नवी मुंबई / सावन वैश्य : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये विशेष शाखा, वाहतूक विभाग, गुन्हेशाखा, सुरक्षा शाखा, तर काहींची पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलीस ठाण्याचे प्रभारी असलेले अधिकारी यांची विशेष शाखा, वाहतूक विभाग, सुरक्षा शाखा, या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. तर वरील ठिकाणी काम केलेल्या अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आयुक्तालय अंतर्गत बदली करणे हा प्रशासनाच्या कामाचा एक भाग आहे. मात्र काही अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच या बदल्या केल्याने अधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं दबक्या आवाजात बोललं जात आहे. तसेच बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांनी बढती नाकारल्याने त्यांच्या बदल्या करण्यात आल्या असल्याच्या देखील चर्चा सध्या पोलीस वर्तुळात सुरु आहेत.
पोलीस निरीक्षक उमेश भानुदास गवळी यांची गुन्हे शाखा मधून बदली होऊन कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक हनीफ दस्तगीर मुलाणी यांची गुन्हे शाखा मधून बदली करून उरण पोलीस स्टेशन येथे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक संजय गंगाधर पाटील यांची वाहतुक शाखा येथून बदली होऊन वाशी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक अरुण नामदेव पवार यांना सीबीडी पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक दिपक विजय सुर्वे यांची वाहतुक शाखा येथून न्हावाशेवा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक औदुंबर भालचंद्र पाटील यांची कोपरखैरणे पोलीस स्टेशन येथून वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक संजय मधुकर धुमाळ यांची वाशी पोलीस ठाणे येथून विशेष शाखा येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक संदेश सदाशिव रेवले यांची सीबीडी पोलीस स्टेशन येथून सुरक्षा शाखा येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक सुनिल दत्तात्रय कदम यांची एन.आर.आय. पोलीस स्टेशन मधून वाहतुक शाखा वाहतूक शाखा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अविनाश एकनाथ काळदाते यांची विशेष शाखा येथून बदली होऊन गुन्हे शाखा येथे नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच पोलीस निरीक्षक देवेंद्र रामचंद्र पोळ यांची मुंबई शहर येथून बदली होऊन एन.आर.आय. पोलीस स्टेशन चे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.