Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राम नवमीचा मुहूर्तावर ‘या’ आंतरराष्ट्रीय विमानतळा’चे होणार उद्घाटन; पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण

विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर, नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 13, 2026 | 06:58 PM
राम नवमीचा मुहूर्तावर 'या' आंतरराष्ट्रीय विमानतळा'चे होणार उद्घाटन (Photo Credit- X)

राम नवमीचा मुहूर्तावर 'या' आंतरराष्ट्रीय विमानतळा'चे होणार उद्घाटन (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • राम नवमीचा मुहूर्तावर ‘या’ आंतरराष्ट्रीय विमानतळा’चे होणार उद्घाटन
  • पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण
  • केवळ ‘सिक्युरिटी क्लियरेंस’ची प्रतीक्षा
Noida International Airport: नोएडा आणि दिल्ली-NCR मधील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. जेवर (गौतमबुद्ध नगर) येथे उभारण्यात आलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Noida International Airport) उद्घाटनाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या २६ मार्च रोजी राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या भव्य विमानतळाचे लोकार्पण करण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक

विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर, नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या बैठकीचे नेतृत्व विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) क्रिस्टोफ श्नेलमान यांनी केले. या भेटीदरम्यान प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि उद्घाटनाच्या नियोजनावर चर्चा झाली.

‘एयरोड्रोम लायसन्स’ प्राप्त; महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण

बैठकीत अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेले ‘एयरोड्रोम लायसन्स’ सुपूर्द केले. विमानतळ कार्यान्वित करण्यापूर्वी हे सर्वात महत्त्वाचे तांत्रिक आणि नियामक प्रमाणपत्र मानले जाते. या परवान्यामुळे आता व्यावसायिक उड्डाणांसाठीचा मोठा अडथळा दूर झाला आहे.

चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा! ७५० शेतकऱ्यांना नोटिसा; धावपट्टी १२ हजार फुटांपर्यंत वाढणार

केवळ ‘सिक्युरिटी क्लियरेंस’ची प्रतीक्षा

विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, सर्व प्रमुख प्रक्रिया पूर्ण झाल्या असून आता केवळ अंतिम सुरक्षा मंजुरी मिळणे बाकी आहे. विमानतळाचा ‘एयरोड्रोम सिक्युरिटी प्रोग्राम’ सध्या नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS) कडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. ही मंजुरी मिळताच विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणांचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले जाईल.

उत्तर भारतातील सर्वात मोठे ‘एअर ट्रॅफिक हब’

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर ते उत्तर भारतातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक ठरेल. यामुळे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढता ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. या विमानतळामुळे पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्ली-NCR मधील आर्थिक विकासाला तसेच पर्यटनाला मोठी गती मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. २६ मार्चला राम नवमी आणि नवरात्रीचा उत्सव असल्याने, याच शुभ मुहूर्तावर हा ऐतिहासिक प्रकल्प देशाला समर्पित करण्याची तयारी केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

Noida International Airport: नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळाला एअरोड्रम परवाना; लवकरच सुरू होणार उड्डाणे

Web Title: This international airport to be inaugurated on the auspicious occasion of ram navami pm narendra modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • airport
  • Noida
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Nagpur News :आता चेहरा ओळखताच उघडणार विमानतळाचे गेट
1

Nagpur News :आता चेहरा ओळखताच उघडणार विमानतळाचे गेट

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
2

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
3

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द
4

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.