Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan College News: के. एम. अग्रवाल महाविद्यालयात २८ वर्षांपासून नियुक्त्यांचा कथित ‘खेळ’; प्राचार्यांसह १२ जणांवर गुन्हा दाखल

Kalyan College News: कल्याणमधील के. एम. अग्रवाल कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील बेकायदेशीर नियुक्त्या आणि सरकारी नोंदींमध्ये फेरफार केल्याप्रकरणी खळबळ उडाली आहे. १९९८ पासून नियमबाह्य नियुक्त्या केल्याचा आणि HTЕ प्रणालीत बनावट नोंदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 05, 2026 | 05:46 PM
के. एम. अग्रवाल महाविद्यालयात २८ वर्षांपासून नियुक्त्यांचा कथित ‘खेळ’; प्राचार्यांसह १२ जणांवर गुन्हा

के. एम. अग्रवाल महाविद्यालयात २८ वर्षांपासून नियुक्त्यांचा कथित ‘खेळ’; प्राचार्यांसह १२ जणांवर गुन्हा

Follow Us
Follow Us:
  • प्रयोगशाळा सहाय्यकाचे पद बदलून कनिष्ठ लिपिक!
  • अग्रवाल कॉलेजमधील नियुक्त्यांवर गंभीर आरोप
  • कल्याणच्या अग्रवाल कॉलेजमधील १२ जणांविरोधात गुन्हा
कल्याण : शिक्षणाच्या मंदिरातच नियुक्ती प्रक्रिया आणि सरकारी कागदपत्रांच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कल्याणमधील प्रतिष्ठित के. एम. अग्रवाल कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील कथित बेकायदेशीर नियुक्त्या आणि सरकारी नोंदींमध्ये फेरफार केल्याचा प्रकार समोर आला आहे. नियम धाब्यावर बसवून नियुक्त्या केल्याचा, तसेच सरकारी HTЕ प्रणालीमध्ये बनावट नोंदी तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह उच्च शिक्षण विभागातील अधिकारी, संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचारी अशा एकूण १२ जणांविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Kalyan College News)

९९८ पासून नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

मुंबई युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनचे जनसंपर्क प्रमुख रामचंद्र परशुराम यादव (३६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ४ नोव्हेंबर रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, १९९८ पासून महाविद्यालयात अशोक कुमार लालबिहारी मिश्रा यांची नियुक्ती कोणतीही जाहिरात न देता, निवड समितीची प्रक्रिया न राबवता आणि आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र न घेता करण्यात आल्याचा आरोप आहे. नियुक्ती प्रक्रियेत आवश्यक नियमांचे पालन झाले नसल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे महाविद्यालयातील नियुक्त्यांच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Someshwar Sahakari Sakhar Karkhana: सोमेश्वर साखर कारखान्यावर राजवर्धन शिंदे अध्यक्ष पदी तर संग्राम सोरटे उपाध्यक्षपदी

प्रयोगशाळा सहाय्यकाचे पद बदलून कनिष्ठ लिपिक केल्याचा आरोप

या प्रकरणातील आणखी एक गंभीर आरोप म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यकाचे पद नियमबाह्य पद्धतीने कनिष्ठ लिपिक पदात रूपांतरित करण्यात आल्याचा दावा. हे बदल नियमानुसार झाल्याचे दाखवण्यासाठी सरकारी HTЕ प्रणालीमध्ये छेडछाड करून बनावट नोंदी तयार करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सरकारी प्रणालीमध्ये अशा प्रकारे नोंदी बदलण्यात आल्या असल्यास त्यामागे कोणाची भूमिका होती, तसेच संबंधित कागदपत्रांना कोणाची मान्यता होती, याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे.

सुहास भगत यांच्या नियुक्तीवरही प्रश्नचिन्ह

याच प्रकरणात अन्य कर्मचारी सुहास महादेव भगत यांच्या नियुक्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि टंकलेखनाची अर्हता नसतानाही संगनमताने त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या नियुक्ती प्रक्रियेत संबंधित नियमांचे पालन झाले होते का, आवश्यक पात्रता पूर्ण करण्यात आली होती का, याची पडताळणी तपासादरम्यान होण्याची शक्यता आहे.

