Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील ४१४ ‘आदर्श शाळा’! डॉ. आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकासित करणार

राज्यातील ४१२ शाळांना ‘भारतरत्न Dr. Babasaheb Ambedkar आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा उपक्रम Dr. Pankaj Bhoyar यांच्या संकल्पनेतून राबवला जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 01, 2026 | 07:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे. राज्यातील ४१२ शाळांना ‘भारतरत्न Dr. Babasaheb Ambedkar आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री Dr. Pankaj Bhoyar यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत असून, सरकारी शाळांचा दर्जा उंचावून त्यांना खाजगी शाळांशी स्पर्धात्मक बनवण्याचा यामागचा उद्देश आहे.

Education News : RTE प्रवेशासाठी 2.89 लाख अर्ज दाखल; शाळा अन् जागा वाढल्या मात्र अर्जांत घट

या उपक्रमाला मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि शालेय शिक्षण मंत्री Dadaji Bhuse यांचे मार्गदर्शन लाभले आहे. राज्य सरकारने एकूण १५०० शाळांना ‘आदर्श शाळा’मध्ये रूपांतरित करण्याचा व्यापक निर्णय घेतला असून, त्यातील पहिल्या टप्प्यात ४१२ शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांमध्ये समूह साधन केंद्र शाळा, पीएम श्री शाळा आणि विद्यानिकेतन शाळांचा समावेश करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अखंड आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी आवश्यक भौतिक आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये दहावीपर्यंत वर्ग सुरू करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आजपर्यंत सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करत आहेत. या नव्या उपक्रमामुळे त्यांना अधिक बळ मिळणार असून शिक्षणाचा दर्जाही उंचावणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधांसह शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर! निकालात काहीशी सुधारणा परंतु आव्हाने कायम

जिल्हानिहाय पाहता पुणे (२५), नाशिक (३८), जळगाव (२२), सातारा (२१), नांदेड (१८), अहिल्यानगर (१८), संभाजीनगर (१५), रायगड (१३), पालघर (१२), जालना (११), बीड (११), धुळे (१०), ठाणे (९), नंदूरबार (६) आणि परमागी (४) अशा विविध जिल्ह्यांमध्ये या शाळांची निवड करण्यात आली आहे. एकंदरीत, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ हा उपक्रम राज्यातील शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरणार असून, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षण मिळवून देण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Web Title: 414 model schools in the state to be developed as dr ambedkar model schools

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • bmc school
  • Career

संबंधित बातम्या

German language: इंग्रजीसोबतच जर्मन भाषा ठरत आहे रोजगाराची नवी चावी! जाणून घ्या शिकल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रात मिळू शकते नोकरी
1

German language: इंग्रजीसोबतच जर्मन भाषा ठरत आहे रोजगाराची नवी चावी! जाणून घ्या शिकल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रात मिळू शकते नोकरी

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी
2

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.