Google Drive ला टक्कर देणार! WhatsApp आणतंय भन्नाट फीचर, चॅट्सचा बॅकअप घेण्याची पद्धत बदलणार
WABetaInfo ने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप सध्या निवडक अँड्रॉईड बीटा यूजर्ससाठी नेटिव क्लाऊड बॅकअप स्टोरेजची चाचणी करत आहे. असं सागितलं जात आहे की, हे फीचर अँड्रॉईड वर्जन 2.26.46.4 च्या व्हॉट्सॲप बीटा वर्जनमध्ये पाहायला मिळाले आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सॲप 2GB कॉम्प्लिमेंट्री क्लाउड स्टोरेज देते. तर ज्या यूजर्सना जास्त स्टोरेजची आवश्यकता असते, असे यूजर्स व्हॉट्सॲप प्लस सब्सक्रिप्शनद्वारे हायर टियर्सची निवड करू शकता, ज्यामध्ये 100GB स्टोरेज मिळते. तर, यापेक्षा अधिक स्टोरेजची आवश्यकता असल्यास यूजर्स 4TB पर्यंत स्टोरेज एलोकेशनसह मेटा वन सब्सक्रिप्शनचा वापर करू शकतात. भारतात व्हॉट्सॲप प्लस प्लॅनची किंमत 79 रुपये प्रति महीना आहे, तर मेटा वन कोअर प्लॅनची किंमत 549 रुपये प्रति महीना आहे.
व्हॉट्सॲप क्लाऊड ॲक्सेस करण्यासाठी यूजर्सना एक ॲक्टिव्ह सबस्क्रिप्शन सुरु ठेवावे लागणार आहे. रिपोर्ट्सनुसार, सबस्क्रिप्शन संपल्यानंतर व्हॉट्सॲप त्यांच्या सर्वरवर लेटेस्ट बॅकअप चार महिन्यांपर्यंत सुरक्षित ठेवणार आहे. यूजर्सनी जर 4 महिन्यांपर्यंत त्यांचे सबस्क्रिप्शन रिन्यू केले नाही, तर हे स्टोरेज कायमस्वरुपी डिलीट केले जाणार आहे.
रिपोर्टमध्ये असं सांगितलं आहे की, व्हॉट्सॲपच्या कस्टम क्लाउड स्टोरेजवर अपलोड करण्यात आलेला डेटा डिफॉल्ट स्वरुपात एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असणार आहे. जर यूजर्सना व्हॉट्सॲप क्लाऊड स्टोरेजचा वापर सुरु ठेवायचा असेल तर सबस्क्रिप्शन बंद केले जाऊ शकत नाही. तसेच, ज्या यूजर्सना अनएन्क्रिप्टेड बॅकअप पाहिजे आहे, असे यूजर्स गूगल ड्राइव्ह किंवा आयक्लाउडसारख्या स्टँडर्ड क्लाउड प्रोव्हायडर्सचा वापर करू शकतात.
अकाऊंटची सुरक्षा वाढवण्यासाठी मेसेजिंग प्लॅटफॉर्म यूजर्सना कस्टम पासवर्ड, पासकी किंवा 64-डिजिटच्या एन्क्रिप्शन की चा वापर करून नेटिव्ह क्लाऊड बॅकअप लॉक करण्याची सुविधा देतात. असं सांगितलं जात आहे की, व्हॉट्सॲप क्लाऊड स्टोरेज सध्या काही निवडक यूजर्ससाठी उपलब्ध आहे. हे फीचर लवकरच iOS बीटा यूजर्ससाठी देखील रोलआऊट केले जाण्याची शक्यता आहे.






