Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alert! : KYC च्या नावाखाली मोठी फसवणूक! तुमचं Pan Card वापरून भामटे काढतायत Loan, कसा कराल बचाव?

सध्या तंत्रज्ञानाचा वापर जेवढा वाढला आहे, तेवढेच सायबर धोकेही वाढले आहेत. ठगांनी आता एक नवीन पैतरा आजमवायला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये ते सामान्य नागरिकांच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डचा वापर करत आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 17, 2026 | 01:12 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • तुमचं Pan Card वापरून भामटे काढतायत Loan
  • Pan Card चा वापर करुन फसवणूक कशी होते?
  • Froud पासून कसं राहायचं सुरक्षित?
PAN Card Loan Fraud : कल्पना करा जर तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासला आणि तुमच्या लक्षात आलं की तुमच्या नावावर एक कर्ज काढले गेले आहे. ज्या कर्जासाठी तुम्ही कधी स्वतः अर्जच केला नाही तर… तुम्ही कोणताही अर्ज न करताच हे कर्ज तुमच्यावर लादले गेले आहे अशीच परिस्थिती निर्माण होईल. यामुळे ते संपूर्ण कर्ज फेडायची जबाबदारी संपूर्ण तुमच्यावरच येईल. ही फक्त कल्पना नाही तर हे प्रकार घडताहेत. या प्रकारची पॅन-संबंधित कर्ज फसवणूक ही केवळ एक-दोन व्यक्तींना प्रभावित करणारी एक वेगळी घटना नाही; उलट, देशभरातील लाखो लोक अशा घोटाळ्यांना बळी पडले आहेत. सध्या तंत्रज्ञानाचा वापर जेवढा वाढला आहे, तेवढेच सायबर धोकेही वाढले आहेत. ठगांनी आता एक नवीन पैतरा आजमवायला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये ते सामान्य नागरिकांच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डचा वापर करत आहेत.

वास्तविक पाहता, घोटाळेबाज लोकांच्या नकळत किंवा संमतीशिवाय त्यांच्या नावावर कर्ज मिळवण्यासाठी चोरलेल्या पॅन तपशिलाचा वापर करतात. डिजिटल कर्जपुरवठा आणि त्वरित कर्ज मंजुरीच्या वाढत्या ट्रेंडमुळे घोटाळेबाजांना वेरिफिकेशन सिस्टमचा गैरफायदा घेता येतो. परिणामी, या सगळ्याला बळी पडलेल्या व्यक्तींचा क्रेडिट स्कोअर खराब होत आहे. त्यांना सतत वसुलीसाठी फोन येतात.

Pan Card चा वापर करुन फसवणूक कशी होते?

फसवणूक करणारे केवळ पॅन डिटेल्सवर अवलंबून राहत नाहीत; त्याऐवजी, ते ही माहिती आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि जन्मतारीख यांसारख्या इतर तपशिलांसह एकत्र करून एक बनावट ओळख तयार करतात. ते अनेकदा डेटा लीक, फिशिंग लिंक्स किंवा कायदेशीर सेवांची नक्कल करणाऱ्या बनावट ॲप्लिकेशन्सद्वारे ही माहिती गोळा करतात. अशा बनावट ओळखीचा वापर करून, घोटाळेबाज मूळ व्यक्तीला याची किंचितही कल्पना न होऊ देता सहजपणे कर्जासाठी अर्ज करतात आणि कर्ज मंजूर करुनही घेतात.

कसं राहायचं सुरक्षित?

‘द इकॉनॉमिक टाइम्स’च्या एका अहवालानुसार, जर तुमच्या Pan Card चा गैरवापर झाला आहे असा तुम्हाला संशय आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा नेहमी क्रेडिट रिपोर्ट तपासा. TransUnion CIBIL, Experian, Equifax आणि CRIF High Mark यांसारख्या क्रेडिट ब्युरोद्वारे तुम्हाला तुमचा रिपोर्ट पाहणे आणि त्यातील कोणत्याही संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणं शक्य होतं आणि ती सुविधा तुम्हाला दिली जाते.

जर तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये एखादे अनोळखी कर्ज, एखाद्या अज्ञात कर्जदात्याकडून आलेली चौकशी किंवा तुम्हाला ओळखता न येणारे एखादे खाते दिसून आले, तर ते तुमच्या PAN कार्डचा गैरवापर होत असल्याचा सुरुवातीचा अलर्ट आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही त्वरित हालचाली करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला एखाद्या fraudulent loan बाबत समोर आलं तर तुम्ही सगळ्या पहिलं त्या कर्जदात्याला संपर्क करा आणि फसवणुकीसंबंधित तक्रार दाखल करा त्यानंतर KYC रिलेटे त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या कागदपत्रांची मागणी करुन ती सगळी कागदपत्र तपासून पाहा.

त्यानंतर, ‘नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल’वर तक्रार दाखल करा आणि स्थानिक पोलीस किंवा ‘सायबर सेल’कडे FIR नोंदवा. याव्यतिरिक्त, संबंधित खात्याला ‘फसवणुकीचे खाते’ म्हणजेच fraudulent account म्हणून flag करण्यासाठी TransUnion CIBIL सारख्या क्रेडिट ब्युरोंना हे सुचित करा. शिवाय, तुमची बँक खाती आणि पासवर्ड सुरक्षित करा, तसंच पुढील कोणताही गैरवापर रोखण्यासाठी ‘अलर्ट्स’ चालू करा. जर वेळेवर तक्रार केली गेली, तर कायदा देखील ग्राहकाच्या बाजूने नेहमी उभा राहतो.

Web Title: Latest pan card loan fraud know how to stay safe see for more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Bank Fraud
  • Business News
  • Cyber Fraud
  • FIR
  • fraud
  • Fraud Case
  • Marathi News
  • online fraud
  • pan card

संबंधित बातम्या

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
1

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
2

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
3

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
4

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.