Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झोमॅटो-जिओ फायनान्शिअलचा निफ्टी 50 नामांकित कंपन्यांमध्ये समावेश; काही दिवसांपूर्वीच फ्यूचर अँड ऑप्शन्समध्येही समावेश!

रिलायन्स इंडस्ट्रीजची शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड आणि झोमॅटो या कंपन्यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी 50 मध्ये सहभागी करुन घेण्यात आले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 16, 2024 | 03:58 PM
झोमॅटो-जिओ फायनान्शिअलचा निफ्टी 50 नामांकित कंपन्यांमध्ये समावेश; काही दिवसांपूर्वीच फ्यूचर अँड ऑप्शन्समध्येही समावेश!

झोमॅटो-जिओ फायनान्शिअलचा निफ्टी 50 नामांकित कंपन्यांमध्ये समावेश; काही दिवसांपूर्वीच फ्यूचर अँड ऑप्शन्समध्येही समावेश!

Follow Us
Close
Follow Us:

रिलायन्स इंडस्ट्रीजची शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड आणि झोमॅटो या कंपन्यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी 50 मध्ये सहभागी करुन घेण्यात आले आहे. एनएसईने दोन्ही कंपन्यांना काही दिवसांपूर्वी फ्यूचर अँड ऑप्शन्समध्ये ट्रेड करण्यासाठी सहभागी करुन घेतले आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2025 महिन्यात निफ्टी इंडेक्सची फेररचना केली जाऊ शकते. त्यावेळी काही स्टॉक्सचा समावेश निफ्टी 50 मध्ये केला जाऊ शकतो. काही स्टॉक्सला निफ्टी 50 मधून बाहेर केले जाऊ शकते.

जिओ फायनान्शिअलचा स्टॉक्स निफ्टी 50 मध्ये समाविष्ट

ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलनुसार झोमॅटो आणि जिओ फायनान्शिअलच्या स्टॉक्सला निफ्टी 50 समाविष्ट केले जाऊ शकते. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड आणि आयशर मोटर्स कंपन्यांना देखील निफ्टी 50 मध्ये स्थान दिले जाऊ शकते. झोमॅटो आणि जिओ फायनान्शिअल या कंपन्यांना निफ्टी 50 मध्ये घेतल्याने अनुक्रमे या दोन्ही कंपन्यांमध्ये 607 दक्षलक्ष डॉलर्स आणि 372 दशलक्ष डॉलर्सचा इन्फ्लो पाहायला मिळू शकतो. याशिवाय बीपीसीएल आणि आयशर मोटर्समध्ये अनुक्रमे 223 आणि 239 दशलक्ष डॉलर्सचा आऊट फ्लो दिसू शकतो.

हे देखील वाचा – वाढत्या महागाईतच भाजीपाल्याच्या दरात वाढ; टोमॅटो, कांदा, बटाट्याचे दर भिडलेत गगनाला!

झोमॅटोच्या शेअरमध्ये 4.36 टक्के परतावा

झोमॅटो आणि जिओ फायनान्शिअल या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या शेअर धारकांना गेल्या काही महिन्यांमध्ये जोरदार परतावा दिला आहे. झोमॅटोच्या शेअरमध्ये गुरुवारी (ता.१६) 4.36 टक्के परतावा पाहायला मिळाला आहे. शेअर बाजार बंद झाला. तेव्हा झोमॅटोचा शेअर 269.66 रुपयांवर होता. 2024 मध्ये झोमॅटोच्या शेअरने गुंतवणूकदारांना 118 टक्के परतावा दिला आहे.

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमेटड ऑगस्ट 2023 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजमधून डी मर्जरनंतर शेअर बाजारत लिस्ट झाली होती. गुरुवारी जिओ फायनान्शिअलच्या शेअरमध्ये 6.33 टक्के तेजी पाहायला मिळाली. बाजार बंद झाला तेव्हा शेअर 318.35 रुपयांवर होता. 2024 मध्ये शेअरने 37 टक्के परतावा दिला आहे.

हे देखील वाचा – चार रुपयांच्या शेअरची कमाल, 1 लाखाचे झाले 8 लाख रुपये; गुंतवणूकदार मालामाल!

शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरुच

भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. सेन्सेक्समध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय शेअर बाजारातून गेल्या काही दिवसांपासून विदेशी गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडे असलेल्या समभागांची विक्री करुन पैसे काढून घेतले. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाला आहे. मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे जवळपास १३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे शेअर बाजारात येणाऱ्या आयपीओंना देखील गुंतवणूकदार कसा प्रतिसाद देतात, हे पाहावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या आयपीओला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Zomato jio financials inclusion in nifty 50 listed companies also included in future and options

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 03:57 PM

Topics:  

  • Business News
  • share market

संबंधित बातम्या

Share Market Today: गुंतणूकदारांनो, आज ‘या’ शेअर्सवर ठेवा फोकस! बाजार तज्ज्ञांनी केली शिफारस
1

Share Market Today: गुंतणूकदारांनो, आज ‘या’ शेअर्सवर ठेवा फोकस! बाजार तज्ज्ञांनी केली शिफारस

Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!
2

Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
3

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

सुदीप फार्माचा ८९५ कोटींचा IPO २१ नोव्हेंबरला उघडणार; किंमतपट्टा ५६३ ते ५९३ निश्चित
4

सुदीप फार्माचा ८९५ कोटींचा IPO २१ नोव्हेंबरला उघडणार; किंमतपट्टा ५६३ ते ५९३ निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.