Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘देश का नमक’ मागचा चेहरा कोण? टाटांच्या १४ कंपन्यांची धुरा सांभाळणाऱ्या ‘या’ व्यक्तीची कहाणी थक्क करणारी

भारतातील घराघरात पोहोचलेल्या टाटा सॉल्टच्या यशामागे दूरदृष्टी असलेल्या दरबारी सेठ यांचा मोठा वाटा होता. मात्र त्यांची ओळख केवळ टाटा सॉल्टपुरती मर्यादित नव्हती. टाटा समूहातील रसायन आणि चहा व्यवसायाला पुढे नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 20, 2026 | 02:17 PM
‘देश का नमक’ मागचा चेहरा कोण? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

‘देश का नमक’ मागचा चेहरा कोण? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • टाटा सॉल्टच्या यशामागे दरबारी सेठ यांची महत्त्वाची भूमिका
  • १९४३ मध्ये ज्युनिअर इंजिनिअर म्हणून केली कारकिर्दीची सुरुवात
  • ‘केमिकल किंग’ आणि ‘टी किंग’ म्हणून मिळवली विशेष ओळख
 

Who was Darbari Seth: भारतामध्ये असे काही ब्रँड आहेत. त्यांची आपल्याला ओळख करुन देण्याची गरज भासत नाही. त्या वस्तूचे नाव घेतले की, दुकानदार त्याच ब्रँड वस्तू आपल्याला आणून देतो.त्यापैंकी एक म्हणजे टाटा सॉल्ट. दुकानात मीठ मागितले की आपल्या डोळांसमोर येत देत म्हणजे टाटा सॉल्ड. रोज जेवणात वापरले जाणारे मीठ आजचे इतके सामान्य वाटते, त्यामागे एका दूरदृष्टी असलेल्या व्यक्तीचे नाव ते म्हणजे दरबारी सेठ. ते टाटा समूहातील एक अत्यंत प्रभावी व्यक्ती मानले जाते. त्यांचे नाव केवळ मीठापुरते मर्यादित नव्हते. रसायन उद्योगापासून चहाच्या व्यवसायापर्यंत टाटा समूहाला पुढे नेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. म्हणूनच त्यांना ‘केमिकल किंग’ आणि ‘टी किंग’ अशी ओळखही मिळाली.

कोण आहेत दरबारी सेठ?

दरबारी सेठ यांनी 1943 मध्ये टाटा केमिकल्समध्ये ज्युनिअर इंजिनिअर म्हणून कामाला सुरुवात केली. त्या काळात त्यांच्यासमोर मोठ्या पदाचे स्वप्न नव्हते, पण काम करण्याची जिद्द नक्की होती. ही वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेचा मार्ग धरला.

सिनसिनाटी विद्यापीठातून त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर अमेरिकेतील Dow Chemicals मध्ये काम करताना त्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योग व्यवस्थापनाचा अनुभव मिळाला. भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी पुन्हा टाटा केमिकल्समध्ये जबाबदारी स्वीकारली. याच काळात त्यांच्या कामाची खरी छाप दिसू लागली.

मिठापूरच्या जमिनीवर उभा केला मोठा उद्योग

गुजरातमधील मिठापूर येथे टाटा केमिकल्सचा प्रकल्प उभारण्यामागे दरबारी सेठ यांची महत्त्वाची भूमिका होती. ज्या ठिकाणी उद्योग उभा करणे सोपे नव्हते, तिथे त्यांनी तांत्रिक ज्ञान आणि नियोजनाच्या जोरावर प्रकल्प उभा केला. सुरुवातीच्या अडचणी पार करत हा व्यवसाय पुढे नेणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण सेठ यांनी केवळ प्रकल्प उभारण्यावर समाधान मानले नाही. तो व्यवसाय मजबूत आणि फायदेशीर करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. याच दूरदृष्टीतून पुढे भारतातील सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या मीठाच्या व्यवसायाला नवी दिशा मिळाली.

‘टाटा सॉल्ट’ची कल्पना कशी पुढे आली?

