Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाटा समूह 5 लाख नोकऱ्या देणार; ‘या’ क्षेत्रामध्ये उपलब्ध होणार सर्वाधिक नोकऱ्या!

देशातील उत्पादन क्षेत्र 7.4 टक्के वेगाने वाढत आहे. यामध्ये सुमारे 13 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. याअंतर्गत टाटा समूहाने सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी आणि संबंधित उद्योगांमध्ये सुमारे 5 लाख नोकऱ्या देण्याचे ठरवले आहे. असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 15, 2024 | 05:00 PM
टाटा समूह 5 लाख नोकऱ्या देणार; 'या' क्षेत्रामध्ये उपलब्ध होणार सर्वाधिक नोकऱ्या!

टाटा समूह 5 लाख नोकऱ्या देणार; 'या' क्षेत्रामध्ये उपलब्ध होणार सर्वाधिक नोकऱ्या!

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील सर्वात मोठ्या खासगी उद्योगसमूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहाने आपली 5 वर्षांची रणनीती निश्चित केली आहे. या अंतर्गत टाटा समूह उत्पादन क्षेत्रात सुमारे 5 लाख रोजगार निर्माण करणार आहे. देशातील उत्पादन क्षेत्र 7.4 टक्के वेगाने वाढत आहे. यामध्ये सुमारे 13 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. याअंतर्गत टाटा समूहाने सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी आणि संबंधित उद्योगांमध्ये सुमारे 5 लाख नोकऱ्या देण्याचे ठरवले आहे. असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले आहे.

उत्पादन क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावणार

मंगळवारी (ता.१५) इंडियन फाऊंडेशन फॉर क्वालिटी मॅनेजमेंटने आयोजित केलेल्या कार्यक्रमात टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन बोलत होते. भारत सध्या विकसित देश बनण्याचे स्वप्न पाहत आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यात उत्पादन क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या क्षेत्रात नोकऱ्या निर्माण केल्याशिवाय आपण विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करू शकत नाही. दर महिन्याला सुमारे 10 लाख लोक भारताच्या कार्यबलाचा भाग बनतात. त्यामुळे देशाच्या भविष्यासाठी अधिकाधिक नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

हे देखील वाचा – 1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; महागाई भत्त्यात 3 टक्के वाढीची शक्यता

५ लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे  समुहाचे लक्ष्य

टाटा समूहाने सेमीकंडक्टर क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. याशिवाय संबंधित इतर क्षेत्रातही टाटा समुह आपली गुंतवणूक वाढवणार आहे. येत्या ५ वर्षात ५ लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे समुहाचे लक्ष्य आहे. टाटा समूहाने आसाममध्ये मोठा सेमीकंडक्टर प्लांट उभारला आहे. याशिवाय ईव्ही आणि बॅटरी उत्पादनातही समुह काम करत आहे. सध्या पुढील ५ वर्षांच्या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. टाटा समुह सध्या अधिकाधिक नोकऱ्या निर्माण करण्यावर भर देत आहोत. याशिवाय, उत्पादन क्षेत्रातही सुमारे 5 लाख एसएमई निर्माण होतील. असेही ते यावेळी म्हणाले आहे.

महाराष्ट्र हे सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य

देशाला 10 कोटी रोजगार निर्माण करायचे आहेत. जर आपण 5 लाख प्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण केल्या तर त्यांच्या मदतीने कितीतरी पट अधिक अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन (एनएसओ) च्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2022 मध्ये उत्पादन क्षेत्रात 11 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या. ज्या आर्थिक वर्ष 2023 मध्ये वाढून 13 लाख झाल्या आहेत. उत्पादन क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य महाराष्ट्र हे पहिल्या स्थानी आहे. यानंतर गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो.

Web Title: Tata group to provide 50 thousand jobs most jobs will be available in the manufacturing sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 05:00 PM

Topics:  

  • Tata Group

संबंधित बातम्या

Tata Projects & ASI Global: टाटा प्रोजेक्ट्स आणि ASI ग्लोबलचा मोठा करार; भारतात तयार होणार अत्याधुनिक विमान देखभाल सुविधा
1

Tata Projects & ASI Global: टाटा प्रोजेक्ट्स आणि ASI ग्लोबलचा मोठा करार; भारतात तयार होणार अत्याधुनिक विमान देखभाल सुविधा

International Mens Day : प्लेगनंतर उभी राहिली हाफकिन इन्स्टिट्यूट; देशहित जपणारा पोलादी पुरुष जमशेटजी टाटा
2

International Mens Day : प्लेगनंतर उभी राहिली हाफकिन इन्स्टिट्यूट; देशहित जपणारा पोलादी पुरुष जमशेटजी टाटा

Bihar Election Result Market Impact: बिहारमध्ये NDA चा ‘विजयी’ झेंडा..! तरीही, शेअर बाजार का लाल रंगात? गुंतवणूकदार झाले सावध
3

Bihar Election Result Market Impact: बिहारमध्ये NDA चा ‘विजयी’ झेंडा..! तरीही, शेअर बाजार का लाल रंगात? गुंतवणूकदार झाले सावध

Share Market Crash: बिहार निवडणूक निकालांचा शेअर बाजारावर तगडा परिणाम! भारतीय बाजार उघडताच घसरला
4

Share Market Crash: बिहार निवडणूक निकालांचा शेअर बाजारावर तगडा परिणाम! भारतीय बाजार उघडताच घसरला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.