
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
India Defence Export : अमेरिका-चीन सोडाच, पाकिस्तानपेक्षाही मागे भारत! कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?
खरं तर, चीनमधील शेन्झेन येथे राहणारा ३२ वर्षीय झांग शियाओशियाओ, लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्या पाठीवरील आणि शरीराच्या विविध भागांवरील खाज खाजवून देण्याची सेवा सुरु केली आहे. त्याचा दावा आहे की, त्याच्या दोन दुकानांमधून त्याला दरमहा सुमारे १,००,००० युआन, म्हणजेच अंदाजे १४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. या माहितीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे, कारण आतापर्यंत प्रत्येकजण आपली खाज खाजवण्यासाठी आपल्या जोडीदारावर किंवा कुटुंबावर अवलंबून होता. त्यांना सांगता मात्र आता लोकं यासाठी सर्व्हिस देऊ लागलेत.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, झांग यांना गेल्या वर्षी सोशल मीडियावरून या व्यवसायाची कल्पना सुचली. त्यांनी एका महिलेचा तिच्या नवऱ्याची पाठ खाजवतानाचा व्हिडिओ पाहिला होता. त्यावरील कमेंट्समध्ये, काही लोकांनी असे म्हटले होते की त्यांनाही आपली पाठ खाजवण्यासाठी पैसे द्यायला आवडेल. यामुळे झांग यांना प्रश्न पडला की, पाठ खाजवण्यासारख्या साध्या गोष्टीचे व्यावसायिक सेवेत रूपांतर करता येईल का. आणि त्यातून सुरु झाला या आयडियाचा प्रवास.
झांग यांनी ‘सुमा’ या नावाने हा व्यवसाय सुरू केला. त्याचे पहिले आउटलेट मे महिन्याच्या सुरुवातीला शेन्झेनच्या बाओआन भागात उघडले. सुमारे एका महिन्यानंतर फुटीयानमध्ये दुसरे आउटलेट उघडले. येथे एका तासाच्या सेवेसाठी सुमारे ३०० युआन, म्हणजेच अंदाजे ४,२०० रुपये चार्ज केले जातात. ग्राहक एका पलंगावर आरामात झोपतात आणि प्रशिक्षित कर्मचारी त्यांच्या शरीराचे वेगवेगळे भाग हळुवारपणे खाजवतात.
सुमाच्या कर्मचाऱ्यांना खास डिझाइन केलेली टोकदार नखे दिली जातात. शरीराच्या कोणत्या भागावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे, हे ग्राहक सूचित करू शकतात. ही सेवा आराम करण्याचा आणि तणाव कमी करण्याचा एक मार्ग म्हणून पाहिली जाते. काही ग्राहक तर असेही म्हणतात की यामुळे त्यांना चांगली आणि शांत झोप लागते.
झांग म्हणतात की त्यांच्या दोन्ही दुकानांनी आता खर्च भागवण्यास सुरुवात केली आहे आणि नफाही कमावत आहेत. आता ते हा हटके व्यवसाय संपूर्ण चीनमध्ये विस्तारण्याची योजना आखत आहेत. झांग यांना भविष्यात १०० स्क्रॅचिंग दुकाने उघडायची आहेत. त्यांचे ध्येय आहे की ही सेवा केवळ एक विचित्र किंवा अनोखी कल्पना न राहता, लोकांना आराम करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी एक नियमित सेवा बनावी.
काय सांगता… Electricity Bill येणार Zero! फक्त ‘हे’ एक काम करा; AC, कूलर, पंखे, मनसोक्त वापरा