फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Amalner Urban Bank Recruitment 2026: दि अमळनेर को-ऑप. अर्बन बँक लि., अमळनेर (जि. जळगाव) या बँकेच्या जळगाव जिल्हा कार्यक्षेत्रांतर्गत युनिट सहकारी बँकेत विविध रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया.
या सहकारी बँकेत लिपिक पदासाठी ५ जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. तसेच MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आणि मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक आहे.
प्राधान्य: सहकारी बँकिंग क्षेत्र किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्यांना, मराठी व इंग्रजी टायपिंग तसेच JAIIB/CAIIB/GDC&A किंवा शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF, VAMNICOM इ.) बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका प्राप्त केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. तसेच त्याचे वय २२ ते ३५ वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.
तसेच येथे शिपाई पदासाठी २ जागा रिक्त असून इच्छुक उमेदवार किमान किमान १० वी उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान असणारा असावा. त्याचे वय २१ ते ३३ वर्षे असावे.
आय.टी. असिस्टंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कॉम्प्युटर सायन्स/माहिती तंत्रज्ञान आणि सिस्टम किंवा डेटाबेसचा पदवी असणे आवश्यक आहे. तसेच त्याला मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक आहे.उमेदवाराचे वय २२ ते ३५ वर्षांदरम्यान असावे. या बँकेत सहकारी बँकिंग किंवा वित्तीय संस्थेत संबंधित पदाचा अनुभव आणि बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविकाधारकांना प्राधान्य देण्यात येणार आहे.






