Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT & BITS Pilani Rejected: ज्या संस्थेने प्रवेश नाकारला, त्याच ‘बिट्स पिलानी’ने केला गौरव खेत्रपाल यांचा सन्मान!

IIT & BITS Pilani Rejected: आयआयटी आणि बिट्स पिलानी सारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे खचून न जाता, गौरव खेत्रपाल यांनी टियर-३ कॉलेजमधून जिद्दीने करिअर घडवले.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 03, 2026 | 04:03 PM
gourav

gourav

Follow Us
Follow Us:

IIT & BITS Pilani Rejected: इंजिनिअरिंगची आवड असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे देशातील प्रतिष्ठित आयआयटी (IIT) किंवा बिट्स पिलानी (BITS Pilani) सारख्या संस्थांमध्ये शिकण्याचे स्वप्न असते. परंतु, काही वेळा अपयश आल्यामुळे हे स्वप्न अधुरे राहते आणि मन खचून जाते. अशीच काहीशी कथा गौरव खेत्रपाल यांची आहे, ज्यांनी सुरुवातीच्या अपयशावर मात करत केवळ स्वतःचे नशीबच बदलले नाही, तर आज त्याच संस्थेकडून मानाचा पुरस्कार मिळवला आहे.

तीन वेळा JEE मध्ये अपयश

गौरव खेत्रपाल यांनी अलीकडेच सोशल मीडियावर आपली प्रेरणादायी कहाणी शेअर केली आहे. त्यांनी १९९५ ते १९९७ या कालावधीत तीन वेळा जेईई (JEE) परीक्षा दिली, परंतु त्यांना आयआयटीमध्ये (IIT) प्रवेश मिळू शकला नाही. त्यानंतर त्यांनी बिट्स पिलानीमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र कटऑफपेक्षा ०.५ टक्क्यांहून कमी गुणांमुळे त्यांचे तिथेही प्रवेश करण्याचे स्वप्न हुकले. बिट्स पिलानीमध्ये प्रवेश न मिळाल्याचे त्यांना इतके वाईट वाटले की, त्यानंतर कोणीही त्या संस्थेचा विषय काढला तरी ते आपले कान बंद करून घेत असत.

टियर-३ कॉलेजमधून प्रवासाची सुरुवात

आयआयटी आणि बिट्स पिलानीचे दरवाजे बंद झाल्यानंतर खेत्रपाल यांनी एका टियर-३ कॉलेजमधून आपल्या पुढील शिक्षणाला सुरुवात केली. परंतु, त्यांनी यालाच आपले अंतिम लक्ष्य मानले नाही. आपल्या ध्येयाशी तडजोड न करता त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. पुढे त्यांनी एका लेटरल एन्ट्रन्स परीक्षेत टॉप केले, ज्यामुळे त्यांना टियर-२ कॉलेजमध्ये जाण्याची संधी मिळाली.

Kotwal Recruitment 2026: नाशिकमध्ये कोतवाल पदांच्या १५ जागांसाठी भरती जाहीर; ‘या’ तारखेपासून अर्ज सुरू

ज्या संस्थेत प्रवेश मिळाला नाही, तिथूनच मास्टर डिग्री

कालांतराने त्यांच्या आयुष्यात एक रंजक वळण आले. ज्या बिट्स पिलानी संस्थेत १८ वर्षांच्या वयात त्यांना प्रवेश मिळाला नव्हता, त्याच संस्थेत त्यांनी २००२-०३ मध्ये मास्टर डिग्रीसाठी प्रवेश घेतला. एकेकाळी ज्या संस्थेचे नाव त्यांना त्यांच्या अपयशाची आठवण करून द्यायचे, तीच संस्था त्यांच्या उच्च शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग बनली.

12th Career Options: बारावी नंतर काय? कमी वेळेत आणि सहज मिळणाऱ्या नोकऱ्यांबद्दल एकदा वाचाच..

उद्योजकतेसाठी मिळाला स्टार्टअप एक्सीलेंस अवॉर्ड

या प्रवासाचा पुढचा टप्पा अधिक खास ठरला. काही वर्षांनंतर जयपूर येथे आयोजित एका माजी विद्यार्थी कार्यक्रमात त्यांना ‘स्टार्टअप एक्सीलेंस अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. Vanshiv Technologies मधील त्यांच्या आणि त्यांच्या टीमच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना हा बहुमान मिळाला. गौरव खेत्रपाल यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून हे सिद्ध होते की, आयुष्यात कोणतीही परीक्षा किंवा कॉलेजचे अपयश माणसाचे संपूर्ण भविष्य ठरवू शकत नाही. जिद्द आणि मेहनतीच्या बळावर माणूस कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो.

Web Title: Gaurav khetrapal success story iit bits pilani startup award sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • education
  • IIT
  • inspiration
  • starts

संबंधित बातम्या

Education Update: आता नववीची मुले शिकणार बिझनेसचे धडे; अभ्यासक्रमात ‘या’ स्टार्टअप्सचा समावेश!
1

Education Update: आता नववीची मुले शिकणार बिझनेसचे धडे; अभ्यासक्रमात ‘या’ स्टार्टअप्सचा समावेश!

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश
2

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश

UPSC 100 Years Completed: दिल्लीत UPSCचा शताब्दी सोहळा संपन्न, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आता प्रशासनात ‘नेशन फर्स्ट’ आणि….’
3

UPSC 100 Years Completed: दिल्लीत UPSCचा शताब्दी सोहळा संपन्न, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आता प्रशासनात ‘नेशन फर्स्ट’ आणि….’

Wardha News : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण पुन्हा तापलं; नियुक्तीच संशयाच्या भोवऱ्यात, १३ शिक्षक-कर्मचाऱ्यांची चौकशी
4

Wardha News : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण पुन्हा तापलं; नियुक्तीच संशयाच्या भोवऱ्यात, १३ शिक्षक-कर्मचाऱ्यांची चौकशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.