Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Israel News : ट्रम्प यांचा मोठा निर्णय! वर्षअखेरीनंतर इस्रायलला अमेरिकेकडून आर्थिक मदत बंद होणार

US-Israel News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२६ वर्षअखेरीनंतर इस्रायलला दरवर्षी दिली जाणारी आर्थिक मदत थांबवण्याची घोषणा केली आहे. नेतन्याहू यांच्याशी करार झाल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, विद्यमान मदत करारात बदल कसा होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 03, 2026 | 08:59 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • नेतन्याहू यांच्याशी काही महिन्यांपूर्वीच करार झाल्याचा दावा
  • लष्करी मदतीबाबतही संभ्रम; शस्त्रविक्री सुरू राहणार?
  • अमेरिकेच्या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर परिणाम?
US-Israel News  : इस्रायल आणि अमेरिकेचे संबंध हे अत्यंत गुंतागुंतीचे आणि गहन आहेत . अमेरिकेत इस्रायल समर्थक यहुदी लोकांची संख्या जास्त आहे . पण ती संख्या फक्त आहे असे नसून अमेरिकेच्या मीडियापासून ते उद्योग धंद्यांपर्यंत यांची लॉबी इस्रायलसाठी काम करत असल्याच्या चर्चा आहेत . हे दोन्ही देश हे एकमेकांच्या राजकारणात देखील गुंतलेले आहेत .

याच अशा धर्तीवर आता अमेरिका आणि इस्रायलच्या दीर्घकालीन संबंधांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी झालेल्या कराराचा हवाला देत, २०२६ वर्ष संपल्यानंतर अमेरिका इस्रायलला दरवर्षी दिली जाणारी आर्थिक मदत थांबवणार असल्याचे जाहीर केले.

याआधीही इस्रायला दिल्या जाणाऱ्या आर्थिक आणि लष्करी मदतीवर अमेरिकेत आक्षेप नोंदवला गेला आहे .ट्रम्प यांनी मध्यावधी निवडणुकीदरम्यान फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. इस्रायलला आता या आर्थिक मदतीची गरज नसल्याचे सांगतानाच, भविष्यात गरज भासल्यास अमेरिका मदत करेल, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

नेतन्याहू यांच्याशी काही महिन्यांपूर्वीच करार झाल्याचा दावा

ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिका इस्रायलला दरवर्षी सुमारे ४ अब्ज डॉलरची मदत देते. मात्र, ही मदत बंद करण्याबाबत नेतन्याहू यांच्याशी काही महिन्यांपूर्वीच सहमती झाली होती. दोन्ही देशांनी या निर्णयाला मान्यता दिल्याचे त्यांनी म्हटले. इस्रायल आता आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि यशस्वी देश बनला असून त्याला अमेरिकेच्या आर्थिक मदतीवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वर्षअखेरीनंतर ही मदत थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

US Midterm Elections : अमेरिकेत मतदान सुरु; ट्रम्प यांची वाढली धाकधूक

लष्करी मदतीबाबतही संभ्रम; शस्त्रविक्री सुरू राहणार?

अमेरिकेकडून इस्रायलला मिळणाऱ्या मदतीमध्ये लष्करी अनुदान आणि क्षेपणास्त्र संरक्षणासाठीचा निधी महत्त्वाचा आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये २०१६ मध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार २०१९ ते २०२८ या कालावधीत ३८ अब्ज डॉलरची मदत देण्याची तरतूद आहे. म्हणजेच दरवर्षी साधारण ३.८ अब्ज डॉलरची मदत दिली जाते. ट्रम्प यांनी मदत बंद करण्याची घोषणा केली असली, तरी विद्यमान करारात बदल कसा केला जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अमेरिकेकडून इस्रायलला शस्त्रास्त्रांची विक्री मात्र सुरू राहण्याची शक्यता आहे.

Binance Crypto Heist : ६अब्ज डॉलरच्या क्रिप्टो चोरीवरून उत्तर कोरियाचा अमेरिकेला इशारा; हॅकिंगचे आरोप फेटाळले

अमेरिकेच्या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर परिणाम?

इस्रायलला दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा मुद्दा अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणातही चर्चेचा विषय बनला आहे. विशेषतः गाझा युद्धानंतर अमेरिकेतील काही राजकीय गटांकडून इस्रायलला दिल्या जाणाऱ्या मदतीवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची घोषणा महत्त्वाची मानली जात आहे.

मात्र, नेतन्याहू यांच्या कार्यालयाकडून या कथित कराराबाबत तातडीने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे ट्रम्प यांनी केलेली घोषणा प्रत्यक्षात कोणत्या स्वरूपात लागू होणार आणि त्याचा अमेरिका-इस्रायल संबंधांवर किती परिणाम होणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इस्रायलला आर्थिक मदत कधीपासून बंद करण्याची घोषणा केली?

    Ans: २०२६ वर्ष संपल्यानंतर अमेरिका इस्रायलला आर्थिक मदत देणार नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

  • Que: ट्रम्प यांनी हा निर्णय कोणाशी झालेल्या करारानुसार घेतल्याचे सांगितले?

    Ans: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी झालेल्या करारानुसार हा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला.

  • Que: अमेरिका इस्रायलला दरवर्षी किती आर्थिक मदत देते?

    Ans: अमेरिका इस्रायलला दरवर्षी साधारण ३.८ अब्ज डॉलरची लष्करी मदत देते.

Web Title: Trump us to end financial aid to israel after 2026cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 08:59 PM

Topics:  

  • America news
  • Israel
  • Marathi News

संबंधित बातम्या

Binance Crypto Heist : ६अब्ज डॉलरच्या क्रिप्टो चोरीवरून उत्तर कोरियाचा अमेरिकेला इशारा; हॅकिंगचे आरोप फेटाळले
1

Binance Crypto Heist : ६अब्ज डॉलरच्या क्रिप्टो चोरीवरून उत्तर कोरियाचा अमेरिकेला इशारा; हॅकिंगचे आरोप फेटाळले

Mumbai News : चेंबूरमध्ये होमलेनचे नवे एक्स्पिरियन्स सेंटर; मुंबईतील उपस्थिती आणखी मजबूत
2

Mumbai News : चेंबूरमध्ये होमलेनचे नवे एक्स्पिरियन्स सेंटर; मुंबईतील उपस्थिती आणखी मजबूत

US Midterm Elections : अमेरिकेत मतदान सुरु; ट्रम्प यांची वाढली धाकधूक
3

US Midterm Elections : अमेरिकेत मतदान सुरु; ट्रम्प यांची वाढली धाकधूक

Major Rishabh Singh Sambyal: देशसेवेनंतर ग्लॅमरस वर्ल्डमध्ये पाऊल! ‘या’ प्रसिद्ध नॅशनल क्रशने ब्रँडसोबत केले कोलॅबोरेशन
4

Major Rishabh Singh Sambyal: देशसेवेनंतर ग्लॅमरस वर्ल्डमध्ये पाऊल! ‘या’ प्रसिद्ध नॅशनल क्रशने ब्रँडसोबत केले कोलॅबोरेशन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.