Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

11th admission process : अकरावीला प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा…; काय आहे अंतिम अंतिम मुदत?

11th admission process : दहावीची परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेची तयारी करावी असे आवाहन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी केले.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 22, 2026 | 02:09 PM
11th Grade Admission Process and Required Documents Career marathi News

11th Grade Admission Process and Required Documents Career marathi News

Follow Us
Follow Us:
  • अकरावीला प्रवेशासाठी तयारी सुरु
  • पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी केले आवाहन
  • तब्बल ३ लाख ८० हजार ५९ विद्यार्थांचे आर्ज प्राप्त
  • अर्जाचा भाग दोन निकाल जाहीर झाल्यानंतर
  • विद्यार्थ्यांना एक ते दहा कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम निवडता येणार
 

11th admission process : पुणे: सोनाजी गाढवे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत इयत्ता अकरावी प्रवेशासाठी यंदाही केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत, असे आवाहन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी केले आहे.

राज्यातील सर्व राज्य मंडळांशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालये आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेश पूर्ण पणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना अधिक पारदर्शकता आणि सुलभता मिळावी, यासाठी ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेनुसार (मेरिट) राबवली जाणार असून, कॅप तसेच विविध कोट्यांद्वारे प्रवेश दिला जाणार आहे.

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करून अर्जाचा पहिला भाग भरावा लागणार आहे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. अर्जाचा दुसरा भाग पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना एक ते दहा कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम निवडण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रवेशाच्या प्रत्येक फेरीत मिळालेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा : दहावी बारावीच्या खाजगी विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात; फॉर्म क्र. १७ द्वारे नावनोंदणी सुरू

तब्बल ३ लाख ८० हजार ५९
इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला १० एप्रिलपासून सुरुवात झाली असून, राज्यभरातून आतापर्यंत तीन लाख ८० हजारा ५९ हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जातील ‘भाग-एक’ भरला आहे.

अर्ज प्रक्रिया

  • अंतिम मुदत ३० एप्रिल
  • ऑनलाइनद्वारे अर्जाचा भाग एक.
  • अर्जाचा भाग दोन निकाल जाहीर झाल्यानंतर
  • दहावीतील गुण आणि त्या गुणांनुसार महाविद्यालयांचा दिलेला पसंतीक्रम.
  • अधिक माहितीसाठी https://mahafyjcadmissions.in संकेतस्थळ
हे देखील वाचा : वन्यजीव संवर्धनात उज्ज्वल भविष्य! पर्याय ऐकाल तर म्हणाल “आता यातच घडवायचं मला करिअर!”

प्रवेश प्रक्रियेची वैशिष्ट्ये

  • विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करून अर्ज भरावा लागेल.
  • प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेनुसार होईल
  • CAP (Centralized Admission Process) व Quota अशा दोन पद्धतींनी प्रवेश मिळणार आहे.
  • विद्यार्थ्यांना किमान १ ते कमाल १० महाविद्यालयांची पसंती देण्याची सुविधा असेल.
प्रवेशासाठी आवश्यक सर्व माहिती, शाखा, उपलब्ध जागा इ. ऑनलाईन पाहता येतील.

प्रवेश प्रक्रियेचे टप्पे खालील प्रमाणे

  • ऑनलाईन नोंदणी (Registration)
  • अर्ज भाग-१ भरणे व पडताळणी
  • अर्ज भाग-२ मध्ये महाविद्यालयांची निवड
  • प्रवेश फेरीत मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे
  • प्रवेश प्रक्रियेत शासनाच्या नियमानुसार सर्व आरक्षणे लागू राहतील.
  • इन-हाऊस, व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोटा बांचाही समावेश असेल.
आवश्यक कागदपत्रे
  • इयत्ता १० वी किया समकक्ष गुणपत्रक
  • शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate)
  • रहिवासी दाखला (Domicile Certificate महाराष्ट्र)
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • नॉन-क्रीमी लेयर प्रमागपत्र
  • EWS पात्रता प्रमाणपत्र
  • दिव्यांग – UDID कार्ड/ दिव्यांग प्रमाणपत्र (Civil Surgeon)
  • प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्तः जिल्हाधिकारी प्रमाणपत्र आवश्यक
  • बदली झालेल्या कर्मचान्यांची मुलेः पालकांचा बदली आदेशव रुजू अहवाल
  • संरक्षण दल / माजी सैनिकांची मुले सेवा प्रमाणपत्र जिल्हा सैनिक बोर्ड प्रमाणपत्र
  • स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदारः-जिल्हाधिकारी प्रमाणपत्र
  • क्रीडापटूः-जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे प्रमाणपत्र
  • अगाध विद्यार्थी महिला व बालकल्याण विभागाचे प्रमाणपत्र

Web Title: 11th grade admission process and required documents career marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • Admission News
  • Career News
  • College

संबंधित बातम्या

Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती
1

Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती

AI College : भारतीय वंशाच्या दांपत्याची कमाल! त्यांच्या दानत्वातून उभे राहणार नवीन AI कॉलेज
2

AI College : भारतीय वंशाच्या दांपत्याची कमाल! त्यांच्या दानत्वातून उभे राहणार नवीन AI कॉलेज

Delhi Private School: खाजगी शाळांमध्ये ईडब्ल्यूएस कोट्यांतर्गत मोफत प्रवेशाची सुवर्णसंधी; २० सप्टेंबरपर्यंत अर्ज सुरू
3

Delhi Private School: खाजगी शाळांमध्ये ईडब्ल्यूएस कोट्यांतर्गत मोफत प्रवेशाची सुवर्णसंधी; २० सप्टेंबरपर्यंत अर्ज सुरू

RTE Fee Reimbursement: आरटीई शाळांच्या थकित प्रकरण संपणार, राज्य शासनाकडून विशेष आढावा समिती जाहीर
4

RTE Fee Reimbursement: आरटीई शाळांच्या थकित प्रकरण संपणार, राज्य शासनाकडून विशेष आढावा समिती जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.