Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाज्योतीचे कोणतेही प्रशिक्षण बंद नाही! विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ऑनलाईन प्रशिक्षणाचा निर्णय

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) चे सर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम सुरळीत सुरू असून कोणताही कार्यक्रम बंद नाही.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 24, 2026 | 07:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत राबविण्यात येणारे सर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून कोणताही कार्यक्रम बंद करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या मागणीचा विचार करून काही प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रकल्प संचालकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ! तंत्रज्ञांचे काम काय असते? पात्रता निकष काय? जाणून घ्या

महाज्योतीकडून एकूण ११ प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये संघ लोकसेवा आयोग (UPSC), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा व संयुक्त गट ब व क तसेच मिलिटरी भरती प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात सुरू आहेत. UPSC प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रतिमाह १३ हजार रुपये विद्यावेतन आणि एकवेळ १८ हजार रुपये आकस्मिक निधी दिला जातो. तर MPSC व इतर प्रशिक्षणासाठी प्रतिमाह १० हजार रुपये आणि एकवेळ १२ हजार रुपये निधी दिला जातो. त्यामुळे या योजनांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून विद्यावेतनही नियमित सुरू राहणार आहे.

२०२५-२६ या आर्थिक वर्षात विविध प्रशिक्षणांत हजारो विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. अभियांत्रिकी सेवा, कर्मचारी निवड आयोग, मिलिटरी भरती, एमबीए प्रवेश परीक्षा, UGC-NET तसेच JEE/NEET सारख्या परीक्षांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे JEE/NEET प्रशिक्षण ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२१ पासून ऑनलाईन स्वरूपात सुरू आहे. दरम्यान, IBPS, SSC, रेल्वे भरती आणि अभियांत्रिकी सेवा यांसारख्या परीक्षांचे स्वरूप ऑनलाईन असल्याने २०२६-२७ पासून हे प्रशिक्षणही ऑनलाईन करण्याचा प्रस्ताव आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना टॅबलेट आणि डेटा सिम देण्यात येणार असून त्याद्वारे घरबसल्या शिक्षण घेता येणार आहे.

ग्राफिक डिझाईन कोर्स! देशातील प्रमुख संस्था कोणकोणत्या? जाणून घ्या

महाज्योतीकडे ऑनलाईन प्रशिक्षणासाठी तब्बल ४४,९०३ अर्ज प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांमध्ये याबाबत मोठी मागणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः आर्थिक अडचणीमुळे किंवा घरगुती जबाबदाऱ्यांमुळे बाहेर जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. ऑनलाईन प्रशिक्षणात लाईव्ह लेक्चर्स, शंका निरसन, साप्ताहिक परीक्षा आणि पीडीएफ स्वरूपातील अभ्यास साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक पद्धतीने शिक्षण मिळणार असून कोणतेही प्रशिक्षण बंद नसून अधिक प्रभावीपणे सुरू असल्याचे महाज्योतीने स्पष्ट केले आहे.

Web Title: Decision on online training as per students demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • Career News

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ; पैसे घेतल्यास कारवाई
1

Maharashtra Drought: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ; पैसे घेतल्यास कारवाई

Maharashtra CET 2027: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! यंदा डिसेंबरमध्ये CET होणार नाही; उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय
2

Maharashtra CET 2027: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! यंदा डिसेंबरमध्ये CET होणार नाही; उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.