फोटो सौजन्य - Social Media
सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) ने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत एक विशेष “करिअर अॅक्सिलरेशन मास्टरक्लास” आयोजित केला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वांसाठी करिअरमध्ये नवे वळण देणारा ठरला. कार्यक्रमात करिअर समुपदेशन, डेल कार्नेगी लीडरशिप मास्टरक्लास, SCDL विषयी माहिती सादरीकरण, HR राउंड टेबल कॉन्फरन्स, आणि माजी विद्यार्थ्यांचा सत्कार अशा विविध सत्रांचा समावेश होता.
या कार्यक्रमात SCDL च्या प्रमुख व्यक्तींनी डॉ. स्वाती एस. मुजुमदार (प्रधान संचालक), सोनाली कदम (उपसंचालक), निखिल वैद्य, शालिनी नायर आणि आशिष पंडिता! आपली उपस्थिती नोंदवली. विद्यार्थ्यांपासून ते विविध स्तरांवरील नोकरदार, HR प्रतिनिधी, आणि माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
डॉ. स्वाती मुजुमदार यांनी SCDL च्या स्थापनेमागची प्रेरणादायक कहाणी सांगितली. त्यांनी सांगितले की SCDL ची संकल्पना 1995 मध्ये सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये मांडण्यात आली होती. विशेषतः सैनिकी क्षेत्रातील लोकांसाठी ही सुविधा तयार करण्यात आली होती, जे पुण्यात येऊ शकत नाहीत. पुढे 2003 पासून डॉ. स्वाती मुजुमदार यांच्या नेतृत्वाखाली e-learning, ऑन डिमांड परीक्षा, आणि तांत्रिक पायाभूत सुधारणा करण्यात आल्या.
डेल कार्नेगी लीडरशिप मास्टरक्लास हा सहभागींना प्रभावी नेतृत्व कौशल्ये, भावनिक समज, आणि संवादात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरला. सहभागी यांनी यामधून प्रेरणा, स्पष्टता आणि व्यावसायिक प्रगतीसाठी योग्य दिशा मिळवल्याचे मत व्यक्त केले. HR राउंड टेबल कॉन्फरन्स मध्ये मानवी संसाधन क्षेत्रातील तज्ञांनी भविष्याच्या नोकऱ्या, हायब्रिड वर्क कल्चर, कर्मचारी कल्याण आणि DEI (Diversity, Equity, Inclusion) यावर चर्चा केली. कार्यरत व्यावसायिकांसाठी हे सत्र खूपच समृद्ध करणारे ठरले. SCDL ही देशातील एक अग्रगण्य खाजगी दूरस्थ शिक्षण संस्था असून, सध्या ८०,००० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या मास्टरक्लासमुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक नाही, तर व्यावसायिक पातळीवरही आत्मविश्वास मिळाला आहे.






