Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन!

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आले असून त्यांचा पहिला वार्षिक मेळावा पार पडला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 20, 2025 | 02:35 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • पहिला वार्षिक स्नेह मेळावा शनिवारी उत्साहात पार
  • माजी विद्यार्थ्यांची पावले पुन्हा एकदा शाळेकडे वळण्याची ही एक संस्कारपूर्ण परंपरा
  • माजी विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती ही शाळेच्या गुणवत्तेचे द्योतक
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या १ ऑक्टोबरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, महापालिकेअंतर्गत तसेच खासगी व्यवस्थापनाच्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमाचा पहिला वार्षिक स्नेह मेळावा शनिवारी उत्साहात पार पडला. आपल्या शाळेतून शिक्षणाची शिदोरी घेऊन पुढील आयुष्याची वाटचाल सुरू करणाऱ्या आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची पावले पुन्हा एकदा शाळेकडे वळण्याची ही एक संस्कारपूर्ण आणि सांस्कृतिक परंपरा असल्याचे या मेळाव्याद्वारे स्पष्ट झाले. (Alumni Association established in all schools within Kalyan-Dombivli Municipal Corporation limits)

मुंबईत ज्ञानेश्वरीचे प्रकाशन! मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते प्रतिपादन, वांद्रयातील विठ्ठल मंदिरात आयोजन

शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी भारत बोरनारे म्हणाले की, शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडणीचे केंद्र असते. शाळेतून मिळालेले ज्ञान, मूल्ये आणि संस्कार याच आधारावर विद्यार्थ्यांचा पुढील जीवनप्रवास उभा राहतो. समाजकारण, प्रशासन, राजकारण, संशोधन, व्यापार, उद्योग, शेती यांसह विविध क्षेत्रांत माजी विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती ही शाळेच्या गुणवत्तेचे द्योतक आहे, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, भारत बोरनारे स्वतः कडोमनपा शाळा तिसगाव आणि डोंबिवली येथील महात्मा गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांनी दोन्ही शाळांच्या स्नेह मेळाव्यास स्वतः हजेरी लावली.

दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली महादीप परीक्षा! शिक्षण विभागाचे उत्कृष्ट नियंत्रण 

राष्ट्र उभारणीसाठी शाळेतील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी सातत्याने योगदान देत आहेत. शाळेने दिलेल्या घडणीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक माजी विद्यार्थी शाळेच्या विकासकामात आर्थिक, तांत्रिक तसेच सामाजिक स्वरूपाचे योगदान देत आहेत. त्यांच्या (Alumni Association) सहकार्यामुळे शाळांची गुणवत्ता वृद्धिंगत होण्यास, सुविधा वाढण्यास आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीला अधिक चांगली चालना मिळण्यास मदत होत आहे. शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या नियोजनानुसार १९ नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघांचे उपक्रम उत्साहात राबविण्यात आले असून, विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांचा प्रतिसाद समाधानकारक मिळाला आहे. नवीन पिढीशी जुनी पिढी जोडण्याचा आणि शाळा–विद्यार्थी नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा या उपक्रमाचा उद्देश यशस्वी होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Alumni association established in all schools within kalyan dombivli municipal corporation limits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • Career

संबंधित बातम्या

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे
1

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे

Sainik School: सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी फक्त सैन्यातच नव्हे तर ‘या’ क्षेत्रातही चमकतात
2

Sainik School: सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी फक्त सैन्यातच नव्हे तर ‘या’ क्षेत्रातही चमकतात

Cambridge survey : परदेशात शिक्षणाचे आकर्षण घटले? भारतातील विद्यार्थ्यांना देशातच UG शिक्षण घेण्याचा कल का वाढला?
3

Cambridge survey : परदेशात शिक्षणाचे आकर्षण घटले? भारतातील विद्यार्थ्यांना देशातच UG शिक्षण घेण्याचा कल का वाढला?

Mahavitaran Hingoli Bharti 2026: महावितरण हिंगोली भरतीत मोठा बदल! शिकाऊ उमेदवारांच्या जागा कितीने घटल्या? जाणून घ्या
4

Mahavitaran Hingoli Bharti 2026: महावितरण हिंगोली भरतीत मोठा बदल! शिकाऊ उमेदवारांच्या जागा कितीने घटल्या? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.