Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akshaya Tritiya 2026: सावधान! सोन्याची साठवणूक करताना या ‘5’ चुका टाळा, गुंतवणूक ठरेल योग्य

सोन्यात गुंतवणूक करणे केव्हाही चांगलेच. पण खरेदी केलेले सोनं साठवून ठेवताना आपण अनेक चुका करत असतो. यापैकी ५ महत्त्वाच्या चुका तुम्ही कशा टाळल्या पाहिजेत याबाबत अधिक माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 17, 2026 | 10:20 AM
सोन्याची साठवण कशी कराल (फोटो सौजन्य - iStock)

सोन्याची साठवण कशी कराल (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • सोन्याची साठवण कशी करावी 
  • सोन्याची साठवण करताना कोणत्या गोष्टी जपाव्यात 
  • सोन्यात गुंतवणूक नेहमीच योग्य 
आपल्या भारतीयांमध्ये सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिढ्यानपिढ्या वारशाने मिळालेले दागिने असोत किंवा अक्षय्य तृतीया आणि धनत्रयोदशीसारख्या सणांच्या मुहूर्तावर केलेली सोन्याची नवीन खरेदी असो; भारतीयांमध्ये सोन्याला मौल्यवान धातूपेक्षाही जास्त महत्त्व आहे. आजही अनेक घरांमध्ये सोने ठेवणे हे कुटुंबाच्या भावनिक आणि आर्थिक सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. सणोत्सवात सोन्यांतील गुंतवणूक हे समृद्धीचे लक्षण मानले जाते. संकटकाळात हक्काची पुंजी म्हणून सोन्याचा आधार मिळतो. या पिवळ्या धातूशी भारतीयांचे अतूट नाते आहे. 

अलीकडच्या काळात सोन्याच्या सुरक्षिततेच मूल्य लक्षणीयरित्या वाढले आहे. २०२५ साली भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरांनी एकामागोमाग एक उच्चांक प्रस्थापित केल्याचे दिसून आले आहे. देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीने प्रति १० ग्रॅम १.३९ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला असून, ही आतापर्यंतची ऐतिहासिक दरवाढ ठरली आहे. सोन्याच्या दरातील या सातत्यपूर्ण वाढीमुळे भारतीय घरांती सोन्याचे मूल्य कमालीचे वाढले आहे. ही मालमत्ता आता सामान्य दागिने खरेदीतील उच्च मूल्य प्राप्त झालेल्या किंमतीत रुपांतरित झाली आहे. 

सोन्याच्या किंमतीतील वाढ ही सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून चिंताजनक आहे. यातून सोन्याची चोरी होण्याच्या घटांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीत सोने खरेदीपेक्षाही सुरक्षित साठवणूक ही काळाची गरज बनली आहे. सोन्याचे मूल्य ऐतिहासिक स्तरावर पोहोचल्यामुळे घरात किंवा इतर ठिकाणी सुरक्षित ठेवणे हे गुंतणूकीइतकेच आव्हानात्मक बनले आहे. सिक्युरीट सॉल्युशन्स बिझनेस, गोदरजे एंटरप्रायजेस ग्रुपचे बिझनेस हेड पुष्कर गोखले यांनी याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. 

१) सोन्याच्या साठवणुकीकडे दुर्लक्ष करणे

अनेक कुटुंबांमध्ये सोन्याच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात नाही. सोन्याची खरेदी केल्यानंतर सुरक्षिततेबाबत विचार सुरु होतो. सोन्याचे दागिने कपाटात, ड्रॉवरमध्ये, घरात उपलब्ध असलेल्या जागेत ठेवले जातात. ही पूर्वापार सुरु असलेली पद्धत आता जोखमीची ठरु शकते. सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किंमती पाहता घरात सोने लपवून सुरक्षितत साठवणूक हा दृष्टीकोन बाळगता येणार नाही. अनेकदा नवविवाहित जोडपी दागिन्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सासरच्या मंडळींवर सोपावतात. मात्र, आजच्या काळात सोन्याची साठवणूक ही नियोजनबद्ध, सुरक्षित आणि जबाबदार असणे गरजेचे आहे. केवळ दागिने मावतील अशा जागा शोधण्यापेक्षा, मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या होम लॉकरसारखा पर्याय वापरणे उचित ठरेल. 

