
पशुपालनातून कमाईची मोठी संधी! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakta Yojana: शेतीवरच सगळं अवलंबून राहिलो तर कधी दुष्काळ, कधी भाव नाही, असं होतं. हेच बघून महाराष्ट्र सरकारने एक जबरदस्त योजना आणली आहे. त्याच नाव मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना आणली आहे. या योजनेतून तुम्ही गाय, म्हैस, शेळीपालन, कोंबडीपालन असा स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता आणि त्यासाठी 50% ते 75% पर्यंत पैसा सरकार देणार आहे. तुमचे अर्ध्यापेक्षा जास्त पैसे वाचणार.
तुम्हाला शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करायचं असेल तर सरकार तुम्हाला अनुदान देणार.यात तुम्ही हे व्यवसाय करू शकता:
गाई-म्हशींचा गोठा – 2, 4 किंवा 6 जनावरांचा गट
शेळी-मेंढी पालन – 50 शेळ्या आणि 5 बोकडचा प्रोजेक्ट
कोंबडीपालन – पोल्ट्री फार्म
या योजनेचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला रोजचं उत्पन्न सुरु होतं. पीक आलं नाही तरी दुधाचे, अंडीचे, मटणाचे पैसे रोज हातात येतात. आणि ज्याच्याकडे जमीन नाही तो पण हा व्यवसाय करू शकतो. भाड्याने जागा घेऊन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. आता पारंपारिक पद्धत सोडून आधुनिक पद्धतीने पशुपालक उद्योजक बनण्याची वेळ आली आहे.
आता सगळं ऑनलाईन झालं आहे. तुम्हाला कुठेही ऑफिसमध्ये जायची गरज नाही. MahaDBT 2.0 या पोर्टलवरून अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची पद्धत:सगळ्यात आधी mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जा. तिथे तुमचा Maha ID किंवा आधार नंबर टाकून लॉगिन करा. तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो टाका.लॉगिन झाल्यावर तुम्हाला सगळ्या योजनांची लिस्ट दिसेल. त्यात पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग शोधा. त्यात मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना दिसेल, त्यावर क्लिक करा.आता तुमची माहिती, जमिनीची माहिती, बँकेची माहिती भरा आणि कागदपत्रं अपलोड करा आणि सबमिट करा.
आधार कार्ड – मोबाईल नंबर लिंक असलेलं पाहिजे
मतदार ओळखपत्र, पासपोर्ट फोटो
रहिवासी दाखला, रेशन कार्ड
7/12 आणि 8-अ उतारा
बँकेचं पासबुक – आधार लिंक असलेलं राष्ट्रीयकृत बँकेचं
जर जमीन नसेल तर 5 वर्षाचा भाडेकरार किंवा भूमिहीन दाखला
अल्पभूधारक दाखला, फार्मर ID
पशुपालनाचं ट्रेनिंग घेतलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट
आणि सगळ्यात महत्त्वाचं – 12 सप्टेंबर 2001 नंतर 3 पेक्षा जास्त मुलं नाहीत याचं शपथपत्र
सरकारने सगळ्यांसाठी वेगवेगळं अनुदान ठेवलं आहे.
सर्वसाधारण लोकांसाठी – 50% अनुदान, 50% तुम्हाला भरायचं
SC/ST प्रवर्गासाठी – 75% अनुदान, फक्त 25% तुम्हाला भरायचं
महिला, दिव्यांग आणि अल्पभूधारक शेतकरी – यांना प्राधान्य आणि 75% पर्यंत अनुदान
शेळीपालन (50 शेळ्या + 5 बोकड) चा खर्च 4 ते 6 लाख येतो. यात सर्वसाधारणला 2 ते 3 लाख अनुदान मिळेल आणि SC/ST ला 3 ते साडेचार लाख मिळेल.गाई-म्हशीचा गट – 2 ते 8.50 लाख खर्च. यात सर्वसाधारणला 1 ते 4.25 लाख आणि SC/ST ला 1.50 ते 6.37 लाख अनुदान मिळेल.
यात कोणताही दलाल नाही. अनुदानाची रक्कम थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे. DBT द्वारे पैसा येईल. गावात राहूनच जर व्यवसाय करायचा असेल तर यापेक्षा भारी योजना नाही. जमीन कमी असली तरी चालेल, पण जिद्द असेल तर तुम्ही महिन्याला 30-40 हजार सहज कमवू शकता.