'या' 20 वर्षीय पोरीच्या जिद्दीला सलाम ! ना NEET, ना UPSC झाली क्रॅक; आता मिळवला 72 लाखांचा पॅकेज
आपण नेहमी ऐकतो की यश पचवणं सोपं असतं. मात्र, अपयश पचवणं खूप कठीण. ज्यांना अपयश पचवता येतं. तीच लोकं आभाळाला गवसणी घालतात. आतापर्यंत आपण अशा अनेक लोकांची उदाहरणं ऐकली किंवा वाचली असतील, जे अपयश आले म्हणून खचले नाहीत तर त्यांनी पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करत यश प्राप्त केले. अशातच आता सगळीकडे रितुपर्णा के.एस. या मुलीची चर्चा आहे, जिने अवघ्या 20व्या वर्षी रोल्स-रॉईस कंपनीत 72 लाखांचं पॅकेज मिळवला. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
कर्नाटकातील तीर्थहल्ली तालुक्यातील कोडुरु येथील रहिवासी असलेल्या रितुपर्णा के.एस. नावाच्या मुलीला नीटद्वारे सरकारी जागा मिळाली नाही. त्यानंतर तिने यूपीएससीची तयारीही सोडून दिली. परंतु, वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ब्रिटिश विमान कंपनी रोल्स रॉयसकडून वार्षिक 72.3 लाख रुपयांची ऑफर मिळाल्याने तिला आता प्रसिद्धी मिळाली आहे. जेट इंजिन बनवणाऱ्या विभागात काम करणारी ती सर्वात तरुण महिला ठरली आहे. वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणारी रितुपर्णा आता रोबोटिक्स क्षेत्रात पुढे जात आहे.
SCDL चा रौप्य महोत्सव मुंबईत; करिअर अॅक्सिलरेशन मास्टरक्लासने दिला विद्यार्थ्यांना नवा आत्मविश्वास
सेंट एग्नेसमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि नीटद्वारे सरकारी MBBSची जागा न मिळाल्याने रितुपर्णा निराश झाली होती. तिचे स्वप्न डॉक्टर बनण्याचे होते. परंतु, वडिलांच्या प्रोत्साहनाने ती इंजिनिअरिंगकडे वळली. 2022 मध्ये, तिने CET द्वारे मंगळुरू येथील सह्याद्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घेतला. अशाप्रकारे, प्लॅन बी म्हणून सुरू झालेली गोष्ट लवकरच तिची आवड बनली.
ऑटोमेशनमधील रितुपर्णाच्या आवडीमुळे तिने रोबोटिक्स आणि ऑटोमेशन इंजिनिअरिंगकडे वाटचाल केली. तिच्या वरिष्ठांच्या कामाने प्रेरित होऊन, तिने लवकरच असे प्रोजेक्ट तयार करण्यास सुरुवात केली, जे वास्तविक जगात वापरता येतील.
रितुपर्णा आणि तिच्या टीमने मिळून सुपारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी रोबोटिक स्प्रेअर आणि हार्वेस्टर तयार केले. गोव्यात झालेल्या आयएनएक्स आंतरराष्ट्रीय परिषदेत या उपायाने गोल्ड आणि सिल्व्हर मेडल जिंकली. या स्पर्धेत जपान, सिंगापूर, रशिया आणि चीनमधील विद्यार्थ्यांचा देखील सहभाग होता.
RRB Technician भरती: 6,238 पदे रिक्त; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
पुढे इंटर्नशिपसाठी रितुपर्णाने रोल्स रॉईसशी संपर्क साधला. मात्र, तू एका महिन्यात एकही काम पूर्ण करू शकणार नाही, असे म्हणतात कंपनीने तिला नकार दिला. यानंतर तिने पुन्हा कंपनीकडे संधी मागितली. यावर कंपनीने तिला एक महिन्याची मुदत देऊन एक चॅलेंज दिले आणि तिने ते फक्त एका आठवड्यात पूर्ण देखील केले.
तिच्या कार्यक्षमतेने प्रभावित होऊन, कंपनीने तिला आणखी कठीण कामं दिली. अशा प्रकारे आठ महिन्यांचा एक कठीण प्रवास सुरू झाला ज्यामध्ये काम आणि इंटरव्ह्यू दोन्ही समाविष्ट होते. हे सर्व करत असताना, ती तिच्या सहाव्या सेमिस्टरमधील कॉलेजच्या शिक्षणाकडे देखील लक्ष देत होती. UKच्या कामाच्या वेळेनुसार काम करण्यासाठी, ती मध्यरात्री ते सकाळी 6 वाजेपर्यंत काम करत असे.
डिसेंबर 2024 मध्ये रितुपर्णाला 39.6 लाख रुपयांची प्री-प्लेसमेंट ऑफर मिळाली. एप्रिल 2025 पर्यंत, तिच्या परफॉर्मन्सचा विचार करून तिचा वार्षिक पगार तब्बल 72.3 लाख रुपये करण्यात आला.