चक्क सोन्याच्या रस्त्यावर फिरता येणार! या देशात जगातील पहिला 24 कॅरेट Gold Walkway, VIDEO पाहून थक्कच व्हाल!
दुबईच्या डीरा परिसरातील दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टमध्ये हा अनोखा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टचे वरिष्ठ संचालक रशीद अल हमूदी यांनी या प्रकल्पाची माहिती दिली आहे. २०२६ च्या अखेरपूर्वी हा वॉकवे सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, उद्घाटनाची निश्चित तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
Odisha News Viral : भूस्खलनात बेपत्ता, 14दिवसांनी सापडले! मेंढपाळामुळे शिक्षकाला मिळाले जीवदान
या प्रकल्पातील सर्वात आकर्षक बाब म्हणजे वॉकवेमध्ये २४ कॅरेट सोन्याचा वापर केला जाणार आहे. मात्र, यासाठी नेमके किती सोने लागणार, कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार, तसेच या वॉकवेची लांबी आणि एकूण खर्च किती असेल, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे संपूर्ण रस्ता ठोस सोन्याचा असेल, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.
दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टची सुरुवात जानेवारी २०२६ मध्ये करण्यात आली. सोने, दागिने, बुलियन, घाऊक व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. अधिकृत माहितीनुसार, या परिसरात १,००० हून अधिक रिटेल दुकाने आहेत.
२०२६ च्या सुरुवातीपासून या ठिकाणी नवीन घाऊक सोन्याच्या व्यापार कार्यालयांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर सोने, दागिने, मौल्यवान खडे आणि महागड्या घड्याळांशी संबंधित नवीन दुकानांच्या संख्येत १५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
गोल्ड वॉकवे उभारण्यामागे केवळ पर्यटकांना आकर्षित करणे एवढाच उद्देश नाही. तर दुबईला आंतरराष्ट्रीय सुवर्ण व्यापार आणि दागिन्यांच्या बाजारपेठेतील प्रमुख केंद्र म्हणून अधिक मजबूत ओळख मिळवून देण्याचाही प्रयत्न आहे. जानेवारी २०२६ मध्ये गोल्ड डिस्ट्रिक्टच्या उद्घाटनावेळी दुबई मीडिया ऑफिसने जगातील पहिली गोल्ड स्ट्रीट तयार करण्याच्या योजनेचा उल्लेख केला होता.
आता या प्रकल्पामुळे दुबईच्या पर्यटन क्षेत्राला आणखी एक नवे आकर्षण मिळण्याची शक्यता आहे. सोन्याच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात प्रत्यक्ष सोन्याच्या वॉकवेवरून चालण्याचा अनुभव घेण्यासाठी जगभरातील पर्यटक उत्सुक असतील.






