Share Market Today:गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर वाढली चिंता! तज्ज्ञांच्या इशाऱ्याने उडाला गोंधळ, अशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात
जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे मंगळवारी ४ नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, नाकारत्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,८६५ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ३४ अंकांनी कमी होता.
Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीचे दर गगनाला भिडले, आजचे भाव वाचून तुम्ही चक्रवाल
सोमवारी ३ नोव्हेंबर रोजी, भारतीय शेअर बाजार घसरणीच्या दरम्यान सकारात्मक बाजूने स्थिर राहिला, बेंचमार्क निफ्टी ५० २५,७५० च्या वर बंद झाला. सेन्सेक्स ३९.७८ अंकांनी म्हणजेच ०.०५% ने वाढून ८३ ,९७८.४९ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ४१.२५ अंकांनी म्हणजेच ०.१६% ने वाढून २५,७६३.३५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंटमधील डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स हेड चंदन टपारिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्स आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) चे शेअर्सचा समावेश आहे. तसेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार स्टेट बँक ऑफ इंडिया, अदानी एंटरप्रायझेस, महिंद्रा अँड महिंद्रा, वन९७ कम्युनिकेशन्स (पेटीएम), इंडिया हॉटेल्स, इंटरग्लोब एव्हिएशन (इंडिगो), टायटन, व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेल, झायडस लाईफसायन्सेस, सिप्ला, भारती हेक्साकॉम, पॉवर ग्रिड, ग्लँड फार्मा, हिरो मोटोकॉर्प या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.
Kia India ची ऐतिहासिक कामगिरी! ऑक्टोबर २०२५ मध्ये सर्वोत्तम मासिक विक्रीची नोंद; ३०% वार्षिक वाढ
प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये हिमातसिंगका सेइडे, एचएफसीएल आणि आयजीएल या शेअर्सचा समावेश आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये पीडीएस, झोटा हेल्थ केअर, रेमसन्स इंडस्ट्रीज, अक्युटास केमिकल्स आणि विजया डायग्नोस्टिक सेंटर या शेअर्सचा समावेश आहे.
याशिवाय बाजारातील इतर तज्ज्ञांनी देखील आज गुंतवणूकदारांसाठी काही शेअर्सची शिफारस केली आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये अलाइड ब्लेंडर अँड डिस्टिलर लिमिटेड, बजाज कंझ्युमर केअर लिमिटेड, इन्फोसिस लिमिटेड, बजाज फायनान्स लिमिटेड, एनटीपीसी लिमिटेड, बँको प्रोडक्ट्स (इंडिया) लिमिटेड, पीआय इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अनंत राज लिमिटेड या शेअर्सचा समावेश आहे.






