Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : ट्रॅफिकमध्ये अडकलाय आणि ट्रेन सुटणार आहे? टेन्शन घेऊ नका, रेल्वे देते बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी

रेल्वे पकडण्यासाठी स्टेशनवर पोहोचायला उशीर झाला तर अनेकदा प्रवाशांची धावपळ होते. मात्र, काही नियमांनुसार शेवटच्या क्षणीही बोर्डिंग स्टेशन बदलण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 08, 2026 | 10:26 AM
Travel News : ट्रॅफिकमध्ये अडकलाय आणि ट्रेन सुटणार आहे? टेन्शन घेऊ नका, रेल्वे देते बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी

Travel News : ट्रॅफिकमध्ये अडकलाय आणि ट्रेन सुटणार आहे? टेन्शन घेऊ नका, रेल्वे देते बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी

Follow Us
Follow Us:
  • पहिला चार्ट तयार झाल्यानंतरही ठराविक वेळेपर्यंत बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा मिळू शकते.
  • बोर्डिंग स्टेशन बदलण्याचा पर्याय साधारणपणे एकदाच वापरता येतो, त्यामुळे नवीन स्टेशन निवडताना काळजी घ्या.
  • बोर्डिंग स्टेशन बदलल्यानंतर जुन्या स्टेशनवरून ट्रेन पकडल्यास रेल्वेच्या नियमानुसार कारवाई किंवा दंड होऊ शकतो.
रेल्वेच्या वेळेची काही शाश्वती देता येत नाही. कधी रेल्वे वेळेत स्टेशनवरुन सुटते तर कधी तासनतास उशीर करते. अशात प्रवांशांचा गोंधळ उडतो. बऱ्याचदा असं घडतं की, ट्रॅफिक किंवा काही अन्य कारणामुळे आपल्याला रेल्वे स्थानकावर जायला उशीर होतो. अशा परिस्थितीत आता रेल्वे आपल्याला भेटेल की नाही याची चिंता आपल्या मनाला सतावू लागते. बहुतेक प्रवाशांना वाटते की, रेल्वेचा फाइनल चार्ट तयार झाला आहे आणि यात आता बदल करता येणार नाही. पण असं खरंतर नाहीये… चार्ट तयार झाल्यानंतरही रेल्वे तुम्हाला तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देते. हे नक्की काय आहे आणि या सुविधेचा वापर कसा करता येतो ते चला सविस्तर जाणून घेऊया.

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी

रेल्वे सुटण्याच्या अर्धा तास आधी बदला स्टेशन

रेल्वे नियमांनुसार, जर तुमच्या रेल्वेचा पहिला चार्ट तयार झाला आहे. तरीही चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही ट्रेन सुरु होण्यापूर्वी साधारण ३० मिनिटांआधी आपले बोर्डिंग पॉइंट बदलू शकता. हे फार सोपे काम असून यासाठी तुम्हाला IRCTC च्या मोबाईल ॲपला सर्वप्रथम भेट द्यावी लागेल. याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या तुमचे बोर्डिंग स्टेशन चेंज करु शकता. हा उपाय शेवटच्या क्षणातील धावपळ टाळण्यासाठी उपयुक्त ठरतो.

फक्त एकदाच मिळतो पर्याय

लक्षात घ्या, रेल्वेचे बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी तुम्हाला वारंवार नाही तर फक्त एकदाच प्राप्त होते. जर तुम्ही घाईगडबीत रेल्वेने एकदा बोर्डिंग स्टेशन बदलले तर यात पुन्हा तुम्हाला बदल करता येणार नाही. यामुळेच आपले नवीन बोर्डिंग स्टेशन निवडताना काळजीपूर्वक निवडा.

जुन्या रेल्वे स्थानकावरुन चढल्यास आकारला जाईल दंड

रेल्वेच्या या नियमानुसार, तुम्ही आपले बोर्डिंग स्टेशन बदलल्यानंतर जर जुन्या रेल्वे स्थानकावरुन रेल्वे पकडली तर अशा परिस्थितीत तुमच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो. एकदा का बोर्डिंग स्टेशन बदलले की, मग जुन्या रेल्वे स्थानकावरुन तुम्ही रेल्वे पकडू शकत नाही. बोर्डिंग स्टेशन बदलल्यानंतर जुन्या रेल्वे स्थानकावरुन ट्रेन पकडणे म्हणजे रेल्वे नियमांचे उल्लंघन करणे आहे. टीटीईने जर तुम्हाला असे करताना पकडले तर विना तिकिट प्रवास करत असल्याचे मानून तुमच्यावर संबंधित कारवाई केली जाईल.

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी

काउंटर तिकिटासाठी वेगळी आहे पद्धत

जर तुम्ही तुमचे रेल्वे तिकिट ऑनलाईन बुक न करता, ऑफलाईन बुक केले असेल तर रेल्वे स्थानकावर जाऊन कागदी फाॅर्म भरुन तुम्हाला बोर्डिंग स्टेशन बदलता येईल. तुमच्या फाॅर्मच्या आधारे, रिझर्वेशन अधिकारी आपल्या प्रणालीत तुमचे नवीन रेल्वे स्टेशन अपडेट करेल.

 

Web Title: Railway boarding station change rules irctc train before departure nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • Indian Railway
  • IRCTC
  • Local Trains

संबंधित बातम्या

Mumbai News: कवच ५.०! दोन लोकलमधील अंतर होणार कमी, मुंबईकरांना मिळणार मोठा दिलासा
1

Mumbai News: कवच ५.०! दोन लोकलमधील अंतर होणार कमी, मुंबईकरांना मिळणार मोठा दिलासा

Railway Apprentice Bharti 2026: कोणतीही लेखी परीक्षा नाही! रेल्वेमध्ये ‘या’ जागांवर भरतीची मोठी संधी; आजच अर्ज करा
2

Railway Apprentice Bharti 2026: कोणतीही लेखी परीक्षा नाही! रेल्वेमध्ये ‘या’ जागांवर भरतीची मोठी संधी; आजच अर्ज करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.