
अमेरिकेत UPI ची एन्ट्री ( सौजन्य - सोशल मीडिया )जन्य - सोशल मीडिया )
बँक ऑफ अमेरिका अमेरिकेची पेमेंट प्रणाली Zelle भारताच्या UPI सोबत जोडण्यासाठी एका प्रायोगिक प्रकल्पावर काम करत आहे. अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे आणि जलद करणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. अमेरिकेत राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या भारतीयांना याचा विशेष फायदा होणार आहे. त्यामुळे आता थेट खात्यात डॉलर ट्रान्सफर करता येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प सध्या प्रायोगिक टप्प्यात सध्या सुरु आहे. २०२६ च्या अखेरपर्यंत तो उपलब्ध होण्याची शक्यता आहे. जर ही प्रणाली यशस्वी झाली, तर लोकांना अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणे अधिक सोपे होईल.
अमेरिका आता भारतासाठी परदेशातून येणाऱ्या रेमिटन्सचा म्हणजेच पैशाचा सर्वात मोठा स्रोत बनला आहे. आकडेवारीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताला अंदाजे १३५.४६ अब्ज डॉलर्सचे रेमिटन्स मिळाले, त्यापैकी अंदाजे ३७ अब्ज डॉलर्स अमेरिकेतून आले होते. त्यामुळे, UPI आणि Zelle यांना जोडण्याचा हा उपक्रम दोन्ही देशांमधील आर्थिक व्यवहारांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. त्यामुळे दोन्ही देशांना याचा मोठा फायदा होऊ शकतो.
झेल नेटवर्क ऑपरेटर ‘अर्ली वॉर्निंग सर्व्हिसेस’च्या सहकार्याने झेल-यूपीआय ब्रिजवर केला जात आहे. झेल हे अमेरिकेत वापरले जाणारे एक डिजिटल पेमेंट नेटवर्क आहे, तर यूपीआय ही भारतातील एक अग्रगण्य रिअल-टाइम डिजिटल पेमेंट प्रणाली म्हणून पाहिली जाते. या ब्रिजचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय पेमेंट सुलभ करण्यासाठी दोन्ही पेमेंट नेटवर्क्सना जोडणे हा आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की भारतीय यूपीआय ॲप्स आता अमेरिकेतही त्याच प्रकारे काम करतील जसे ते भारतात करतात.