भारतात बी२बी प्रभावासाठी व्हिडिओ सर्वात लक्षवेधक, विश्वसनीय फॉर्मेट - लिंक्डइन
जगभरातील ८१ टक्के बी२बी जाहिराती पुरेसे लक्ष वेधून घेण्यास किंवा रिकॉलला चालना देण्यास अयशस्वी ठरल्यामुळे बी२बी मार्केटर्सना माहितीसाठी व्हिडिओ, इव्हेण्ट्स आणि उद्योग तज्ञांना प्राधान्य देत असलेल्या त्यांच्या ग्राहक समूहासोबत कनेक्ट व संलग्न होण्याकरिता अधिक लक्षवधेक मार्गांची गरज आहे. जगातील सर्वात मोठे व्यावसायिक नेटवर्क व आघाडीचे बी२बी जाहिरात प्लॅटफॉर्म लिंक्डइनच्या नवीन संशोधनामधून निदर्शनास येते की बी२बी मध्ये प्रभाव टाकणारे खरेदी निर्णय विकसित होत आहेत. तसेच या संशोधनामधून निदर्शनास येते की, प्रामाणिक कर्मचारी आणि त्यांचे नेटवर्क्स ब्रँड प्रतिष्ठेला आकार देण्यामध्ये महत्त्वाचे आहेत.
यूएस, यूके व भारतातील १,७०० हून अधिक बी२बी टेक ग्राहकांचे सर्वेक्षण केलेल्या लिंक्डइनच्या ‘द बिझनेस ऑफ इन्फ्लूएन्स’ संशोधनामधून ग्राहकांच्या माहिती मिळवण्याच्या पद्धती निदर्शनास येतात, जेथे व्हिडिओ बी२बी मधील खरेदी निर्णयांवर प्रभाव टाकणारा सर्वात लक्षवेधक व विश्वसनीय फॉर्मेट आहे. भारतातील ६६ टक्के बी२बी ग्राहक म्हणतात की, लहान स्वरूपातील सोशल व्हिडिओ कन्टेन्ट योग्य खरेदी निर्णय घेण्यामध्ये मदत करतो आणि व्हिडिओ कन्टेन्ट पाहणाऱ्यांपैकी बहुतांश (८३ टक्के) ग्राहक म्हणतात की व्हिडिओ-केंद्रित प्रभावक कन्टेन्ट बी२बी मध्ये कन्टेन्टचा सर्वात प्रभावी फॉर्मेट आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
हे देखील वाचा – एस्सार समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचे निधन; उद्योग जगतावर शोककळा!
लिंक्डइन डेटामधून निदर्शनास येते की व्हिडिओ आता प्लॅटफॉर्मवर झपाट्याने विकसित होणारा फॉर्मेट आहे, जेथे अपलोड्समध्ये वार्षिक ३४ टक्क्यांची वाढ झाली आहे आणि मार्केटर अहवाल ‘बी२बी व्हिडिओ मार्केटिंग इन २०२४’ च्या मते लिंक्डइन ब्रँड्ससाठी आघाडीचा बी२बी व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे.
सर्जनशील, विश्वसनीय कन्टेन्टमध्ये वाढ
संशोधनामधून निदर्शनास येते की, भारतातील बी२बी प्रभावक कन्टेन्टचा वापर करणाऱ्या सर्वेक्षण केलेल्या ग्राहकांपैकी ७२ टक्के ग्राहक म्हणतात की, यामुळे ब्रँड विश्वास वाढवण्यास मदत होते आणि ७० टक्के ग्राहक म्हणतात की, यामुळे विविध उत्पादने व सोल्यूशन्सबाबत जागरूकता निर्माण होते. भारतातील बी२बी प्रभावक विपणनाबाबत माहिती असलेले दोन-तृतीयांशहून अधिक (७० टक्के बी२बी ग्राहक म्हणतात की प्रभावक कन्टेन्ट आयटी खरेदी प्रक्रियेच्या विचारशील टप्प्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
सर्वेक्षण करण्यात आलेल्या सर्व बी२बी ग्राहकांपैकी जवळपास ५६ टक्के ग्राहक म्हणतात की टेक खरेदी प्रक्रियेमधील बी२बी विषय-तज्ञांचा वापर पुढील तीन वर्षांत वाढेल. जनरेशन झेड ग्राहकसमूहामध्ये सामील होत असताना प्रभावक विपणन अधिक महत्त्वाचे बनत आहे, जेथे बी२बी प्रभावक विपणनाबाबत माहित असलेले भारतातील ९३ टक्के जनरेशन झेड म्हणतात की ते दर महिन्याला बी२बी प्रभावक कन्टेन्टशी संलग्न होतात, जे इतर सर्व ग्राहकांच्या तुलनेत १४ टक्के उच्च आहे.
बाजारपेठेबाहेरील ९५ टक्के ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासोबत त्यांच्याशी संलग्न होणे आज जागतिक स्तरावर बी२बी मार्केटर्सना सामना करावे लागणारे मोठे आव्हान आहे. विशेषत: ८१ टक्के बी२बी ग्राहक पहिल्या दिवसापासून त्यांना माहिती असलेल्या ब्रँड्सकडून खरेदी करण्याला प्राधान्य देत असल्यामुळे आव्हानामध्ये अधिक वाढ झाली आहे. लिंक्डइन डेटामधून निदर्शनास येते की, ब्रँड्स ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांच्या १ बिलियनहून अधिक सदस्यांच्या समुदायाकडे वळत आहेत. गेल्या वर्षभरात मुख्य कार्यकारींकडून पोस्ट्समध्ये २३ टक्क्यांहून अधिक वाढ, लाइव्ह व्हिडिओ इव्हेण्ट्समध्ये १४.४ टक्के वाढ झाली आहे आणि लिंक्डइनवर २२० हजारांहून अधिक न्यूजलेटर्स प्रकाशित करण्यात आले आहेत.