
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मुलांची ऑनलाइन सुरक्षितता आणि त्यांच्या डेटाच्या गोपनीयतेशी संबंधित हे प्रकरण असल्याचं बोललं जात आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी असा आरोप केला होता की, टिकटॉकने १३ वर्षांखालील मुलांच्या डेटासंदर्भातील नियमांचे पालन केले नाही. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण मिटवण्यासाठी दोन्ही कंपन्या ४०० दशलक्ष डॉलर्स देतील. याचा अर्थ रुपयांमध्ये अंदाजे ३,३०० कोटी रुपये देतील.
हे प्रकरण अमेरिकेतील COPPA या कायद्याअंतर्गत आहे. COPPA म्हणजे चिल्ड्रन्स ऑनलाइन प्रायव्हसी प्रोटेक्शन ॲक्ट हा एक अमेरिकन कायदा आहे. हा कायदा मुलांच्या वैयक्तिक डेटाशी संलग्न बनवण्यात आला आहे. कंपन्यांना पालकांच्या परवानगीशिवाय १३ वर्षांखालील मुलांकडून वैयक्तिक माहिती गोळा करण्यास सक्त मनाई करतो. या प्रकरणावरुन अमेरिकन अधिकाऱ्यांनी टिकटॉकवर आरोप केला आहे. कंपनीने अमेरिकन या नियमाचं उल्लंघन केलं असल्याचं सांगितलं जात आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागाने आणि फेडरल ट्रेड कमिशनने म्हणजेच FTC ने २०२४ मध्ये टिकटॉकवर केस दाखल केली. या केसमध्ये असा दावा करण्यात आला की, १३ वर्षांखालील मुलांसाठी तयार केलेल्या ‘किड्स मोड’ ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा अकाऊंट तयार करण्यासाठी ईमेल ॲड्रेस आणि इतर सगळीच वैयक्तिक माहिती गोळा केली जात होती, ज्यामुळे लाखो मुलांच्या डेटाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि त्यांच्या ऑनलाइन सुरक्षेबाबतही मोठा धोका निर्माण झाला.