Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यवतमाळात १८ हजार महिला लखपती दीदी; महिला सक्षमीकरणाला बळ; कर्जाची परतफेड ९९ टक्के

यवतमाळ जिल्ह्यात १८ हजार महिला ‘लखपती दीदी’ बनल्या असून, महिला सक्षमीकरणाला मोठे बळ मिळाले आहे. बचतगटांच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची परतफेड ९९ टक्क्यांपर्यंत झाल्याने हा उपक्रम यशस्वी ठरला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 20, 2026 | 06:43 PM
यवतमाळात १८ हजार महिला लखपती दीदी; महिला सक्षमीकरणाला बळ; कर्जाची परतफेड ९९ टक्के

यवतमाळात १८ हजार महिला लखपती दीदी; महिला सक्षमीकरणाला बळ; कर्जाची परतफेड ९९ टक्के

Follow Us
Follow Us:

यवतमाळ येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने जिल्ह्यात महिला सक्षमीकरणासाठी व्यापक कार्य सुरू असून शासनाच्या ‘लखपती योती योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत हजार महिला ‘लखपती दीदी‘ बनल्या, अशी माहिती यवतमाळच्या माविम कार्यालयाकडून देण्यात आली. माविममार्फत १० तालुक्यांतील ४२१ गावांमध्ये स्वयं सहाय्य बचत गटांद्वारे विविध योजनांची अंमलबजावणी होत असून ‘नवतेजस्विनी’ प्रकल्पांतर्गत ६८७६ बचत गटांमधून ७६,९६४ महिला संघटित झाल्या, बँकांकडून दरवर्षी सुमारे १२० कोटींचे कर्ज उपलब्ध होत असून परतफेड दर ९९ टक्के आहे. कृषी सेवा केंद्र, शेळीपालन, दालमिल, हळद प्रक्रिया, गारमेंट्स आदी विविध व्यवसायांतून ४२,४६१ महिला उद्योजक बनल्या आहेत. १६ ‘ड्रोनसखी’ प्रशिक्षण घेत असून शेतफवारणीसाठी ड्रोन सेवा सुरू आहे. विविध निधीतून ई-रिक्षा, ड्रोन, कृषी अवजारे आदींसाठी आर्थिक सहाय्य दिले जात आहे.

‘लखपती दीदी’ योजना ही शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्याचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आहे. या योजनेद्वारे महिलांचे वार्षिक उत्पन्न किमान १ लाख रुपये करण्याचा शासनाचा मानस आहे. महिला स्वयंसहायता गटांशी जोडलेल्या महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे. ग्रामीण महिलांना उद्योजकता आणि तंत्रज्ञानाशी जोडून त्यांना ‘लखपती’ बनवणे आहे स्वयं सहाय्यता गटांसाठी २० लाख रुपयांपर्यंतचे विनातारण बैंक कर्ज उपलब्ध केले जाते.

स्टेनोग्राफी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात! सरकारच्या निर्णयामुळे नाराजी; संघटनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

तसेच महिला स्वयं सहाय्यता गटांनी बँका, वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जावर बँकांच्या कर्जदर आणि ७ टक्के यांतील फरक भागविण्यासाठी व्याज अनुदान दिले जाते. हे अनुदान प्रत्ति स्वयं सहाय्यता गट कमाल ३ लाख रुपयांपर्यंत आहे. यासोबतच जन-धन खाते असलेल्या प्रत्येक स्वयं सहाय्यता गटातील महिला सदस्यांना ५ हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट मर्यादा मिळण्यास पात्रता आहे.

योजनेचे प्रमुख फायदे

महिलांना स्वयंरोजगार, शेतीशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना विक्रीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडले जाते.
जिल्हा उद्योग केंद्राची प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, कृषी विभागाची पीएमएफएमई योजना, मुद्रा योजनेतून मायक्रो इंटरप्राईज निर्मितीकरिता कर्ज पुरवठा उपलब्ध केल्या जातो.

पात्रता निकष व कागदपत्रे

अर्जदार महिला भारताची कायमस्वरूपी रहिवासी असावी.
महिला कोणत्याही स्वयंसहायता गटाची सदस्य असणे अनिवार्य आहे.
आधार कार्ड, पॅन कार्ड, बैंक पासबुक बैंक खाते आधारशी लिंक असावे.
स्वयंसहायता गटाचे प्रमाणपत्र/ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मोबाईल नंबर, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला इ. कागदपत्रे आवश्यक.

एकूण बचत गट – ६८७६
संघटित महिला – ७६९६४
महिला उद्योजक – ४२४६१

Mumbai News : अकार्यक्षम प्रशासनामुळे भांडुपकरचा जीव धोक्यात, बस अपघातांवरून उबाठा गटाचे तीव्र आंदोलन

Web Title: Yavatmal lakhpati didi women empowerment loan repayment news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • Lakhpati Didi Scheme
  • maharashtra
  • Yavatmal

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
2

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
3

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.