्रेरित या व्हिलामध्ये मोठ्या काचेच्या भिंती आणि प्रशस्त व्हरांडे आहेत, जे येथील नैसर्गिक परिसराशी पूर्णपणे एकरूप होतात.

निसर्गाशी ताळमेळ राखण्यासाठी जपानी तत्त्वज्ञान

प्रोजेक्टमध्ये दोन एकराचे ‘वाबी-साबी’ सेंट्रल पार्क देखील आहे, जे साधेपणा आणि निसर्गाशी ताळमेळ राखण्याच्या जपानी तत्त्वज्ञानावर आधारित आहे. येथे राहणारे लोक मियावाकी जंगल, नेचर ट्रेल्स, झेन गार्डन, स्टारगेझिंग डेक, गोल्फ पुटिंग ग्रीन्स, फिटनेस लॉन आणि मल्टी-पर्पज स्पोर्ट्स कोर्टचा आनंद घेऊ शकतात. या खास प्रोजेक्टमध्ये ‘क्लब अमावी’ देखील समाविष्ट आहे, जो वेलनेस, मनोरंजन, बँक्वेट आणि डायनिंग सारख्या जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा प्रदान करतो.

ताज हॉस्पिटॅलिटीची उत्कृष्ट सेवा

अपूर्व कुमार, व्यवस्थापकीय संचालक- अमावी संस्थापक, क्लार्क्स ग्रुप ऑफ हॉटेल्स म्हणाले,“लोक स्वतःला अधिक वेळ देता यावा या उद्देशाने ‘सेकंड होम’ खरेदी करतात जेणेकरून ते कुटुंबासोबत, निसर्गाच्या सानिध्यात आणि स्वतःसोबत काही क्षण घालवू शकतील. परंतु बऱ्याचदा, ही घरे त्यांच्यासाठी आणखी एक जबाबदारी बनतात. ‘अमावी’मध्ये आमचा उद्देश हीच विचारसरणी बदलण्याचा आहे. ‘ताज माउंट कुसूर रिसॉर्ट अँड व्हिला’ एका घराचा खाजगीपणा आणि स्थैर्य यासोबतच ताज हॉस्पिटॅलिटीची उत्कृष्ट सेवा आणि काळजी यांचा एक अप्रतिम संगम आहे”.

हा प्रोजेक्ट आमचा विश्वास दर्शवतो

याबाबत पुढे बोलताना म्हणाले, “पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला हा प्रोजेक्ट आमचा विश्वास देखील दर्शवतो की कोणताही सार्थक विकास असा असावा जो तिथल्या जमिनीचा आदर करेल आणि आजूबाजूच्या समुदायासाठी मूल्य निर्माण करेल. आम्हाला असे वाटते की माउंट कुसूर ही केवळ एक प्रॉपर्टी नसावी ज्याचे लोक मालक आहेत, तर ती अशी जागा असावी जिथे ते वारंवार परत येतील, ज्याच्याशी त्यांचे नाते जोडले जाईल आणि जिथे त्यांना आपलेपणा जाणवेल.”

हे ब्रँडेड व्हिला विक्रीसाठी उपलब्ध केले जातील, जे एका लीज-बॅक प्रोग्रामच्या माध्यमातून रिसॉर्टच्या इन्व्हेंटरी मध्ये समाविष्ट केले जातील. येथे राहणाऱ्या लोकांना ताजच्या जगप्रसिद्ध हॉस्पिटॅलिटी सेवांचा अनुभव मिळेल, त्यामध्ये कन्सिएर्ज असिस्टन्स, हाऊसकीपिंग आणि देखभाल सेवांसह रिसॉर्टच्या सर्व मनोरंजन आणि वेलनेस सुविधांचा समावेश आहे.

Multibagger Stock Return : काय सांगता? 6 वर्षांत 6000% रिटर्न! 100 शेअर्सचे झाले 900 शेअर्स, गुंतवणूकदारांची चांदी

Web Title: Taj luxury villas mount kusur resort and villas launched in lonavala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • Lonavla
  • Taj Hotel

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.