Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UGC-NET 2026: युजीसी-नेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये गंभीर चुका; विद्यार्थ्यांनी शिक्षेची किंमत का मोजावी? ABVP चा प्रश्न!

UGC-NET 2026: जून २०२६ मधील युजीसी-नेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने अभाविपने एनटीएवर तीव्र आक्षेप घेतला आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 18, 2026 | 10:13 AM
ABVP

ABVP

Follow Us
Follow Us:

नीता परब,मुंबई

UGC-NET 2026:  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून जून २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या युजीसी-नेट परीक्षेतील इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांची पुनर्परीक्षा तसेच या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये तथ्यात्मक, मुद्रणविषयक, भाषांतरासंबंधी तसेच भाषिक स्वरूपाच्या गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अशा स्वरूपाच्या चुका आढळणे ही अत्यंत गंभीर बाब असून, त्यामुळे संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या गुणवत्ता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचा आरोप आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) केला आहे.

अभाविपने यापूर्वीच तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करण्यास झालेल्या विलंबाचा मुद्दा उपस्थित करत ,युजीसी सचिवांकडे निवेदनाद्वारे ती तातडीने जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र, उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये गंभीर त्रुटी आढळून येणे ही बाब अधिकच चिंताजनक असल्याचे अभाविपचे म्हणणे आहे. प्रश्नपत्रिका तयार करताना, तज्ज्ञांकडून परीक्षण करताना तसेच अंतिम गुणवत्ता तपासणीच्या प्रक्रियेत या त्रुटी वेळेत का निदर्शनास आल्या नाहीत, याचे स्पष्ट उत्तर एनटीएने विद्यार्थ्यांना आणि देशासमोर द्यावे, असे प्रश्न परिषदेने उपस्थित केले आहेत.

एनटीएच्या व्यवस्थात्मक त्रुटींचा भार विद्यार्थ्यांनी का सहन करावा?

विद्यार्थ्यांना आधी परीक्षा द्यावी लागली, त्यानंतर निकालाची प्रतीक्षा करावी लागली आणि आता पुन्हा पुनर्परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. एनटीएच्या व्यवस्थात्मक त्रुटींचा भार विद्यार्थ्यांनी का सहन करावा? पुनर्परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा अमूल्य वेळ, आर्थिक संसाधने आणि शैक्षणिक नियोजन यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. अनेक विद्यार्थ्यांना दूरच्या परीक्षा केंद्रांवर पुन्हा प्रवास करावा लागणार असून, त्यातून त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक आणि मानसिक ताण निर्माण होणार आहे. या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये असंतोष तसेच परीक्षा व्यवस्थेबाबतचा अविश्वास वाढत आहे.

एनटीएने त्रुटीमध्ये सुधारणा कराव्यात

केवळ पुनर्परीक्षा घेऊन एनटीएची जबाबदारी संपत नाही. स्वतःच्या व्यवस्थात्मक त्रुटींमुळे पुनर्परीक्षा द्यावी लागणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त त्रास होणार नाही, याची पूर्ण जबाबदारी एनटीएने स्वीकारली पाहिजे. पुनर्परीक्षेसाठी योग्य आणि विद्यार्थ्यांना सुलभ अशी परीक्षा केंद्रे उपलब्ध करून देण्याबरोबरच, आवश्यकतेनुसार त्यांच्या प्रवासाची आणि इतर मूलभूत व्यवस्थांची योग्य तरतूद एनटीएने सुनिश्चित करावी.

AI Proof Courses: एआयमुळे नोकरी जाण्याची भीती वाटतेय? मग हे ५ कोर्सेस बदलतील तुमचे करिअर!

प्रश्नपत्रिका तयार करणे, विषयतज्ज्ञांकडून परीक्षण, भाषांतर, प्रूफरीडिंग आणि अंतिम गुणवत्ता तपासणी या प्रत्येक टप्प्यावर कठोर आणि पारदर्शक प्रक्रिया असणे आवश्यक आहे. एका टप्प्यावर झालेली चूक पुढील टप्प्यांमध्येही निदर्शनास न येणे ही केवळ वैयक्तिक चूक नसून परीक्षा व्यवस्थेतील संस्थात्मक त्रुटीचे लक्षण आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून त्रुटींसाठी जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशा चुका पुन्हा होणार नाहीत, यासाठी ठोस सुधारणा कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

अभिषेक पवार यांची भूमिका

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार म्हणाले, “युजीसी नेट सारख्या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकांमध्ये अशा गंभीर त्रुटी आढळणे अत्यंत चिंताजनक आहे. एनटीएच्या व्यवस्थात्मक त्रुटींचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या वेळेवर, आर्थिक संसाधनांवर आणि शैक्षणिक भवितव्यावर होत आहे.

College Ragging: कॉलेजमध्ये सामान्य ओळख आणि रॅगिंगमधील नेमका फरक काय? जाणून घ्या UGC चे नियम आणि तक्रार करण्याची पद्धत..

विद्यार्थ्यांनी एनटीएच्या चुकीची किंमत का मोजावी? एनटीएने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे तातडीने थांबवावे.”“स्वतःच्या चुकीमुळे पुनर्परीक्षा द्यावी लागणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केवळ परीक्षा केंद्रांची योग्य व्यवस्था करणे पुरेसे नाही. विद्यार्थ्यांना अनावश्यक आर्थिक आणि मानसिक त्रास होणार नाही, याची जबाबदारी एनटीएने घेतली पाहिजे. योग्य आणि सुलभ परीक्षा केंद्रांसोबतच विद्यार्थ्यांच्या प्रवासाचीही आवश्यक व्यवस्था एनटीएने सुनिश्चित करावी.”

Web Title: Abvp protests ugc net 2026 exam errors marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • education
  • UGC net

संबंधित बातम्या

NEET UG Scam : नीट परीक्षा वादावर सर्वात मोठी अपडेट; मास्टरमाइंड्सचे चेहरे लवकरच उघड होणार?
1

NEET UG Scam : नीट परीक्षा वादावर सर्वात मोठी अपडेट; मास्टरमाइंड्सचे चेहरे लवकरच उघड होणार?

ISRO Scientist: वयाच्या ७८ व्या वर्षी इस्रोच्या ‘या’ माजी वैज्ञानिकाची कमाल; डॉ. कलाम आणि साराभाईंसोबत केले आहे काम
2

ISRO Scientist: वयाच्या ७८ व्या वर्षी इस्रोच्या ‘या’ माजी वैज्ञानिकाची कमाल; डॉ. कलाम आणि साराभाईंसोबत केले आहे काम

Hindu College Protest: हिंदू कॉलेजमधील प्रवेश वाद आणि प्रशासकीय गोंधळावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र
3

Hindu College Protest: हिंदू कॉलेजमधील प्रवेश वाद आणि प्रशासकीय गोंधळावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र

IIT & BITS Pilani Rejected: ज्या संस्थेने प्रवेश नाकारला, त्याच ‘बिट्स पिलानी’ने केला गौरव खेत्रपाल यांचा सन्मान!
4

IIT & BITS Pilani Rejected: ज्या संस्थेने प्रवेश नाकारला, त्याच ‘बिट्स पिलानी’ने केला गौरव खेत्रपाल यांचा सन्मान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.