Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ जाहीर! ११० शिक्षकांचा होणार गौरव

शिक्षकांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य शासनातर्फे सन 2023-24 चा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील ११० शिक्षकांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 03, 2024 | 03:35 PM
2.50 लाख शिक्षकांच्या वेतन देयकाचे होणार वांदे, स्वाक्षरी करण्यास नकार; नक्की काय आहे प्रकरण

2.50 लाख शिक्षकांच्या वेतन देयकाचे होणार वांदे, स्वाक्षरी करण्यास नकार; नक्की काय आहे प्रकरण

Follow Us
Follow Us:

राज्य शासनातर्फे देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२३-२४ जाहीर करण्यात आला आहे.   या पुरस्कारासाठी राज्यातील ११० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. निवड झालेल्या शिक्षकांच्या यादीची लिंक खाली देण्यात आली आहे.

पुरस्कारासाठी विभागवार निवड झालेले शिक्षक

पुरस्कारासाठी प्रवर्गनिहाय प्राथमिक- ३८, माध्यमिक- ३९, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक)- १९, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार- ८, विशेष शिक्षक कला/क्रीडा (१+१)- २, दिव्यांग शिक्षक / दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक- १, स्काऊट/गाईड (१+१)-२ अशा एकूण १०९ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक प्रवर्गातील (१) न्यायालयाच्या आदेशानुसार विचारात घेण्यात आलेला सन (२०२२-२३) चा एक पुरस्कारदेखील जाहीर करण्यात आला आहे.

हे देखील वाचा- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत १.१० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड- मंत्री मंगलप्रभात लोढा

पुरस्काराचा उद्देश

समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले जातात. यानुसार राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर शिक्षकांची निवड केली आहे.

पुरस्काराची रक्कम

हे राज्य शिक्षक पुरस्कार योजना १९६२-६३ पासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित असून, ही पुरस्कार योजना शालेय शिक्षण विभागांमार्फत राबविली जाते. सन २०२१-२२ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येत आहेत. दिनांक १३ जून, २०११ च्या शासन निर्णयान्वये पुरस्काराची रक्कम रु.१०,०००/-(रुपये दहा हजार फक्त) अदा करण्यात येते. तसेच राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दिनांक ४ सप्टेंबर, २०१४ च्या शासन निर्णयान्वये ठोक रक्कम रुपये १,००,०००/- (रुपये एक लाख फक्त) दिले जातात.

 पुरस्कार घोषित झालेल्या शिक्षकांच्या नावाकरिता खालील लिंकवर क्लिक करा.

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202409021748180321.pdf

सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी दिनांक २८ ऑगस्ट, २०२४ रोजी राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली. राज्य निवड समितीने संदर्भ क्र.६ येथील दिनांक ३० ऑगस्ट, २०२४ च्या पत्रान्वये शिक्षकांची गुणानुक्रमे प्रवर्गनिहाय निवड यादी शासनास सादर केली.

Web Title: 110 teachers will be honored with the krantijyoti savitrimai phule state teacher meritorious award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 03:34 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

MPSC पेपरफुटीत अधिकाऱ्याचा मोठा ‘खेळ’? पुतण्यासाठी पेपर फोडल्याचा दावा; प्रेमप्रकरणाचा अँगल देऊन प्रकरण दडपण्याचा आरोप
1

MPSC पेपरफुटीत अधिकाऱ्याचा मोठा ‘खेळ’? पुतण्यासाठी पेपर फोडल्याचा दावा; प्रेमप्रकरणाचा अँगल देऊन प्रकरण दडपण्याचा आरोप

Heritage Conservation: ऐतिहासिक इमारत पाडण्याचा निर्णय तूर्तास स्थगित; वारसा वास्तूच्या संरक्षणासाठी राजकीय नेत्यांचा विरोध
2

Heritage Conservation: ऐतिहासिक इमारत पाडण्याचा निर्णय तूर्तास स्थगित; वारसा वास्तूच्या संरक्षणासाठी राजकीय नेत्यांचा विरोध

Navi Mumbai News: नवी मुंबई अँटी करप्शनची धडक कारवाई; रिक्षा परमिट ट्रान्सफरसाठी लाच घेताना RTO एजंट ताब्यात
3

Navi Mumbai News: नवी मुंबई अँटी करप्शनची धडक कारवाई; रिक्षा परमिट ट्रान्सफरसाठी लाच घेताना RTO एजंट ताब्यात

Chiplun News: खडपोलीकरांची प्रतीक्षा संपणार! डेक स्लॅब-जोडरस्त्यांचे काम सुरू, जानेवारीत पूल खुला होण्याची शक्यता
4

Chiplun News: खडपोलीकरांची प्रतीक्षा संपणार! डेक स्लॅब-जोडरस्त्यांचे काम सुरू, जानेवारीत पूल खुला होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.