सोनं की शेअर बाजार? कुठे गुंतवणूक कराल? दिवाळीत जास्त परतावा कोण देणार? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

२) साठवणुकीच्या जुन्या, पारंपरिक आणि कालबाह्य पद्धतींवर अवलंबून राहणे

वर्षानुवर्षे अनेक भारतीय घरांमध्ये मौल्यवान वस्तू या तांदूळ, गहू किंवा पिठाच्या डब्यात, माठामध्ये, गादीखाली किंवा कपाटांच्या कोप-यात लपवून ठेवण्याची पद्धत आहे. सुरक्षिततेची साधनांची कमतरता आणि साधी राहणीमान असतानाच्या काळात या पद्धती कदाचित सोयीच्या वाटत असतील. आजच्या आधुनिक युगात या पूर्णपणे कालबाह्य झाल्या आहेत. गगनाला भिडलेल्या सोन्याच्या किंमती पाहता अशा जुन्या आणि कोणाच्याही लक्षात न येणा-या या जुन्या सवयींच्या जागा आता सुरक्षित नाहीत. याउलट, मौल्यवान वस्तूंसाठी खास तयार केलेले आधुनिक लॉकर विश्वासार्ह वाटतात. ड्युअल किंवा ट्रिपल लॉकिंग सिस्टीम मजबूत बांधणीने सज्ज असलेले हे लॉकर्स घरात पक्के बसवता येतात. कपाटात, पलंगाच्या आत किंवा माळ्यावर या लॉकर्सला घट्ट बसवता येते. हे लॉकर्स वजनाने हलके असल्याने कोणालाही सहज हलवता येतील. लॉकर्सच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे तुमची संपत्ती सुरक्षित राहते. 

३) एकाच ठिकाणी साठवणूक करणे

अनेकदा घरातील सर्व दागिने एकाच ठिकाणी ठेवले जातात. नेहमीच्या वापरातील दागिने वापरताना ही सवय बाळगली जाते. दागिने हाताळणे सोपे वाटत असले तरीही सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सवय घातक ठरते. सोने ठेवण्याची जागा सुरक्षित नसेल तर एकाच फटक्यात सगळे दागिने लंपास होण्याची भीती नाकारली जाता येत नाही. घरामध्ये संपत्ती आणि दागिने वाढत असल्यास या मौल्यवान वस्तूंच्या साठवणुकीत शिस्त आणि सुसूत्रता आणणे गरजेचे आहे. आजकाल घरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित कप्प्यांमध्ये किंवा एकापेक्षा जास्त होम लॉकर्समध्ये विभागून ठेवल्या जातात. हा सुरक्षित उपाय मानला जातो. या उपायामुळे सर्व दागिने एकाचवेळी गमावण्याची जोखीम कमी होते तसेच अनपेक्षित नुकसान टाळता येते. 

४) प्रवास, घरातील लोकांच्या सततच्या रेलचेलीत जोखमींकडे दुर्लक्ष करणे 

आजच्या काळात अनेकांनी धावत्या जीवनशैलीचा स्विकार केला आहे. सततचा प्रवास, घरगुती कार्यक्रम, विभक्त कुटुंब पद्धती यात घरांतील अनेक माणसे व्यस्त असतात. वाढत्या ऑनलाईन खरेदीच्या वितरण सेवेमळे अनेकांची घरात रेलचेल सुरु असते. व्यस्त जीवनशैलीमुळे घर बंद असेल किंवा बाहेरच्या लोकांच्या वावरावर लक्ष ठेवता येत नसल्यास दागिन्यांच्या सुरक्षिततेमध्ये गंभीर त्रुटी निर्माण होऊ शकतात. अशा वेळी केवळ जुन्या कपाटांवर किंवा कपाटांच्या लॉकरवर अवलंबून राहणे पुरेसे नाही. 

५) भक्कम सुरक्षिततेला महत्त्व न देणे

सोन्याच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर कानाडोळा करणे हा प्रकार आजही जनमानसांत सर्रासपणे दिसून येतो. सोन्याची किंमत वाढत असताना हा प्रकार आजही सुरु आहे. अनेकजण घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी टीव्ही किंवा ब्लूटूथ स्पीकर्स यांसारख्या आधुनिक उपकरणांवर आवर्जून खर्च करतात. मात्र सोन्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक यंत्रणांच्या अंमलबजाणीकडे दुर्लक्ष होते. आजच्या काळात सोन्याचे वाढते मूल्य आणि संरक्षणात्मक उपाय म्हणून सुरु अससेली पूर्वापार पद्धती या दोन्हींमध्ये मोठी तफावत आहे. 

सोने हे आता केवळ सांस्कृतिक वारसा नसून, उच्च मूल्य प्राप्त झालेली आर्थिक मालमत्ता आहे. सोन्याचे महत्त्व लक्षात घेता साठवणुकीची पद्धतही आधुनिक असायला हवी. आजच्या काळात अत्याधुनिक होम लॉकर्स आणि घरातील एकात्मिक सुरक्षा यंत्रणा चैनीची वस्तूंपुरती मर्यादित राहिलेल्या नाहीत. ही गुंतवणूक रोजच्या जीवनातील व्यावहारिक आणि दीर्घकालीन गुंतवणूक झाली आहे. होम लॉकर्स तुमच्या मौल्यवान संपत्तीला संपूर्णपणे संरक्षण देतात. 

