Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ चार देशांमध्ये भारतापेक्षा अधिक लोकप्रिय आहे ट्रेन; अर्ध्याहून अधिक लोकसंख्या करते प्रवास!

भारतात दररोज 13,000 पेक्षा जास्त ट्रेन धावतात. ज्यातून 2.4 कोटी लोक दररोज प्रवास करतात. मात्र, जगभरात असे चार देश आहेत. ज्या ठिकाणी लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण भारतापेक्षा जास्त आहे. दरम्यान, स्वित्झर्लंड, यूके, जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली, स्वीडन आणि झेक रिपब्लिकमध्ये 50 टक्क्यांहून अधिक लोक स्थानिक रेल्वेचा वापर करतात.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 10, 2024 | 07:40 PM
'या' चार देशांमध्ये भारतापेक्षा अधिक लोकप्रिय आहे ट्रेन; अर्ध्याहून अधिक लोकसंख्या करते प्रवास!

'या' चार देशांमध्ये भारतापेक्षा अधिक लोकप्रिय आहे ट्रेन; अर्ध्याहून अधिक लोकसंख्या करते प्रवास!

Follow Us
Follow Us:

रेल्वेला भारताची जीवनवाहिनी म्हटले जाते. देशात दररोज 13,000 हून अधिक ट्रेन धावतात आणि 2.4 कोटी लोक प्रवास करतात. पण लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिल्यास जगातील चार देशांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या भारतापेक्षा अधिक आहे. आकडेवारीनुसार, भारतात ५३ टक्के लोक लोकल रेल्वेने प्रवास करतात. या यादीत युरोपीय देश असलेला स्वित्झर्लंड अव्वल आहे. या देशातील ६७ टक्के लोक लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. ही संख्या यूकेमध्ये 56 टक्के, सिंगापूरमध्ये 56 टक्के आणि जर्मनीमध्ये 56 टक्के आहे. याचा अर्थ या देशांमध्ये लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या आपल्यापेक्षा जास्त आहे. हा आकडा गेल्या वर्षी लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आहे.

हे देखील वाचा – ‘ही’ आहे भारतातील सर्वाधिक विकली जाणारी व्हिस्की; किंमत वाचून चाट पडाल…!

या देशांमध्ये होतो ट्रेनचा सर्वाधिक वापर

रेल्वेची सुरुवात युरोपमध्ये झाली आणि आजही त्या ठिकाणी रेल्वे सर्वात लोकप्रिय वाहतुकीचे साधन आहे. स्वित्झर्लंड, यूके, जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली, स्वीडन आणि झेक रिपब्लिकमध्ये 50 टक्क्यांहून अधिक लोक स्थानिक रेल्वेचा वापर करतात. पण फ्रान्स, मोरोक्को आणि चीनसारख्या देशांमध्ये हायस्पीड ट्रेन असूनही फार कमी लोकांना रेल्वेने प्रवास करायला आवडते. चीनमधील हाय-स्पीड नेटवर्क हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. अमेरिकेत केवळ १५ टक्के लोक रेल्वेने प्रवास करतात. तर ब्राझीलमध्ये हे प्रमाण १७ टक्के, मेक्सिकोमध्ये १३ टक्के आणि कोलंबियामध्ये ८ टक्के आहे.

हे देखील वाचा – आनंदाची बातमी..! 20 किमीपर्यंत टोलमाफी, ‘या’ गाड्यांना मिळणार सुविधा; केंद्र सरकारची मोठी घोषणा!

सिंगापूरमध्ये सर्वाधिक लोक करतात ट्रेनने प्रवास 

आशियाबद्दल बोलायचे झाले तर, या ठिकाणी सिंगापूरमध्ये सर्वाधिक 56 टक्के लोक रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. सिंगापूर हा एक छोटासा देश आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतातील ५३ टक्के लोक रेल्वेने प्रवास करतात. देशात दररोज 13,000 हून अधिक ट्रेन धावतात आणि सुमारे 2.4 कोटी लोक प्रवास करतात. देशातील अनेक शहरांमध्ये आता मेट्रो ट्रेन सुरू झाल्या आहेत. त्याचप्रमाणे तैवानमधील 50 टक्के लोकांची आणि जपानमधील 47 टक्के लोकांची रेल्वे ही आवडती वाहतूक आहे. ऑस्ट्रेलियातील ४९ टक्के लोक रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात.

Web Title: Train is more popular than india in these four countries more than half of the population travels

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 07:40 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Indian Railways

संबंधित बातम्या

Amrit Bharat 3.0 : आता सर्वसामान्यांना मिळणार वंदे भारतचा अनुभव, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! अमृत भारत 3.0 मध्ये काय खास?
1

Amrit Bharat 3.0 : आता सर्वसामान्यांना मिळणार वंदे भारतचा अनुभव, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! अमृत भारत 3.0 मध्ये काय खास?

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; ४२२ किमीच्या प्रवासात ३६० कंटेनरची विक्रमी वाहतूक
2

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; ४२२ किमीच्या प्रवासात ३६० कंटेनरची विक्रमी वाहतूक

Raksha Bandhan 2026 : भारतीय रेल्वेची प्रवाशांना भेट, रक्षाबंधनानिमित्त या रुट्सवर सोडणार स्पेशन गाड्या
3

Raksha Bandhan 2026 : भारतीय रेल्वेची प्रवाशांना भेट, रक्षाबंधनानिमित्त या रुट्सवर सोडणार स्पेशन गाड्या

जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट
4

जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.