भारतात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या साध्या मिठाला दर्जेदार आणि विश्वासार्ह ब्रँडचे रूप देता येईल, असा विचार त्या काळात फारसा सामान्य नव्हता. दरबारी सेठ यांनी मात्र ही संधीचे सोने केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतात आयोडाइज्ड आणि व्हॅक्यूम- इव्हॅपोरेटेड मीठ ब्रँडच्या स्वरूपात आणण्याचा मार्ग तयार झाला. पुढे याच प्रवासातून टाटा सॉल्टने भारतीय बाजारात आपले स्थान निर्माण केले. त्यानंतर टाटाला ‘देश का नमक’ अशी ओळख मिळाली. टाटा मीठाची ओळख देशभर पोहोचले.

3.3 कोटींची नोकरी सोडून घेतला मोठा निर्णय! Googleचा माजी कर्मचारी आता नेमकं काय करतोय?

मीठासोबत चहाच्या व्यवसायातही मोठी झेप

दरबारी सेठ यांचे योगदान फक्त टाटा केमिकल्सपुरते राहिले नाही. चहाच्या व्यवसायातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 1980च्या दशकात जेम्स फिनले कंपनीने भारतातील आपला व्यवसाय कमी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या चहाच्या मळ्यांमध्ये टाटा समूहाने संधी पाहिली. दरबारी सेठ यांच्या नेतृत्वाखाली या व्यवसायाला टाटा समूहाच्या छत्राखाली आणण्याचे काम झाले. यातून पुढे टाटा टीच्या विस्ताराला बळ मिळाले. म्हणजेच एका बाजूला मीठ आणि दुसऱ्या बाजूला चहा भारतीय घरातील दोन रोजच्या वापराच्या वस्तूंमध्ये टाटा समूहाची मजबूत उपस्थिती निर्माण करण्यात सेठ यांचा हात होता.

14 पेक्षा जास्त कंपन्यांची जबाबदारी

दरबारी सेठ यांच्या कामावर टाटा समूहाचा विश्वास किती मोठा होता, याचा अंदाज त्यांच्या जबाबदाऱ्यांवरून येतो. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 14 हून अधिक टाटा कंपन्यांचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. याशिवाय सुमारे 20 कंपन्यांच्या संचालक मंडळावरही त्यांची भूमिका होती. टाटा समूहाशी त्यांचा संबंध तब्बल 52 वर्षांचा होता. एवढ्या प्रदीर्घ काळात त्यांनी केमिकल्स आणि ग्राहकवस्तूंच्या व्यवसायाला मजबूत पाया दिला.

Gold Silver Price Today: आज चमकलं सोनं-चांदी, 2% चांदीच्या दरात वाढ, एका रात्रीत कसे वाढले दर

आजही कामातून जिवंत असलेली आठवण

8 डिसेंबर 1999 रोजी दरबारी सेठ यांचे निधन झाले. पण एखाद्या व्यक्तीचे मोठेपण त्याच्या पदावरून नाही, तर त्याने मागे काय उभे केले यावर ठरते. आज स्वयंपाकघरातील मिठाचा डबा उघडताना किंवा टाटाचा चहा कपात ओतताना कदाचित दरबारी सेठ यांचे नाव आठवत नसेल. पण या दोन्ही व्यवसायांच्या पायाभरणीत त्यांचे योगदान मोठे आहे.

Web Title: Who was darbari seth the man behind tata salts success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • Business Man
  • Business News
  • Tata

संबंधित बातम्या

DHL Express ग्राहकांना मोठा झटका! १ जानेवारी २०२७ पासून भारतात शिपिंग शुल्क ८.९% वाढणार, कंपनीने केली घोषणा
1

DHL Express ग्राहकांना मोठा झटका! १ जानेवारी २०२७ पासून भारतात शिपिंग शुल्क ८.९% वाढणार, कंपनीने केली घोषणा

टाटा एरिस की मारुती डिझायर? कोणती घ्यायची? जाणून घ्या किंमत आणि फीचर्सची तुलना
2

टाटा एरिस की मारुती डिझायर? कोणती घ्यायची? जाणून घ्या किंमत आणि फीचर्सची तुलना

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा
3

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा

काय सांगता… ऑनलाईन तणनाशक विक्री? Amazon, Flipkart अन् JioMart ला मोठा झटका! नियमांच्या उल्लंघनामुळे मोठी कारवाई
4

काय सांगता… ऑनलाईन तणनाशक विक्री? Amazon, Flipkart अन् JioMart ला मोठा झटका! नियमांच्या उल्लंघनामुळे मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.