Stock Market Today: लाल रंगात होणार शेअर बाजाराची ओपनिंग, कोणत्या शेअर्समध्ये कराल गुंतवणूक? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज
मंगळवारी, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह धोरण निकालापूर्वी भारतीय शेअर बाजार घसरणीला सुरुवात झाली, दोन्ही बेंचमार्क निर्देशांक अर्धा टक्क्यांनी घसरले. सेन्सेक्स ४३६.४१ अंकांनी म्हणजेच ०.५१% ने घसरून ८४,६६६.२८ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १२०.९० अंकांनी म्हणजेच ०.४७% ने घसरून २५,८३९.६५ वर बंद झाला. मंगळवारी बँक निफ्टी निर्देशांक १६.२० अंकांनी किंवा ०.०३% ने घसरून ५९,२२२.३५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकादारांना इंट्राडे ट्रेडिंगसाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. वैशाली पारेख यांनी आज शिफारस केलेल्या स्टॉक्समध्ये टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग, काब्रा एक्सट्रूजन टेक्निक, फोर्टिस हेल्थकेअर यांचा समावेश आहे. आजचा व्यवहार करताना गुंतणूकदार स्विगी, टाटा पॉवर, इंडिगो, पाइन लॅब्स, झायडस लाईफसायन्सेस, ओला इलेक्ट्रिक, हुडको, महामार्ग पायाभूत सुविधा, जेएसडब्ल्यू एनर्जी, ग्रेफाइट इंडिया या शेअर्सवर देखील लक्ष केंद्रीत करू शकणार आहेत.
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया आज गुंतवणूकादारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. सुमित बगडिया यांनी शिफारस केलेल्या स्टॉक्समध्ये शारदा क्रॉपकेम, संधार टेक्नॉलॉजीज, इंडो बोरॅक्स आणि केमिकल्स, जमना ऑटो इंडस्ट्रीज आणि आशापुरा माइनकेम यांचा समावेश आहे. सुमीत बगाडिया (चॉईस ब्रोकिंग), गणेश डोंगरे (आनंद राठी) आणि शिजू कूथुपलक्कल (प्रभूदास लिल्लाधर) बाजारातील या तज्ञांनी गुंतवणूकादारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली. आजसाठी शिफारस करण्यात आलेल्या आठ इंट्राडे स्टॉकमध्ये अॅप्ट्स व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स इंडिया लिमिटेड, गुजरात पिपावाव पोर्ट लिमिटेड, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एनटीपीसी लिमिटेड, सेमिंडिया प्रोजेक्ट्स लिमिटेड, टीडी पॉवर सिस्टम्स लिमिटेड आणि टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे.






