
फोटो सौजन्य - Social Media
या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ सैद्धांतिक माहिती न देता हाताळणीसह (हँड्स-ऑन) प्रशिक्षण आणि मिनी प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून शिक्षकांना प्रत्यक्ष अनुभव देण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांना एआय तंत्रज्ञानाचा आत्मविश्वासाने वापर करता येईल आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक रंजक, संवादात्मक व परिणामकारक बनवता येईल.
ही कार्यशाळा फक्त शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आली असून कोर्स पूर्णपणे मोफत आहे. मात्र, नोंदणी अनिवार्य आहे. इच्छुक शिक्षकांनी सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मर्यादित आसनसंख्या लक्षात घेता अधिकाधिक शिक्षकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फरीन खान, डॉ. चंद्रशेखर भारती, भगवान सागर, दीपा सावंत, अनिल मुंढे, किशोर मराठे, हर्षिता हाते, डॉ. मनीषा जाधव, डॉ. आरती बागले आणि एल. एस. महाजन हे मान्यवर विशेष मेहनत घेत आहेत. विविध शैक्षणिक व तांत्रिक अनुभव असलेली ही टीम शिक्षकांना एआयचे बारकावे सोप्या भाषेत समजावून देणार आहे.
डिजिटल नवकल्पनांना चालना देणारा उपक्रम
डॉ. विशाल कडणे यांनी यापूर्वीही ‘एआय फॉर ऑल’, सीबीएसई एआय अभ्यासक्रम, तसेच एआय सेंटर ऑफ एक्सलन्स यांसारखे उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात डिजिटल नवकल्पनांना मोठी चालना दिली आहे. त्यांच्या दूरदृष्टीतून साकार झालेला हा नवा उपक्रम शिक्षकांना बदलत्या काळाशी जुळवून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या कार्यशाळेमुळे शिक्षकांचे अध्यापन अधिक परिणामकारक, आधुनिक आणि आकर्षक बनेल, तसेच विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी तयार करण्यास मदत होईल, असे मत प्रवक्ते अनिल मुंढे यांनी व्यक्त केले. शिक्षकांसाठी ही ‘एआय लर्निंग वर्कशॉप’ शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे आणि दिशादर्शक पाऊल ठरणार आहे.