Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! भारतीयांसाठी ग्‍लोबल फंड्सची घोषणा, १० डॉलर्सपेक्षा कमी रकमेसह गुंतवणूक शक्य

भारतीय गुंतवणूकदारांसाठी वॅनगार्ड, पीआयएमसीओ, फ्रँकलिन टेम्‍प्‍लटन आणि मॉर्गन स्‍टॅण्‍ली यांसारख्‍या प्रसिद्ध कंपन्‍यांद्वारे व्‍यवस्‍थापित ५० हून अधिक आंतरराष्‍ट्रीय फंड्समध्‍ये प्रत्‍यक्ष गुंतवणूक करण्याचा नवीन मार्ग..

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 04, 2025 | 02:21 PM
गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! भारतीयांसाठी ग्‍लोबल फंड्सची घोषणा, १० डॉलर्सपेक्षा कमी रकमेसह गुंतवणूक शक्य

गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! भारतीयांसाठी ग्‍लोबल फंड्सची घोषणा, १० डॉलर्सपेक्षा कमी रकमेसह गुंतवणूक शक्य

Follow Us
Close
Follow Us:

● गुंतवूणकदारांना गिफ्ट व लक्‍झमबर्ग-आधारित फंड उपलब्‍ध होतील.
● इक्विटी, निश्चित उत्‍पन्‍न आणि थीमॅटिक संधींमधील सक्रिय व निष्क्रिय धोरणे उपलब्‍ध
● गुंतवणूकदार १० डॉलर्स इतक्‍या कमी रकमेसह गुंतवणूक सुरू करू शकतात आणि कधीही रिडिम करू

मुंबई: वेस्‍टेड फायनान्‍स या भारतीयांसाठी जागतिक गुंतवणूक विशेषज्ञ कंपनीने आज (4 नोव्हेंबर) ग्‍लोबल फंड्सच्‍या लाँचची घोषणा केली. हा भारतीय गुंतवणूकदारांसाठी डीएसपी, ब्‍लॅकरॉक, वॅनगार्ड, पीआयएमसीओ, फ्रँकलिन टेम्‍प्‍लटन आणि मॉर्गन स्‍टॅण्‍ली यांसारख्‍या प्रसिद्ध कंपन्‍यांद्वारे व्‍यवस्‍थापित ५० हून अधिक आंतरराष्‍ट्रीय फंड्समध्‍ये प्रत्‍यक्ष गुंतवणूक करण्‍याचा नवीन मार्ग आहे.

गेल्‍या काही वर्षांपासून भारताबाहेर गुंतवणूक करणे गुंतागूंतीचे आणि महागडे वाटले आहे. बहुतांश व्‍यक्‍तींना फीडर फंड्स किंवा भारत-सूचीबद्ध ईटीएफवर अवलंबून राहावे लागत होते, जे फक्‍त काही पर्याय देतात, जास्त शुल्क आकारतात आणि गुंतवणूकदारांना प्रत्यक्षात काय मिळेल याबद्दल फारशी स्पष्‍टता देत नाहीत. यामध्‍ये बदल करण्‍यासाठी वेस्टेडचे ग्लोबल फंड्स उत्पादन डिझाइन करण्‍यात आले आहे.

पोस्ट ऑफिस आणि ईपीएफओतर्फे पेन्शनधारकांना मोठी भेट..! घरबसल्या मोफत जमा करता येणार ‘हे’ प्रमाणपत्र

“ग्‍लोबल फंड्ससहभारतीय गुंतवणूकदारांना फिडेलिटी, पीआयएमसीओ व ब्‍लॅकरॉक अशा काही प्रसिद्ध मालमत्ता व्‍यवस्‍थापन कंपन्‍यांकडून फंड मिळवण्‍यामध्‍ये येणारे अडथळे दूर करत आहोत,” असे वेस्‍टेड फायनान्‍सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व संस्‍थापक विराम शाह यांनी सांगितले. तसेच भारतातील आघाडीच्‍या मालमत्ता व्‍यवस्‍थापकांनी निर्माण केलेल्‍या गिफ्ट-आधारित फंड्सच्‍या उपलब्‍धतेसाठी डिजिटल प्रवास देखील प्रदान केला आहे. या लाँचमुळे जागतिक संस्था आणि श्रीमंत व्यक्‍ती भारतातील दैनंदिन गुंतवणूकदारांना समान संपत्ती निर्माण करण्‍याची साधने देऊ शकतात, जी साधी, पारदर्शक आणि नियमांचे पूर्णपणे पालन करणारी आहेत.”

ही नवीन ऑफरिंग भविष्‍याला आकार देत असलेल्‍या आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स, सेमीकंडक्‍टर्स, नवीकरणीय ऊर्जा, आरोग्‍यसेवा आणि उदयोन्‍मुख बाजारेठा अशा जागतिक थीम्‍समध्‍ये गुंतवणूक करण्‍याची संधी देते. गुंतवणूकदार युरोपियन व जपानी इक्विटीजपासून जागतिक बॉंड बाजारपेठांपर्यंत विविध भौगोलिक क्षेत्रे व मालमत्तावर्गांमध्‍ये देखील गुंतवणूक करू शकतात. तसेच, हे फंड्स कोणत्‍याही रूपया घसाराविरोधात संरक्षक म्‍हणून काम करू शकतात.

