Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vashi APMC Market : वाशी एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरीची आवक; 700 रु.किलोपर्यंत दर तर हवामान बदलाचा उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता

Vashi APMC Market : नवी मुंबईतील वाशी एपीएमसी बाजारात यंदा ऑक्टोबर महिन्यातच स्ट्रॉबेरीचे आगमन झाले आहे.20 ऑक्टोबर रोजी बाजारात 288 क्विंटल स्ट्रॉबेरीची आवक झाली. नाशिक, सापुतारा आणि महाबळेश्वर परिसरातून स्ट्रॉबेरी बाजारात दाखल, सध्या एका खोक्याची किंमत150 रुपये असून उच्च प्रतीच्या स्ट्रॉबेरीचे दर 600 ते 700 रुपये किलोपर्यंत आहे

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 21, 2026 | 03:31 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • यंदाच्या हंगामात सुरुवातीला आवक मर्यादित 
  • थंडीच्या काळात स्ट्रॅाबेरीचा हंगाम 
  • आवक वाढल्यानंतरच ग्राहकांना दरांमध्ये दिलासा 
Vashi APMC Market :  नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात हिवाळी हंगाम सुरू असल्याने ग्राहकांच्या पसंतीस असणाऱ्या स्ट्रॅाबेरीचे वाशी मार्केट आगमन झाले आहे. काल मंगळवारी 20 ऑक्टोबरला वाशीच्या एपीएमसी बाजारात तब्बल 288 क्विंटल स्टॅाबेरीची आवक झाली.

सध्याची दुष्काळ परिस्तिथी पाहता अनिश्चित पाऊस तसेच वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून यावर्षी स्ट्रॅाबेरीच्या हंगामात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

यंदाच्या हंगामात सुरुवातीला आवक मर्यादित

स्ट्रॅाबेरीचा हंगाम हा नोव्हेंबर पासून सुरू होतो. यंदाच्या वर्षी हा हंगाम ऑक्टोबरपासून सुरू झाला असून सध्या नाशिक, सापुतारा आणि महाबळेश्वर या भागांतून स्ट्रॉबेरीची आवक वाशीच्या एपीएमसी बाजारात झाली आहे

स्ट्रॉबेरीचे दर हे  तुलनेने अधिक आहेत. प्रतवारी, आकार आणि गुणवत्तेच्या दरामध्ये फरक पडतो. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात एका खोक्याची किंमत 150 रुपये असून उच्च प्रतीच्या स्ट्रॉबेरीचे भाव तब्बल 600 ते 700 रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत.

दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला पसंती; 8991 वाहनांची खरेदीसाठी नोंदणी

थंडीच्या काळात स्ट्रॅाबेरीचा हंगाम

स्ट्रॉबेरीचा हंगाम थंडीच्या काळात बहरतो, कारण स्ट्रॅाबेरीचे पीक थंड हवामानासाठी अनुकूल असते. स्ट्रॉबेरीसाठी तापमानातील चढ-उतार आणि अवकाळी पावसाचा परिणाम स्ट्रॉबेरीवर होऊ शकतो. यंदा हवामानात सातत्याने बदल होत असल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसमोवर  मोठे संकट निर्माण झाले आहेत.

आवक वाढल्यानंतरच ग्राहकांना दरांमध्ये दिलासा

महाबळेश्वर,पाचगणी आणि वाई हा भाग महाराष्ट्रातील स्ट्रॉबेरी उत्पादनाचा प्रमुख भाग मानला जातो. तसेच नाशिक मध्येही स्ट्रॉबेरीचे उत्पादन केले जाते. थंड वातावरणा मध्ये चांगल्या प्रतीची स्ट्रॉबेरी तयार होते.

तापमानातील वाढ उत्पादकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. तर प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनाचा कालावधी कमी झाल्यामुळे बाजारातील आवक आणि दरांवरही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

आगामी काळात थंडी कधी सुरू होत आहे आणि हवामान कसे राहते, यावर स्ट्रॉबेरीचे उत्पादन व बाजारातील उपलब्धता अवलंबून असेल. आवक मर्यादित राहिल्यास सध्याचे चढे दर टिकून राहण्याची शक्यता असून आवक वाढल्यानंतरच ग्राहकांना दरांमध्ये दिलासा मिळू शकतो.

Nepal Bans Indian Biscuits : नेपाळमध्ये भारतीय बिस्किटांवर बंदी! प्रशासनाकडून कठोर निर्णय; थेट दुकानांमधून स्टॉक काढण्याचे निर्देश

💡

Frequently Asked Questions

  • Que: वाशीच्या बाजारात स्ट्रॉबेरीची आवक किती झाली?

    Ans: वाशी बाजारात तब्बल 288 क्विंटल स्ट्रॉबेरीची आवक झाली

  • Que: स्ट्रॉबेरीचे दर किती

    Ans: सुमारे 150 रुपये तर उच्च प्रतीच्या स्ट्रॉबेरीचे दर 600 ते 700 रुपये किलोपर्यंत आहेत.

  • Que: स्ट्रॉबेरीचा हंगाम लवकर का सुरू झाला?

    Ans: यंदाऑक्टोबर महिन्यातच नाशिक, सापुतारा आणि महाबळेश्वर परिसरातून स्ट्रॉबेरीची आवक सुरू झाली

Web Title: Vashi apmc strawberry arrival price rises 700 per kg 2026 sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • APMC Market
  • Vashi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.