प्राचार्यांसह १२ जणांविरोधात गुन्हा

या प्रकरणात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता अरुण मन्ना, उच्च शिक्षण विभागाचे तत्कालीन विभागीय सहसंचालक विजय नारखेडे, विद्यमान विभागीय संचालक डॉ. किरणकुमार बोंदर, संस्थेचे अध्यक्ष विजय नारायण पंडित, सचिव ओमप्रकाश पांडे, कार्याध्यक्ष रमाशंकर तिवारी, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत उपाध्याय, अनंत गवळी, अनिल पंडित, कोषाध्यक्ष दिनेश सोमानी, अशोक कुमार मिश्रा आणि सुहास भगत यांचा समावेश आहे. या सर्वांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाला म्हणजे आरोप सिद्ध झाले, असे नाही. या प्रकरणातील सत्य तपासातून स्पष्ट होणार आहे.

कॉलेज प्रशासनाची प्रतिक्रिया काय?

या प्रकरणाबाबत के. एम. अग्रवाल महाविद्यालयाच्या उपप्राचार्या अनघा राणे यांच्याशी विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी या प्रकरणाबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगितले. तसेच सध्या महाविद्यालयात कोणीही नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

पोलिसांच्या तपासाकडे लक्ष

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल खोंडे करत आहेत. कथित नियुक्त्यांमध्ये कोणाची काय भूमिका होती, सरकारी HTЕ प्रणालीमध्ये नोंदी कोणत्या स्तरावर बदलण्यात आल्या आणि संबंधित नियुक्त्यांना कोणाची मान्यता होती, याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे. दरम्यान, २८ वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप असलेल्या या कथित नियुक्ती प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपासातून या प्रकरणातील नेमके वास्तव समोर येणार आहे.

ऐन दिवाळीत प्रवाशांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड; खासगी बसच्या तिकिटांत मोठी वाढ, 1100 चे तिकीट…

💡

Frequently Asked Questions

  • Que: के. एम. अग्रवाल महाविद्यालयातील प्रकरण काय आहे?

    Ans: कल्याणमधील के. एम. अग्रवाल महाविद्यालयात कथित नियमबाह्य नियुक्त्या आणि सरकारी HTЕ प्रणालीमध्ये बनावट नोंदी केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: या प्रकरणात कोणत्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे?

    Ans: १९९८ पासून अशोक कुमार लालबिहारी मिश्रा यांची कथित नियमबाह्य नियुक्ती आणि सुहास महादेव भगत यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. प्रयोगशाळा सहाय्यकाचे पद कनिष्ठ लिपिकात बदलल्याचा आरोपही आहे.

  • Que: या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?

    Ans: खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल खोंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title: Km agrawal college kalyan alleged illegal appointments fraud case sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • College
  • education
  • kalyan

संबंधित बातम्या

SCERT Idol Teachers List 2026-27: राज्यातील ‘आयडॉल शिक्षकां’ची यादी जाहीर! ४,४८४ शिक्षकांची निवड; ‘हा’ जिल्हा राज्यात अव्वल
1

SCERT Idol Teachers List 2026-27: राज्यातील ‘आयडॉल शिक्षकां’ची यादी जाहीर! ४,४८४ शिक्षकांची निवड; ‘हा’ जिल्हा राज्यात अव्वल

Ramayana Movie Cast Education: ‘रामायण’ चित्रपटातील स्टार्स नेमके किती शिकलेत? जाणून घ्या एका क्लिकवर..
2

Ramayana Movie Cast Education: ‘रामायण’ चित्रपटातील स्टार्स नेमके किती शिकलेत? जाणून घ्या एका क्लिकवर..

JEE Main 2027 Registration: अर्जात चूक झालीय का? टेन्शन फ्री होऊन भरा नवीन फॉर्म; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि नियम
3

JEE Main 2027 Registration: अर्जात चूक झालीय का? टेन्शन फ्री होऊन भरा नवीन फॉर्म; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि नियम

QS Asia University Rankings: संशोधन क्षेत्रात भारताचा डंका! IISc बंगळुरू आशियात प्रथम; PHD पदवीधारकांमध्येही भारत आघाडीवर
4

QS Asia University Rankings: संशोधन क्षेत्रात भारताचा डंका! IISc बंगळुरू आशियात प्रथम; PHD पदवीधारकांमध्येही भारत आघाडीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.