Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे महापालिकेत खळबळ! माजी उपमहापौरांवर महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप

पुणे महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि कार्यस्थळावरील सन्मानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनपाच्या एका माजी उपमहापौरांनी नगरसचिव विभागातील महिला कर्मचाऱ्याचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 09, 2026 | 04:08 PM
पुणे महापालिकेत खळबळ! माजी उपमहापौरांवर महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप

पुणे महापालिकेत खळबळ! माजी उपमहापौरांवर महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप

Follow Us
Follow Us:
  • पुणे महापालिकेत खळबळजनक प्रकार!
  • माजी उपमहापौरांना मनपा प्रवेशबंदी
  • नेमकं प्रकरण काय?
पुणे : पुणे महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि कार्यस्थळावरील सन्मानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनपाच्या एका माजी उपमहापौरांनी नगरसचिव विभागातील महिला कर्मचाऱ्याचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित महिला कर्मचाऱ्याने विशाखा समितीकडे तक्रार केल्यानंतर मनपा प्रशासनाने संबंधित माजी पदाधिकाऱ्याच्या मनपा परिसरातील प्रवेशावर पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे.

 

विरोधानंतर संबंधित महिलेला शिवीगाळ

मनपा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थायी समितीच्या बैठकीच्या दिवशी ही कथित घटना घडली आहे. त्यावेळी नगरसचिव विभागातील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी बैठकीच्या कामात व्यस्त होते. दुपारच्या वेळी काही कर्मचारी कार्यालयाबाहेर गेले होते. त्याचवेळी संबंधित माजी उपमहापौर नगरसचिव कार्यालयात आले. कार्यालयात कर्मचारी संख्या कमी असल्याचा फायदा घेत त्यांनी तेथे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा हात पकडून तिच्याशी अभद्र वर्तन केल्याचा आरोप आहे. महिला कर्मचाऱ्याने याला विरोध केल्यानंतर तिच्याशी शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली माहिती

या प्रकारामुळे घाबरलेल्या महिला कर्मचाऱ्याने कार्यालयातून बाहेर पडत वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी तिला तक्रार दाखल करण्यासाठी सहकार्य करण्याचे तसेच योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संबंधित महिलेने मनपाच्या विशाखा समितीकडे लेखी तक्रार दाखल केली. विशाखा समितीच्या अध्यक्षा तथा विधी सल्लागार अॅड. निशा चव्हाण यांनी तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी केली असून, नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले.

हे सुद्धा वाचा : बंदूक, चाकू अन् तलवारीचा धाक दाखवत शेतघरावर दरोडा! पोलिसांनी 24 तासांत केला गुन्ह्याचा उलगडा

तक्रारदार महिलेच्या सुरक्षेसाठी प्रवेशबंदी

मनपाचे सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी सांगितले की, तक्रारदार महिला कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ नये तसेच पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता टाळता यावी, यासाठी संबंधित व्यक्तीच्या मनपा परिसरातील प्रवेशावर पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठीही आवश्यक खबरदारी घेतली जाणार आहे. या प्रकरणामुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. कार्यस्थळी महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि अशा तक्रारींवर निष्पक्षपणे कारवाई करण्याबाबत प्रशासनाची भूमिका कितपत प्रभावी आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: माजी उपमहापौरांवर कोणता आरोप करण्यात आला आहे?

    Ans: नगरसचिव विभागातील महिला कर्मचाऱ्याचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आणि विरोध केल्यानंतर शिवीगाळ केल्याचा आरोप संबंधित माजी उपमहापौरांवर करण्यात आला आहे.

  • Que: हिला कर्मचाऱ्याने या प्रकरणी कुठे तक्रार दाखल केली आहे?

    Ans: संबंधित महिला कर्मचाऱ्याने पुणे महापालिकेच्या विशाखा समितीकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. समितीच्या अध्यक्षा अॅड. निशा चव्हाण यांनी तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी केली आहे.

  • Que: तक्रारीनंतर पुणे महापालिका प्रशासनाने काय कारवाई केली?

    Ans: तक्रारदार महिलेवर दबाव येऊ नये आणि पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ नये, यासाठी संबंधित माजी पदाधिकाऱ्याच्या महापालिका परिसरातील प्रवेशावर पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

Web Title: A former deputy mayor of the pune municipal corporation has been accused of misbehaving with a female employee nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

पुणे महापालिकेचे नवे मुख्यालय शिवाजीनगरमध्ये उभारणार? अडीच एकर जागेचा पर्याय समोर
1

पुणे महापालिकेचे नवे मुख्यालय शिवाजीनगरमध्ये उभारणार? अडीच एकर जागेचा पर्याय समोर

गुप्त माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! उरुळी कांचनमध्ये कल्याण क्लोज मटका जुगारावर छापा
2

गुप्त माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! उरुळी कांचनमध्ये कल्याण क्लोज मटका जुगारावर छापा

बंदूक, चाकू अन् तलवारीचा धाक दाखवत शेतघरावर दरोडा! पोलिसांनी 24 तासांत केला गुन्ह्याचा उलगडा
3

बंदूक, चाकू अन् तलवारीचा धाक दाखवत शेतघरावर दरोडा! पोलिसांनी 24 तासांत केला गुन्ह्याचा उलगडा

आधी लोखंडी पाइप आणि विटांनी बेदम मारहाण, नंतर मृतदेह जाळला! छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
4

आधी लोखंडी पाइप आणि विटांनी बेदम मारहाण, नंतर मृतदेह जाळला! छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.