Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI in Education: चॅटजीपीटीमुळे अभ्यास सोपा झाला पण त्याच्या अतिवापरावर शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली ‘ही’ मोठी चिंता!

AI Impact on Students: शिक्षण क्षेत्रात AI आणि ChatGPT चा वाढता वापर विद्यार्थ्यांच्या विचार क्षमतेवर आणि रचनात्मकतेवर कसा परिणाम करतोय? वाचा तज्ज्ञांचे मत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 15, 2026 | 10:25 AM
ए आय

ए आय

Follow Us
Follow Us:

AI Impact on Students: आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि चॅटजीपीटी (ChatGPT) सारख्या प्रगत साधनांनी (Tools) शिक्षण क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवून आणली आहे. आज विद्यार्थी अवघड प्रश्नांची उत्तरे, नोट्स, असाइनमेंट्स आणि प्रोजेक्ट्सची माहिती काही सेकंदांत मिळवू शकतात. यामुळे अभ्यास पूर्वीपेक्षा खूपच सोपा आणि वेगवान झाला आहे.  मात्र, याच्या वाढत्या वापरासोबतच एक नवीन चिंताही समोर येत आहे की, यामुळे विद्यार्थी स्वतः विचार करण्याची आणि समजून घेण्याची सवय तर गमावून बसत नाहीयेत ना?

शिक्षणतज्ज्ञांच्या मते, जेव्हा विद्यार्थी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर थेट एआयकडून घेऊ लागतात, तेव्हा ते स्वतः विश्लेषण करण्याच्या आणि तर्क लावण्याच्या प्रक्रियेपासून दूर जाऊ शकतात. एखादी माहिती समजून घेणे, तिची पडताळणी करणे आणि स्वतःचे निष्कर्ष काढणे हा शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. जर विद्यार्थ्यांना प्रत्येक समस्येचे समाधान विना कष्टाने मिळाले, तर त्यांची ही क्षमता हळूहळू कमकुवत होऊ शकते. म्हणूनच अनेक तज्ज्ञ एआयच्या संतुलित वापराचा सल्ला देत आहेत.

१. विद्यार्थ्यांची रचनात्मकता प्रभावित होऊ शकते का?

रचनात्मकता ही कोणत्याही विद्यार्थ्याची सर्वात मोठी ताकद असते. निबंध लिहिणे, प्रोजेक्ट तयार करणे किंवा नवीन कल्पना विकसित करणे या दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर करावा लागतो. परंतु, जर प्रत्येक काम एआयच्या मदतीने तयार होऊ लागले, तर मूळ विचारसरणी प्रभावित होऊ शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एआय केवळ सूचना किंवा पर्याय देऊ शकतो, परंतु नवीन आणि अनोखे विचार फक्त मानवी मेंदूच तयार करू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयवर पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी आपली रचनात्मक क्षमता सातत्याने विकसित केली पाहिजे.

Patanjali Civil Services Academy: बाबा रामदेव यांची मोठी घोषणा! IAS-IPS घडवण्यासाठी पतंजली सुरू करणार विशेष अकादमी

२. समस्या निवारण कौशल्यावर काय परिणाम होतोय?

जेव्हा विद्यार्थी एखादा प्रश्न स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हाच त्यांची समज आणि आत्मविश्वास वाढतो. पण जर प्रत्येक वेळी एआयकडून थेट उत्तर मिळाले, तर शिकण्याची प्रक्रिया अपूर्ण राहू शकते. विद्यार्थ्यांने आधी स्वतः प्रयत्न केला पाहिजे आणि त्यानंतरच एआयची मदत घेतली पाहिजे, असे अनेक शिक्षकांचे मत आहे.

३. मग ‘एआय’ पूर्णपणे नुकसानकारक आहे का?

ही तंत्रज्ञान प्रणाली विद्यार्थ्यांना गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे, भाषा सुधारणे, संशोधनात मदत करणे आणि वेळ वाचवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर एआय एका ‘डिजिटल शिक्षका’सारखे काम करू शकतो. त्यामुळे समस्या एआयच्या वापरात नाही, तर त्याच्या अतिवापरात आणि चुकीच्या वापरात आहे. योग्य दिशेने वापर केल्यास हे तंत्रज्ञान शिक्षण अधिक प्रभावी बनवू शकते.

Railway Loco Pilot Career: भारतीय रेल्वेत ‘लोको पायलट’ कसे व्हावे? जाणून घ्या पात्रता, निवड प्रक्रिया आणि ट्रेनिंगबद्दल!

योग्य संतुलन काय असावे?

तज्ज्ञांच्या मते, विद्यार्थ्यांनी आधी स्वतः वाचण्याची, समजून घेण्याची आणि उपाय शोधण्याची सवय विकसित केली पाहिजे. यानंतर आपली समज अधिक अचूक करण्यासाठी एआयचा वापर करावा. भविष्यातील शिक्षणामध्ये एआय महत्त्वाची भूमिका बजावेल, परंतु यश त्याच विद्यार्थ्यांना मिळेल जे तंत्रज्ञानाचा वापर करताना आपली आलोचनात्मक क्रिटीकल विचारसरणी, रचनात्मकता आणि समस्या निवारण क्षमता मजबूत ठेवतील.

Web Title: Ai chatgpt impact on education critical thinking students marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • ai
  • education

संबंधित बातम्या

स्टार्टअप ते स्पेस! जागतिक मंचावर देशाचा डंका, फ्रान्समध्ये PM Modi नी मांडलं बदलत्या भारताचं व्हिजन
1

स्टार्टअप ते स्पेस! जागतिक मंचावर देशाचा डंका, फ्रान्समध्ये PM Modi नी मांडलं बदलत्या भारताचं व्हिजन

Aditi Yadav Rumors: अदिती यादव नेमकी कुठे शिकते, लंडन की दिल्ली? अखिलेश यादव यांच्या मुलीबद्दलच्या अफवांची पोलखोल!
2

Aditi Yadav Rumors: अदिती यादव नेमकी कुठे शिकते, लंडन की दिल्ली? अखिलेश यादव यांच्या मुलीबद्दलच्या अफवांची पोलखोल!

IIM Calcutta: आता नोकरी जाण्याच्या भीतीशिवाय सुरू करता येणार बिझनेस! IIM कलकत्ताच्या ‘या’ खास धोरणाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
3

IIM Calcutta: आता नोकरी जाण्याच्या भीतीशिवाय सुरू करता येणार बिझनेस! IIM कलकत्ताच्या ‘या’ खास धोरणाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

‘गणित गुरुवार’नंतर आता ‘सायन्स सोमवार’; महापालिका शाळांमध्ये नवा शैक्षणिक उपक्रम
4

‘गणित गुरुवार’नंतर आता ‘सायन्स सोमवार’; महापालिका शाळांमध्ये नवा शैक्षणिक उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.