Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय उद्योजकतेचा जागतिक डंका! ‘तौराल इंडिया’ आणि भरत गीते यांची यशोगाथा आता हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये अभ्यासली जाणार

तौराल इंडियाचे संस्थापक भरत गीते यांची यशोगाथा आता हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये केस स्टडी म्हणून शिकवली जाणार आहे. भारतीय उत्पादन क्षेत्रातील ही मोठी उपलब्धी आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 15, 2026 | 07:54 PM
भारतीय उद्योजकतेचा जागतिक डंका!

भारतीय उद्योजकतेचा जागतिक डंका!

Follow Us
Close
Follow Us:

 

  • भारतीय उद्योजकतेचा जागतिक डंका!
  • ‘तौराल इंडिया’ आणि भरत गीते यांची यशोगाथा आता हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये अभ्यासली जाणार
मुंबई/ ता. १५ एप्रिल २०२६: ॲल्युमिनियम सँड कास्टिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी तौराल इंडिया आणि उद्योगांना ग्रामीण भारताशी जोडू पाहणारे उद्योजक, ‘ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ अशी ओळख असलेले भरत गीते यांची यशोगाथा जगातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या अमेरिकेतील हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या केस स्टडीमधून मांडण्यात आली आहे. या माध्यमातून तौराल इंडिया जागतिक स्तरावर अभ्यासल्या जाणाऱ्या निवडक कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवणारी कंपनी ठरली आहे.

ही केस स्टडी तौरल इंडियाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या उच्च-प्रिसिजन ॲल्युमिनियम कास्टिंग व्यवसायाच्या प्रवासावर आधारित आहे. जर्मनीस्थित थोनी आलुटेक या कंपनीसोबतच्या संयुक्त उपक्रमातून २०१६ साली सुरू झालेल्या या प्रवासाचा मागोवा या अभ्यासात घेण्यात आला आहे. ऊर्जा, रेल्वे, संरक्षण आणि एरोस्पेस यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना सेवा देणाऱ्या जागतिक स्तरावरील उत्पादन व्यासपीठापर्यंत झालेल्या कंपनीच्या प्रगतीचा यात समावेश आहे.

हार्वर्ड बिझनेस स्कुल येथील वरिष्ठ प्राध्यापक व्ही. जी. नारायणन यांनी ही केस स्टडी तयार केली असून, मुंबईतील हॉटेल ताज लँड्स एन्ड येथे मंगळवारी त्यांनी या केस स्टडीचे सादरीकरण केले. भरत गीते व माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह उद्योग, शिक्षण व धोरणात्मक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. परंपरागत औद्योगिक पार्श्वभूमी किंवा नेटवर्क नसतानाही पहिल्या पिढीतील उद्योजक जागतिक स्तरावरील उद्योग कसा उभारू शकतात, याबाबतचे विश्लेषण प्रा. व्ही. जी. नारायणन यांनी यामधून मांडले आहे.

UPI Payment करणाऱ्यांची ‘मज्जाच मज्जा’, आता 100 रुपयांचं सामान मिळणार फक्त 95 रुपयांत, जाणून घ्या सविस्तर

प्रा. व्ही. जी. नारायणन म्हणाले, “तौरल इंडियाचा प्रवास उदयोन्मुख बाजारपेठेत उत्पादन क्षमता उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या घटकांवर केंद्रित आहे. जागतिक सहकार्य, उच्च तंत्रज्ञान आणि स्थानिक अंमलबजावणी यांच्या संगमातून सक्षम व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उद्योग कसा उभा राहू शकतो, याचे हे उदाहरण आहे. ‘तौराल इंडिया’चा प्रवास केवळ उद्योगक्षेत्रापुरता मर्यादित न राहता, नव्या पिढीतील उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यातूनही एखादा तरुण उद्योजक झाला, तर या केस स्टडीचा उद्देश साध्य झाल्याचे समाधान मिळेल.”

भरत गीते म्हणाले, “हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये केस स्टडी म्हणून निवड होणे, हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आमचा प्रवास मूलभूत तत्त्वांवर आधारित असून, मर्यादांवर मात करत भारतीय उत्पादन जागतिक दर्जाचे बनू शकते, हे सिद्ध करण्याचा आहे. योग्य दृष्टिकोन, शिस्त आणि भागीदारीच्या आधारे भारतासाठी आणि जगासाठी उच्च-गुणवत्तेचे, प्रिसिजन-आधारित अभियांत्रिकी उपाय आणि टिकाऊ उत्पादन मूल्य निर्माण करता येते, हा आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.”

२०१६ मध्ये स्थापना झालेली तौराल इंडिया आज चाकण (पुणे) आणि सुपा (अहिल्यानगर) या दोन उत्पादन प्रकल्पांसह ॲल्युमिनियम कास्टिंग उत्पादक म्हणून विकसित झाली आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या दोन गोष्टींशी भावनिक बंध असून, उद्योगांना ग्रामीण भागाकडे घेऊन जाण्याचे ध्येय आहे, असे भरत गीते यांनी यावेळी नमूद केले.

अक्षय तृतीयेला JioFinance चा धमाका! Digital Gold खरेदीवर मिळणार तब्बल ‘इतकं’ सोनं; पाहा काय आहे ऑफर?

Web Title: Taural india bharat gite harvard business school case study success story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 07:54 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

अदानींचा ‘मास्टरस्ट्रोक’! Mukesh Ambani यांना मागे टाकत Gautam Adani  ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
1

अदानींचा ‘मास्टरस्ट्रोक’! Mukesh Ambani यांना मागे टाकत Gautam Adani ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Alert! : KYC च्या नावाखाली मोठी फसवणूक! तुमचं Pan Card वापरून भामटे काढतायत Loan, कसा कराल बचाव?
2

Alert! : KYC च्या नावाखाली मोठी फसवणूक! तुमचं Pan Card वापरून भामटे काढतायत Loan, कसा कराल बचाव?

‘मी सेटलमेंटसाठी 8000 कोटी देऊ शकतो…’, Anil Ambani चा सर्वोच्च न्यायालयातच प्रस्ताव? काय आहे नक्की प्रकरण
3

‘मी सेटलमेंटसाठी 8000 कोटी देऊ शकतो…’, Anil Ambani चा सर्वोच्च न्यायालयातच प्रस्ताव? काय आहे नक्की प्रकरण

Akshaya Tritiya 2026: सावधान! सोन्याची साठवणूक करताना या ‘5’ चुका टाळा, गुंतवणूक ठरेल योग्य
4

Akshaya Tritiya 2026: सावधान! सोन्याची साठवणूक करताना या ‘5’ चुका टाळा, गुंतवणूक ठरेल योग्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.