
बीएड सीईटी परीक्षेच्या पहिल्या दिवशी ८९% उपस्थिती (Photo Credit- AI)
सकाळच्या सत्रात २१,५५५ विद्यार्थ्यांपैकी १९,४८४ विद्यार्थ्यांनी ही सीईटी प्रवेश परीक्षा दिली. यानुसार या सीईटी प्रवेश परीक्षेला ९०.३९ % विद्यार्थ्याची उपस्थिती होती. एकूण २०७१ विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित होते. हि सीईटी प्रवेश परीक्षा सकाळच्या सत्रात सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत संगणकाधारित पद्धतीने घेण्यात आली. हि सीईटी प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यातील १५७ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.
दुपारच्या सत्रात २२,२०० विद्यार्थ्यांपैकी १९,४७९ विद्यार्थ्यांनी ही सीईटी प्रवेश परीक्षा दिली. यानुसार या सीईटी प्रवेश परीक्षेला ८७.७४ % विद्यार्थ्याची उपस्थिती होती. एकूण २७२१ विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित होते. हि सीईटी प्रवेश परीक्षा दुपारच्या सत्रात दुपारी ३ ते दुपारी ४.३० या वेळेत संगणकाधारित पद्धतीने घेण्यात आली. हि सीईटी प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यातील १६८ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.
युद्धाच्या काळातही सुरक्षित राहणाऱ्या नोकऱ्या, काय आहे ‘War-Proof’ Career? जाणून घ्या सविस्तर
सायंकाळच्या सत्रात १०,२७९ विद्यार्थ्यांपैकी ९१९९ विद्यार्थ्यांनी ही सीईटी प्रवेश परीक्षा दिली. यानुसार या सीईटी प्रवेश परीक्षेला ८९ .४९ % विद्यार्थ्याची उपस्थिती होती. एकूण १०८० विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित होते. हि सीईटी प्रवेश परीक्षा सकाळच्या सत्रात सायंकाळी ५.३० ते ६ .३० या वेळेत संगणकाधारित पद्धतीने घेण्यात आली. हि सीईटी प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यातील १०० परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.
शुक्रवारी बीएडच्या सीईटी परीक्षेमध्ये सकाळच्या सत्रात परभणी व नांदेड येथील दोन व दुपारच्या सत्रातील नागपूर येथील एक परीक्षा केंद्रावर तांत्रिक कारणामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परभणी येथील एमजीएम अकॅडेमी येथील परीक्षा सुरु असताना इलेक्ट्रिक शॉटसर्किट झाल्यामुळे तेथील यंत्रणा बंद पडली, यामुळे या परीक्षा केंद्रातील सकाळच्या सत्रातील २९१ विद्यार्थी व दुपारच्या सत्रातील २७८ विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. तसेच नांदेड येथील मराठवाडा परीक्षा केंद्रावर तांत्रिक कारणामुळे सकाळच्या सत्रातील ४३० विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली. दुपारच्या सत्रात नागपूर येथील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षा सुरु असताना विद्युतप्रवाह बंद झाल्यामुळे तेथील यंत्रणा बंद पडली, यामुळे या परीक्षा केंद्रातील दुपारच्या सत्रातील ३०० विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
या तीन परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांच्या सीईटी परीक्षा २८ किंवा २९ मार्च २०२६ रोजी घेण्यात येणार आहेत. याबाबत विद्यार्थ्याला ईमेल व एसएमएसद्वारे कळविण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेचे सुधारित प्रवेश पत्र डाउनलोड करण्यात यावे असे सीईटी कक्षानी सांगितले आहे.