
फोटो सौजन्य - Social Media
बजेट तयार करणे हे आर्थिक व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे केवळ आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करत नाही, तर आपल्या आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यातही उपयोगी ठरते. स्मार्ट आर्थिक नियोजन म्हणजे केवळ बचत नाही, तर ती एक अशी प्रक्रिया आहे जी तुमचे जीवन अधिक नियोजित आणि तणावरहित बनवते. चला, आज जाणून घेऊया की आपण स्मार्ट पद्धतीने बजेट कसे तयार करू शकतो?
बजेट तयार करण्याची सुरुवात तुमच्या उत्पन्न (Income) आणि खर्च (Expenses) समजून घेण्यापासून होते. सर्वप्रथम तुमच्या मासिक उत्पन्नाचा सटीक अंदाज लावा. यामध्ये केवळ पगाराचा विचार न करता इतर कोणत्याही स्रोतांमधून मिळणारे पैसे समाविष्ट करा. त्यानंतर तुमचे खर्च ट्रॅक करा. कमीतकमी एक महिना तुमचे सर्व खर्च नोंदवा. यात घरभाडे, वीज बिल, ग्रोसरी, औषधे, मनोरंजन, प्रवास आणि अन्य लहानमोठे खर्च समाविष्ट करा. ही माहिती मिळवल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमचे पैसे कुठे जात आहेत आणि कोणते खर्च कमी करून बचत करता येईल.
बजेट तयार करताना तुमच्या बचतीचे उद्दिष्ट (Savings Goal) ठरवा.
उदा. जर तुमचा पगार ₹30,000 असेल, तर ठरवा की पुढील 6 महिन्यांत ₹50,000 कसेही करून वाचवायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे बजेट अधिक प्रभावीपणे तयार करू शकाल आणि तुमची बचतही वाढेल.
स्मार्ट बजेट तयार करण्यासाठी 50-30-20 नियम उपयुक्त ठरतो. पगारातील 50% गरजेच्या खर्चांसाठी वापरा. जसे की, घरभाडे, वीज बिल, ग्रोसरी, औषधे यांसारखे आवश्यक खर्च, इत्यादी. पगारातील 30% आपल्या इच्छांसाठी वापरा. जसे कि, मनोरंजन, प्रवास, किंवा जीवनशैली सुधारण्यासाठी खर्च. पगारातील उर्वरित 20% पगाराची बचत करा तसेच ही रक्कम तुम्ही गुंतवणुकीसाठी एकंदरीत फिक्स्ड डिपॉझिट, म्युच्युअल फंड्स, किंवा इतर गुंतवणूक योजनांसाठी वापरू शकता.
डिजिटल टूल्स आणि अॅप्सचा वापर करा
आज डिजिटल युगात बजेट तयार करणे अधिक सोपे झाले आहे. खालील अॅप्सचा उपयोग करून तुम्ही बजेट व्यवस्थित करू शकता. यासाठी तुम्ही Money Manager, Khatabook, Walnut तसेच YNAB या ऍप्लिकेशनचा उपयोग करू शकता. तांत्रिकतेचा कमी वापर करणाऱ्यांसाठी Excel किंवा Google Sheets हा एक चांगला पर्याय आहे.
बजेट बनवताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. इमर्जन्सी फंड म्हणून अचानक उद्भवणाऱ्या खर्चांसाठी काही पैसे बाजूला ठेवा. आरोग्य आणि आयुष्य विम्यासाठी पैसे राखून ठेवा, जेणेकरून तुमच्या सेव्हिंग्ज सुरक्षित राहतील. दर महिन्याला बजेटचे पुनरावलोकन करून पाहा की तुम्ही तुमच्या उद्दिष्टांच्या दिशेने प्रगती करत आहात का. आवश्यक ते बदल करा आणि स्मार्ट पद्धतीने आर्थिक नियोजन करत रहा. स्मार्ट बजेटिंग तुमचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासोबत तुमच्या आयुष्याला स्थिर आणि नियोजित बनवते.