
१४ हजार गुरुजींनी दिली टीईटी, जिल्हाभरातील ३६ केंद्रांवर होती परीक्षा (फोटो सौजन्य-Gemini)
परीक्षेचा सुरळीत कारभार पाहण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. जिल्हा परिषद कन्या शाळा, ज्ञानमाता हायस्कूल आणि होली क्रॉस स्कूल या केंद्रांना भेट देत त्यांनी परीक्षा व्यवस्थेची माहिती घेतली. परीक्षार्थीना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले, जिल्हा परिषद कन्या शाळेजवळ नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा काळात सुरू असलेली कामे तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले. जेणेकरून होणारा आवाज परीक्षार्थीना त्रासदायक ठरू नये. शेवटच्या क्षणी येणाऱ्या परीक्षार्थीनाही परीक्षा देण्याची संधी मिळाली. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्र प्रमुखांना स्पष्ट सूचना केल्या.
आधार कार्ड आणि प्रवेश पत्र अचूक व तातडीने तपासून विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्याचे निर्देश देण्यात आले, जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली परीक्षा संचालन मंत्रणा कार्यरत होती. केंद्र प्रमुख, सहाय्यक परिरक्षक, झोनल अधिकारी आणि वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणा परीक्षेच्या सुरळीत कारभारासाठी तैनात होती. सर्व
पोलीस बंदोबस्तात परीक्षा पडली पार परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे सतत निगराणी ठेवण्यात आली. परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि शिस्तबद्ध राहावी यासाठी बायोमेट्रिक, सक्रिनिंग आणि फेस रिकग्निशन प्रक्रिया देखील राबविण्यात आली. दुसरीकडे, शहर पोलिस विभागानेही परीक्षा केंद्रांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना केल्या. काही असामाजिक घटकांमुळे गोंधळ, शांतता भंग किंवा गर्दी होऊ नये म्हणून परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात सामान्य नागरिकांच्या वावरास मनाई करण्यात आली. टेलिफोन बूध, झेरॉक्स केंद्रे, संगणक दुकाने, फेरीवाले तसेच खाद्य विक्री स्टॉल्सही परीक्षा सुरू होण्यापूर्वी बंद करण्यात आले, आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
Ans: या परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ४,७५,६६९ परीक्षार्थी आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील ३२०३१ परीक्षार्थी आहेत. राज्यातील ३७ जिल्ह्यांमध्ये १४२३ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
Ans: महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते आठवी वर्गांवर नियुक्ती असलेल्या शिक्षकांना टीईटी (टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट) म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा देणे अनिवार्य आहे.
Ans: राज्यातील ३७ जिल्ह्यांमध्ये १४२३ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.