दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो आता नो टेन्शन! (Photo Credit - X)
कोणती कागदपत्रे मिळू शकतात?
दहावी/बारावीचे गुणपत्रक (Duplicate Marksheet)
बोर्ड सर्टिफिकेट (Duplicate Certificate)
स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate)
तात्पुरते प्रमाणपत्र (Provisional Certificate)
अर्ज करण्याची सोपी ऑनलाईन पद्धत
१. नोंदणी आणि लॉगिन:
सर्वात आधी boardmarksheet.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP द्वारे व्हेरिफाय करा. त्यानंतर तुमचा ई-मेल आयडी टाकून तोही ओटीपीद्वारे व्हेरिफाईड करून ‘Next’ वर क्लिक करा.
२. वर्गाची निवड:
डॅशबोर्डवर तुम्हाला SSC (१० वी) किंवा HSC (१२ वी) असे दोन पर्याय दिसतील. तुमचे जे प्रमाणपत्र हरवले आहे, तो वर्ग निवडा. त्यानंतर ‘Fill Application Form’ या बटणावर क्लिक करा.
३. माहिती भरणे (Application Form)
वैयक्तिक माहिती जसे तुमचे पूर्ण नाव (इंग्रजी कॅपिटलमध्ये), आईचे नाव, परीक्षा सीट नंबर (Seat Number) तसेच परीक्षेचे वर्ष आणि महिना (उदा. जे काही असेल ते) निवडा. तुमच्या शाळा किंवा कॉलेजचे नाव अचूक भरा. सध्याचा पूर्ण पत्ता आणि पिनकोड टाका. याच पत्त्यावर तुमचे सर्टिफिकेट पोस्टाने येईल.
४. कागदपत्रे अपलोड करणे
आधार कार्डची पीडीएफ फाईल अपलोड करा. बोर्डाच्या फॉरमॅटनुसार एक प्रतिज्ञापत्र तयार करून ते पीडीएफ स्वरूपात जी साईझ असेल अपलोड करा.
५. ऑनलाईन फी भरणे:
ही सेवा मोफत नाही. साध्या अर्जासाठी अंदाजे ५०० रुपये तर तातडीच्या (Urgent) अर्जासाठी ६०० रुपये शुल्क लागते. तुम्ही UPI, QR Code, किंवा डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यावर मिळणारी पावती (Receipt) डाऊनलोड करून जतन करा.
किती दिवसात मिळणार प्रमाणपत्र?
तुमचा अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर, साधारणपणे १० ते १५ दिवसांच्या आत तुमचे सर्टिफिकेट किंवा मार्कशीट तुम्ही दिलेल्या पत्त्यावर भारतीय पोस्टाद्वारे पोहोचवले जाते. तुम्ही डॅशबोर्डवर जाऊन तुमच्या अर्जाचे स्टेटस देखील चेक करू शकता.
महत्त्वाचे मुद्दे लक्ष्यात ठेवा
माहिती भरताना स्पेलिंग आणि सीट नंबरची चूक करू नका. तसेच, प्रतिज्ञापत्राचा नमुना वेबसाईटवर उपलब्ध आहे, तोच वापरावा. सर्टिफिकेट मिळेपर्यंत ‘Application ID’ सांभाळून ठेवा.