सोने की शेअर्स? पुढील तीन वर्षांत कोण देईल जास्त परतावा? गुंतवणूक करण्यापूर्वी एकदा वाचाच

संरक्षणात्मक उपाययोजना करताना काय करावे 

भारतीय कुटुंबामध्ये सोने हा बचतीचा मुख्य आधार मानला जातो. अनेकांच्या भावनांचे प्रतीक म्हणून सोन्याचे महत्त्व नेहमीच अढळ राहील. मात्र वाढत्या सोन्याच्या किंमती, धावती जीवनशैली पाहता या मौल्यवान ठेव्याच्या सुरक्षेकडे पाहण्याचा परंपरांगत दृष्टीकोनही बदलायला हवा. केवळ सोने खरेदी करुन चालणार नाही तर बदलत्या काळातील धोके ओळखून आधुनिक आणि सक्षम उपययोजनांचा अवलंब करायला हवा. या सुरक्षित योजना काळाची गरज बनली आहे. सोन्याचा वारसा जपतानाच त्याच्या सुरक्षिततेची खात्री बाळगणे, हेच ख-या अर्थाने आपली आर्थिक आणि भावनिक सुरक्षा सुनिश्चित करणारे पाऊल ठरेल. 

सोने सुरक्षितरित्या जपल्यास खरे मूल्यही अबाधित राहील. घराच्या सुरक्षा व्यवस्थेची उभारणी विचारपूर्वक आणि भक्कम असल्यास सदस्यांना कोणतीही चिंता सतावत नाही. घरातील माणसे कोणताही तणाव न बाळगता आत्मविश्वासाने आणि निश्चिंत मनाने प्रवासासाठी घराबाहेर पाऊल ठेवू शकतात. आपल्या कष्टाची कमाई कोणत्याही भीतीविना पुढच्या पिढीकडे सोपवू शकतात. सुरक्षित घर हे तुमच्या संपत्तीचे रक्षण करते. परिणामी, घरातून मिळणा-या मनःशांतीमुळे तुमचे जीवन अधिक चिंतामुक्त आणि आनंदी होते. 

घराच्या सुरक्षेसाठी आवश्यक गुंतवणूक आपल्या सर्व संपत्ती सुरक्षित राखतात. आता सर्वांनी ही सुरक्षितता समजून घ्यायला हवी. महागाच्या किंमतीचे सोने खरेदी करण्याच्या आनंदात या संपत्तीच्या सुरक्षिततेची खात्रीही महत्त्वाची आहे. सोन्याच्या किंमती सतत वाढत असताना, सुरक्षा यंत्रणेवरील खर्च हा भविष्यातील मोठ्या आर्थिक नुकसानीला रोखणारे भक्कम सुरक्षा कवच आहे. त्यामुळे केवळ संपत्ती साठवण्यावर भर न देता, तिच्या संरक्षणाची जबाबदारी समर्थपणे पेलणारी आधुनिक सुरक्षा व्यवस्था उभारणे हे प्रत्येक सुज्ञ कुटुंबाचे कर्तव्य आहे.

Web Title: How to store gold at home tips to care golden things

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Business News
  • Gold
  • Gold Jewellery

संबंधित बातम्या

8th Pay Commission: 18000 ची बेसिक सॅलरी होणार 69,000? इन्क्रिमेंटपेक्षाही अधिक मिळणार पगार
1

8th Pay Commission: 18000 ची बेसिक सॅलरी होणार 69,000? इन्क्रिमेंटपेक्षाही अधिक मिळणार पगार

Gold Rate Today: बाबो! अक्षय्य तृतीयेपूर्वी सोने- चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ, ग्राहकांमध्ये खळबळ, काय आहेत आताचे दर?
2

Gold Rate Today: बाबो! अक्षय्य तृतीयेपूर्वी सोने- चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ, ग्राहकांमध्ये खळबळ, काय आहेत आताचे दर?

पश्चिम आशियात शांततेच्या आशेमुळे शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 500 अंकांनी उसळला; Eternal ला फायदा
3

पश्चिम आशियात शांततेच्या आशेमुळे शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 500 अंकांनी उसळला; Eternal ला फायदा

Iran America War : उंबरठ्यावर आलं, भारतानं नाकारलं! 20 लाख बॅरल घेऊन आलेल्या Irani जहाजाला No Entry,नेमकं कारण काय?
4

Iran America War : उंबरठ्यावर आलं, भारतानं नाकारलं! 20 लाख बॅरल घेऊन आलेल्या Irani जहाजाला No Entry,नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.