Share Market Today: शेअर बाजारात आज अशी होणार सुरुवात, तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज! या शेअर्सवर गुंतवणूकदारांची नजर
जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज १० नोव्हेंबर रोजी, सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, स्थिर स्थितीत उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी स्थिर ते सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,६१४ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ २४ अंकांनी जास्त होता.
Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या भावात मोठा बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर
शुक्रवारी, भारतीय शेअर बाजाराने सलग तिसऱ्या सत्रात तोटा वाढवला आणि तो कमी पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स ९४.७३ अंकांनी म्हणजेच ०.११% ने घसरून ८३,२१६.२८ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १७.४० अंकांनी म्हणजेच ०.०७% ने घसरून २५,४९२.३० वर बंद झाला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक ३२२.५५ अंकांनी किंवा ०.५६% ने वाढून ५७,८७६.८० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक जिगर एस. पटेल यांनी पुढील एक ते दोन आठवड्यांसाठी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी काही शेअर्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये एलआयसी, हिंदुस्तान झिंक आणि बिर्लासॉफ्ट यांचा समावेश आहे. प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये बेलराईज इंडस्ट्रीज, अपीजय सुरेंद्र पार्क हॉटेल्स आणि गार्डन रीच शिप बिल्डर्स यांचा समावेश आहे.
आज खरेदी करण्यासाठी बाजारातील तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना काही शेअर्सची शिफारस केली आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये इंडियन मेटल्स अँड फेरो अलॉयज लिमिटेड, रेडिको खेतान लिमिटेड, ओबेरॉय रिअॅलिटी लिमिटेड, बँक ऑफ बडोदा , इन्फोसिस लिमिटेड, वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड (पेटीएम), टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेड आणि सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज लिमिटेड यांचा समावेश आहे.
Zudio असो की Westside, Tata च्या ‘या’ क्लोथिंग ब्रँडमधून लोक बॅगा भरभरून शॉपिंग करतात
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये एएसएम टेक्नॉलॉजीज , लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज, सिल्व्हर टच टेक्नॉलॉजीज, डीसीबी बँक आणि रामा फॉस्फेट्सचे शेअर्सचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार बजाज ऑटो, कल्याण ज्वेलर्स, न्याका, ट्रेंट, हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL), स्विगी, लेन्सकार्ट, एचएएल, लुपिन, स्विगी, बायोकॉन, नायका या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.






