
Trump’s Tariff Gift: Trump’s big announcement
Trump’s Tariff Gift: रविवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांसाठी नवीन घोषणा केली आहे. तसेच, त्यांच्यासाठी खास भेट डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिका मधील बहुतेक नागरिकांना “टॅरिफ डिव्हिडंड” म्हणून $2,000 रुपये मिळणार आहे. अमेरिकेच्या टॅरिफ महसूलातून जमा केलेली रक्कम अमेरिकन नागरिकांच्या खात्यात जाईल. मात्र, याबद्दल अधिकची माहिती समोर आलेली नाही.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांसाठी खास घोषणा केली आहे. ते लवकरच अमेरिकन नागरिकांना “टॅरिफ डिव्हिडंड” म्हणून $2,000 देणार असून ही रक्कम थेट नागरिकांच्या खात्यात जमा केली जाईल. जी रक्कम पूर्णपणे टॅरिफमधून आलेली असेल. तथापि, ही रक्कम कोणाला आणि केव्हा मिळेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर असे म्हणाले हे की ‘अमेरिका ट्रिलियन डॉलर्स टॅरिफमधून कमावत आहे. आणि हे पाऊल देशाच्या आर्थिक स्थिती स्थिर करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल आहे. देशावर असलेले $3.7 ट्रिलियन कर्ज कमी करण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. अद्याप ही रक्कम कोणत्या उत्पन्न गटांना मिळू शकते किंवा देयके कधी सुरू होतील हे अजूनही स्पष्ट करण्यात आलेले नाही.
सर्वोच्च न्यायालयात ट्रम्पच्या टॅरिफविरोधात तपासणी
अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांविरोधात अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर तपासणी सुरू असतानाच ही घोषणा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्या (IEEPA) अंतर्गत ट्रम्प यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे की नाही हे सर्वोच्च न्यायालयात ठरवण्यात येणार आहे. अनेक टॅरिफ राष्ट्रपतींसाठी अतिरेकी असल्याचे कनिष्ठ न्यायालयांनी घोषित केले असून आता, न्यायालयाच्या निर्णयावरून भविष्यातील राष्ट्रपती महसूल वाढवण्यासाठी एकतर्फी असे टॅरिफ लादू शकतात की नाही हे ठरवले जाईल. असं असूनही “जे टॅरिफला विरोध करतात ते मूर्ख आहेत!” असं विधान ट्रम्प् यांनी केलं आहे.
हेही वाचा : Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या भावात मोठा बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर
डोनाल्ड ट्रम्प् यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले असून त्यांच्या धोरणांमुळे अमेरिकन उत्पादनाला नवीन बळकटी मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. देशाचा शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर असून यामुळे रोजगारीत वाढ होत असल्याचेही ते म्हणाले. अमेरिका जगातील आज सर्वात श्रीमंत देश असून यावर्षी १९५ अब्ज डॉलर्सचे टॅरिफ वसूल करण्यात आले, जे मागील वर्षांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प् यांनी दिली.
रक्कम कोणाला आणि केव्हा मिळेल अद्याप स्पष्ट
अमेरिकन लोकांमध्ये ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. निधी कधी आणि कोणाला मिळेल याबद्दल लोकांना जाणून घ्यायचे आहे. या योजनेतून उच्च उत्पन्न असलेल्या नागरिकांना वगळण्यात येणार असून याबद्दल अद्याप स्पष्ट निकष निश्चित केलेले नसल्याचे ट्रम्प् यांनी सांगितले. जर ही योजना लागू झाली तर अमेरिकन अर्थव्यवस्थेत ग्राहक खर्च वाढण्याची शक्यता आहे. मात्र, तत्पूर्वी सर्वाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या टॅरिफच्या निर्णयाकडे लागले आहे.