
Union Budget 2026: कुठून आणि कसे डाऊनलोड करू शकता Budget चे PDF? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संपूर्ण भाषण कुठे पाहाल? जाणून घ्या
अनेक महत्त्वाच्या बदलांनंतर आता सर्वांचे लक्ष निर्मला सितारमन यांच्या आजच्या भाषणाकडे लागले आहे. शिक्षण, व्यापार, ऑटो, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घोषणा आज केल्या जाणार आहेत. कस्टम सुधार, फिस्कल कंसॉलिडेशन आणि इंफ्रास्ट्रक्चरवर अधित लक्ष केंद्रीत केले जाऊ शकते. कोविड काळानंतर केंद्रीय बजेट पेपरलेस म्हणजेच आता टॅब्लेटमध्ये सादर केले जात आहे. यासोबतच अर्थमंत्रालयद्वारे हे बजेट डिजिटली अपलोड देखील केले जाते. ज्यामुळे सर्वसामान्य लोकं या बजेटची पीडीएफ डाऊनलोड करू शकतात आणि त्यांच्यासाठी गरजेची असलेली माहिती मिळवू शकतात. तुम्हाला देखील बजेटची पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर तुम्ही काही सोप्या पद्धतींचा वापर करू शकता. (फोटो सौजन्य – AI Created)
अर्थमंत्री निर्मला सितारमन यांचे भाषण तुम्ही अर्थ मंत्रालयाच्या अधिकृत केंद्रीय बजेट वेबसाईट https://www.indiabudget.gov.in/index.php वरून डाऊनलोड करू शकता. या ठिकाणी तुम्हाला अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्या भाषणासोबतच बजेटमध्ये करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या घोषणांची यादी देखील मिळणार आहे. तसेच, तुम्ही येथून अर्थसंकल्पाशी संबंधित कागदपत्रे डाउनलोड करू शकता ज्यात वित्त विधेयकाचा समावेश आहे.
अर्थ मंत्रालयाने स्मार्टफोन यूजर्ससाठी केंद्रीय बजेट अॅप देखील जारी केला आहे. यूजर्स गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरद्वारे हा अॅप डाऊनलोड करू शकतात. जर तुमच्याकडे अँड्रॉईड 13 किंवा त्याहुन जुने ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे स्मार्टफोन असतील तर तुम्ही APK फाइल डाउनलोड करू शकता. अर्थ मंत्रालयाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या लिंकवरून तुम्ही ते डाउनलोड करू शकाल.
अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी पहिल्यांदा 2021-22 चे बजेट डिजिटली सादर केले होते. यामध्ये बजेटसाठी वापरले जाणाऱ्या लाल बॅगऐवजी छोट्या टॅब्लेटचा वापर करण्यात आला होता. कोवीड काळामुळे डॉक्युमेंट्स हँडल करणं अतिशय कठिण झालं होतं. याच कारणामुळे बजेट डिजीटली सादर करण्यात आले होते. तेव्हापासून, दरवर्षी अर्थमंत्री केंद्रीय अर्थसंकल्प डिजिटल पद्धतीने सादर करत आहेत.