Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुप्त माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! उरुळी कांचनमध्ये कल्याण क्लोज मटका जुगारावर छापा

हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील बाजार मैदान परिसरात सुरू असलेल्या कल्याण क्लोज मटका जुगारावर पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 09, 2026 | 02:32 PM
गुप्त माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! उरुळी कांचनमध्ये कल्याण क्लोज मटका जुगारावर छापा

गुप्त माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! उरुळी कांचनमध्ये कल्याण क्लोज मटका जुगारावर छापा

Follow Us
Follow Us:
  • मैदान परिसरात कल्याण क्लोज मटका जुगारावर पोलिसांचा छापा
  • कारवाईत दोघांना घेतले ताब्यात
  • जुगार चालवणाऱ्या दोघांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल
उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील बाजार मैदान परिसरात सुरू असलेल्या कल्याण क्लोज मटका जुगारावर पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ९२० रुपये रोख रकमेसह मटका जुगाराच्या स्लिप बुक आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जुगार चालविणाऱ्या दोघांसह त्यांना हा अवैध व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी सांगणाऱ्या आणखी दोघांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २) सायंकाळी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पथक परिसरात अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. त्यावेळी बाजार मैदान परिसरातील संतोष गायकवाड यांच्या इमारतीच्या आडोशाला कल्याण क्लोज मटका जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी गणेश शांताराम कांचन (वय ४२, रा. बाजार मैदान, उरुळी कांचन) आणि संतोष रामचंद्र चव्हाण (वय ४५, रा. यशवंतनगर, यवत, ता. दौंड) हे दोघे नागरिकांकडून पैसे स्वीकारून मटका जुगार चालवत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून ९२० रुपये रोख रक्कम, मटका जुगाराच्या स्लिप बुकसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता हा जुगार राजेंद्र उर्फ राजू पवार (रा. जय मल्हार रोड, उरुळी कांचन) आणि विक्रांत उर्फ विकी कांचन (रा. दत्तवाडी, उरुळी कांचन) यांच्या सांगण्यावरून सुरू असल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गणेश कांचन, संतोष चव्हाण, राजेंद्र पवार आणि विक्रांत कांचन अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार सुनील सस्ते करीत आहेत. दरम्यान, परिसरातील अवैध जुगार आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

हे सुद्धा वाचा : बंदूक, चाकू अन् तलवारीचा धाक दाखवत शेतघरावर दरोडा! पोलिसांनी 24 तासांत केला गुन्ह्याचा उलगडा

💡

Frequently Asked Questions

  • Que: उरुळी कांचनमध्ये पोलिसांनी कुठे आणि कोणत्या जुगारावर छापा टाकला?

    Ans: उरुळी कांचन येथील बाजार मैदान परिसरात सुरू असलेल्या कल्याण क्लोज मटका जुगारावर पोलिसांनी छापा टाकला.

  • Que: पोलिसांनी या कारवाईत काय जप्त केले?

    Ans: पोलिसांनी ९२० रुपये रोख रक्कम, मटका जुगाराच्या स्लिप बुकसह अन्य साहित्य जप्त केले.

  • Que: या प्रकरणी किती जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला?

    Ans: या प्रकरणी गणेश कांचन, संतोष चव्हाण, राजेंद्र पवार आणि विक्रांत कांचन अशा एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The police have taken action in uruli kanchan by raiding a kalyan close matka gambling den nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

बंदूक, चाकू अन् तलवारीचा धाक दाखवत शेतघरावर दरोडा! पोलिसांनी 24 तासांत केला गुन्ह्याचा उलगडा
1

बंदूक, चाकू अन् तलवारीचा धाक दाखवत शेतघरावर दरोडा! पोलिसांनी 24 तासांत केला गुन्ह्याचा उलगडा

आधी लोखंडी पाइप आणि विटांनी बेदम मारहाण, नंतर मृतदेह जाळला! छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
2

आधी लोखंडी पाइप आणि विटांनी बेदम मारहाण, नंतर मृतदेह जाळला! छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Sindhudurg Accident: “सणासुदीच्या दिवसांत घाला घातला…” दोडामार्गात अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन तरुण जागीच ठार; ओळखीचे काम सुरू!
3

Sindhudurg Accident: “सणासुदीच्या दिवसांत घाला घातला…” दोडामार्गात अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन तरुण जागीच ठार; ओळखीचे काम सुरू!

Pakistan News : पाकिस्तानात प्रसिद्ध महिला टीव्ही अँकर राबिया अहसान यांची गोळ्या झाडून हत्या; पती पोलिसांच्या ताब्यात
4

Pakistan News : पाकिस्तानात प्रसिद्ध महिला टीव्ही अँकर राबिया अहसान यांची गोळ्या झाडून हत्या; पती पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.