खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा RTE साठी विद्यार्थ्यांचे लाखो अर्ज दाखल केले (फोटो - सोशल मीडिया)
RTE Admissions News : सोनाजी गाढवे : पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्यभरातून यंदा २ लाख ८९ हजार ६०९ बालकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज करण्यासाठी यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्टपणे सांगीतले.
आरटीई प्रवेशासाठी राज्य शासनाच्या वतीने केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाते. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील ८ हजार ७०१ शाळांमध्ये १ लाख १४ हजार ८२६ जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून एकूण २ लाख ८९ हजार ६०९ अर्ज प्राप्त झाले आहेत.
हे देखील वाचा : भामा-आसखेडचा पुणे, पिंपरी-चिंचवडसह ४ तालुक्यांना आधार; ५.३२ टीएमसी पाणी शिल्लक
मागील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्यातील ८ हजार ८६३ शाळांमध्ये १ लाख ९ हजार १०२ जागा उपलब्ध होत्या. त्या वेळी आरटीई प्रवेशासाठी ३ लाख ५ हजार १५१ अर्ज प्राप्त झाले होते. यंदा उपलब्ध जागांची संख्या वाढली असली तरी अर्जांची संख्या तुलनेने कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. या प्रक्रियेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांच्या आधारे ऑनलाइन सोडत काढण्यात येणार असून प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर परिसरातील शाळा निवडण्याची अट उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर शिक्षण विभागाने ती मर्यादा हटवून पालकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी दिली होती. त्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर पालकांच्या मागणीचा विचार करून मुदतवाढ देण्यात आली होती आणि त्यामुळे अर्जाची संख्या वाढलेली पहायला मिळाली.
मागील वर्षी आकडेवारी
| वर्ष | शाळा | जागा | अर्ज |
|---|---|---|---|
| 2024-25 | 9,217 | 1,05,278 | 2,42,516 |
| 2025-26 | 8,863 | 1,09,102 | 3,05,151 |
| 2026-27 | 8701 | 1,14,826 | 2,89,609 |
पाच वर्षाची आरटीई प्रवेश आकडेवारी
वर्ष – विद्यार्थी नोंदणी
राखवी जागांसाठी आलेले अर्ज
सर्वाधिक अर्ज पुण्यातून
| जिल्हा | शाळा | प्रवेशासाठी उपलब्ध जागा | आलेले अर्ज |
|---|---|---|---|
| पुणे | 916 | 18,060 | 54,483 |
| नागपूर | 642 | 7,081 | 25,331 |
| ठाणे | 615 | 11,754 | 24,846 |
| नाशिक | 394 | 5,673 | 17,077 |
| छ.संभाजीनगर | 541 | 4,911 | 17,077 |
| मुंबई | 252 | 4,558 | 10,312 |
| अहिल्यानगर | 348 | 3765 | 9,200 |