ग्‍लोबल फंड्स ऑफरिंग गिफ्ट सिटीचा पहिला रिटेल आऊटबाऊंड फंड, डीएसपी ग्‍लोबल इक्विटी फंड देखील ऑनलाइन उपलब्‍ध करून देते. वेस्‍टेडने भारतात अद्वितीय तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे गुंतवणूकदारांना स्‍थानिक म्‍युच्‍युअल फंड्स उपलब्‍ध होण्‍याच्‍या सुलभतेप्रमाणेच गिफ्ट सिटी फंड्स उपलब्‍ध करून देते. लवकरच, वेस्‍टेड एनआरआयना देखील इनबाऊंड गिफ्ट फंड्स उपलब्‍ध करून देईल, ज्‍यामुळे भारतात गुंतवणूक करण्‍याच्या संधी सहजपणे उपलब्‍ध होतील.

ग्लोबल फंड्समध्‍ये गुंतवणूक फक्‍त १० डॉलर्सपासून (जवळपास ८८० रूपये) पासून करता येऊ शकते आणि गुंतवणूकदारांना कोणताही प्रवेश किंवा निर्गमन शुल्‍क आकारले जात नाही. ग्लोबल फंड्समध्ये कर सवलती देखील आहेत. त्यांच्यावर यूएस इस्टेट टॅक्स लागू होत नाही, जो ४० टक्क्यांपर्यंत जास्त आहे. भारतात, देशांतर्गत कर्ज म्युच्युअल फंडांमधून मिळणाऱ्या नफ्यांप्रमाणेच कर आकारला जातो – गुंतवणूकदाराच्या उत्पन्‍न स्लॅब दराने अल्पकालीन नफा (२४ महिन्यांपेक्षा कमी) आणि दीर्घकालीन नफा १२.५ टक्‍के आहे. बेस्‍टेड फाइलिंग सुलभ करण्यासाठी तपशीलवार कर अहवाल देखील प्रदान करेल.

“भारतात बहुतांश पोर्टफोलिओ अजूनही केंद्रित आहेत,” असे शाह पुढे म्‍हणाले. ”शाश्वत संपत्ती निर्मितीसाठी जागतिक वैविध्‍यीकरणाची गरज आहे. यामुळे जोखीम कमी होण्‍यास आणि स्‍थानिक बाजारपेठातील संषर्षांपासून किंवा धोरणामधील बदलांपासून पोर्टफोलिओचे संरक्षण करण्‍यास मदत होते. यूएस व चीनमधील एआय असो किंवा युरोपमधील शुद्ध ऊर्जा परिवर्तन असो विकासाच्‍या गाथा जगभरात कुठेही होऊ शकतात. सुविधा उपलब्‍ध असल्‍याने भारतीय गुंतवणूकदार मागे न राहण्‍याची खात्री मिळेल.”

वेस्‍टेडने गुंतवणूक प्रक्रिया सोपी ठेवली आहे. अॅप किंवा वेबसाइटद्वारे जलद डिजिटल केवायसी आणि एलआरएस घोषणा पूर्ण केल्यानंतर गुंतवणूकदार इक्विटी, निश्चित उत्पन्‍न आणि थीमॅटिक धोरणांमध्ये ग्लोबल फंड्सची क्युरेटेड यादी ब्राउज करू शकतात. गुंतवणूक केल्यानंतर ते रिअल टाइममध्ये त्यांची कामगिरी आणि वैविध्यीकरण सर्वकाही एकाच ठिकाणी पाहू शकतात.

(नोट : कृपया कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.)

Share Market Today:गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर वाढली चिंता! तज्ज्ञांच्या इशाऱ्याने उडाला गोंधळ, अशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात

Web Title: Wested brought over 50 global funds to india backed by some of the world largest asset managers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 02:21 PM

Topics:  

  • Business News
  • india
  • world

संबंधित बातम्या

New York Mayor Election:  जोहरान ममदानी महापौर झाले तर…; निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची न्यू यॉर्कला धमकी
1

New York Mayor Election: जोहरान ममदानी महापौर झाले तर…; निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची न्यू यॉर्कला धमकी

Cyber frauds: देशात ३००० कोटींचा सायबर फ्रॉड! सुप्रीम कोर्टाचे जज हादरले; म्हणाले, ‘कठोर उपाययोजना आणि…’
2

Cyber frauds: देशात ३००० कोटींचा सायबर फ्रॉड! सुप्रीम कोर्टाचे जज हादरले; म्हणाले, ‘कठोर उपाययोजना आणि…’

PM Kisan Yojana: धक्कादायक! 2000 रूपयांचा हफ्ता मागू शकतात परत? थांबू शकतात तुम्हाला मिळणारे पैसे, काय आहे कारण
3

PM Kisan Yojana: धक्कादायक! 2000 रूपयांचा हफ्ता मागू शकतात परत? थांबू शकतात तुम्हाला मिळणारे पैसे, काय आहे कारण

Kia India ची ऐतिहासिक कामगिरी! ऑक्टोबर २०२५ मध्ये सर्वोत्तम मासिक विक्रीची नोंद; ३०% वार्षिक वाढ
4

Kia India ची ऐतिहासिक कामगिरी! ऑक्टोबर २०२५ मध्ये सर्वोत्तम मासिक विक्रीची नोंद; ३०% वार्षिक वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.